कोल्हापूर – कोल्हापूर जिल्ह्यातील नृसिंहवाडी, आळते व सांगवडे ग्रामपंचायतीना भाविकांना सोयी सुविधा पुरविण्यासाठी यात्राकर ऐवजी सहाय्यक अनुदान 1 कोटी 25 लाख रुपये मंजूर करण्यात आले असून येत्या दोन दिवसात ही रक्कम ग्रामपंचायत खात्यावर जमा होणार आहे.
नृसिंहवाडी,आळते,सांगवडे या तीर्थक्षेत्र असणाऱ्या गावाना लाखो भाविक दरवर्षी येत असतात त्यांना मूलभूत सोयी सुविधा देण्यात याव्यात म्हणून ग्रामपंचायतीकडून यात्राकर गोळा केला जात होता.त्यामुळे सदरचा यात्राकर गोळा करण्याऐवजी शासनाकडून सहाय्यक अनुदान मंजूर करण्यात आले असून त्यातून ग्रामपंचायतींनी भाविकांसाठी लागणाऱ्या सोयी सुविधा पुरविण्याच्या आहेत. त्यानुसार नृसिंहवाडी ग्रामपंचायत 50 लाख 75 हजार आळते ग्रामपंचायत 42 लाख 76 हजार व सांगवडे ग्रामपंचायत 29 लाख रुपये मंजूर करण्यात आले असून सदरची रक्कम ग्रामपंचायतीच्या खात्यावर जिल्हा परिषदेकडून दोन दिवसात वर्ग होणार असल्याचे समजते.नृसिंहवाडी साठी सदरचा निधी मिळविण्यासाठी सरपंच,जिल्हा परिषद सदस्य तसेच मराठा क्रांती मोर्चाचे सागर धनवडे यांनी विशेष प्रयत्न केले.
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
