
कोल्हापूर, दि. 27 (जिमाका): वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे आहे.
रविवार, 29 मार्च रोजी सकाळी 7.20 वाजता कोल्हापूर शाहू महाराज टर्मिनस येथे महालक्ष्मी एक्सप्रेसने आगमन व राखीव. सकाळी 8 वाजता सर्व नागरिकांसाठी राखीव. (स्थळ : निवासस्थान कागल) सकाळी 10.30 वाजता हॉटेल स्वागत, परिते ता. करवीर आयोजित रौप्य महोत्सव व उद्घाटन समारंभास उपस्थिती. (स्थळ : परिते, ता. कागल) दुपारी 12 ते 7 राखीव. सोयीनुसार कागल निवासस्थानाकडे प्रयाण, आगमन व मुक्काम. (स्थळ : निवासस्थान कागल)
सोमवार, 30 मार्च रोजी सकाळी 7 वाजता सर्व नागरिकांसाठी राखीव. (स्थळ : निवासस्थान कागल) सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे आढावा बैठक. (स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर) दुपारी 1 ते 7 राखीव. सोयीनुसार कागल निवासस्थानाकडे प्रयाण, आगमन व मुक्काम. (स्थळ : निवासस्थान कागल)
मंगळवार, 31 मार्च रोजी सकाळी 7 वाजता सर्व नागरिकांसाठी राखीव. (स्थळ : निवासस्थान कागल) सकाळी 10.40 वाजता कोल्हापूर विमानतळ येथून विमानाने मुंबईकडे प्रयाण.
0000