Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: admin
कोल्हापूर, दि. 3 (जिमाका) : ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) सुधारित नियम 2017 च्या नियम 5 उपनियम (3) नुसार ध्वनीक्षेपक व ध्वनिवर्धकांचा वापर वर्षातील एकूण 15 दिवसांसाठी ध्वनीची विहित मर्यादा राखून सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत करण्याकरिता आदेश पारित केले आहेत. तथापि जिल्हादंडाधिकारी अमोल येडगे यांनी या आदेशात दुरुस्ती केली असून गणपती उत्सव – दि. 4 सप्टेंबर 2025 तसेच ईद-ए-मिलाद – दि. 5 व 6 सप्टेंबर 2025 या दिवसांना सुट घोषित करण्यात आली आहे. 0000
पुणे दि 30 – येथील डॉ भारती चव्हाण यांचे संघटन कौशल्य आणि अनुभवाची व्याप्ती लक्षात घेऊन तसेच मानिनी फाऊंडेशन च्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात जाळे विस्तारलेल्या संस्थापक अध्यक्षा डू भारती चव्हाण यांची शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटना महासंघ(भारत) व महा ऍग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी फेडरेशन महाराष्ट्र या शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या संस्थांवर कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.त्यामुळे समाजातील विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून येणाऱ्या काळात राज्यातील शेतकरी बांधवांसाठी भरीव कामगिरी होईल अशी अपेक्षा व्यक्त होताना दिसत आहे.
कोल्हापूर दिनांक २८आज पोलीस अधीक्षक कार्यालय, कोल्हापूर येथ गणेशोत्सवाच्या अनुषंगाने, पोलीस अधीक्षक, कोल्हापूर यांनी उप-विभागीय पोलीस अधिकारी, शहर व करवीर उप-विभाग, पोलीस उप-अधीक्षक (गृह), कोल्हापूर शहर व परिसरातील पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, पोलीस निरीक्षक, जि. वि.शा. आणि स्था. गु.शा. यांचे उपस्थितीत कोल्हापूर शहर व परीसरातील गणेश मंडळांचे पदाधिकारी व डी.जे. सिस्टीमचे मालक यांची बैठक घेण्यात आली. पोलीस अधीक्षक, कोल्हापूर यांनी सदर बैठकीमध्ये कोल्हापूर शहर व परिसरातील गणेश आगमन मिरवणूकीमध्ये ३२७ मंडळांनी डी. जे. लावून ध्वनी पातळी मर्यादेचे उल्लंघन केल्याचे सांगितले. तसेच सदर उल्लंघनकर्त्या मंडळांवर खटले दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केल्याची माहिती दिली. तसेच दिनांक ०६/०९/२०२५ रोजी गणेश विसर्जन मिरवणूकी दरम्यान…
कोल्हापूर* – मालेगाव बाँबस्फोट, मुंबईतील ७/११ चा रेल्वे बॉबस्फोट आणि दाभोलकर हत्या या प्रकरणांचे नुकतेच निकाल लागले. या प्रकरणांमध्ये ‘राजकीय हस्तक्षेप’ होता, असा सनसनाटी निर्माण करणारा आरोप माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी केला. आम्ही त्यांना विनंती करतो की, त्यांनी राजकीय हस्तक्षेप करणार्या ‘त्या’ राजकीय नेत्यांची नावे जाहीर करावीत, असे आवाहन सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी केले. ते कोल्हापूर येथील प्रेसक्लब येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. या वेळी महाराष्ट्र मंदिर महासंघाचे करवीर तालुकासंयोजक श्री. अशोक गुरव, हिंदु एकता आंदोलनाचे जिल्हाप्रमुख श्री. दीपक देसाई, सनातन संस्थेचे डॉ. मानसिंग शिंदे, ‘महाराजा प्रतिष्ठान’चे संस्थापक श्री. निरंजन शिंदे आणि हिंदु…
कोल्हापूर दिनांक 22- कोल्हापूर मधील सर्जिकल भांडार विभाग सी पी आर रुग्णालय यांनी जिल्हा वार्षिक योजनेतील मंजूर अनुदानामधून सर्जिकल व लॅब किटची खरेदी चा 4 कोटी 87 लाखांचा ठेका व्हि एस एंटरप्राइजेस कोल्हापूर यांना बेकायदेशीरपणे दिल्याने जबाबदार असणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्याची मागणी मनसेच्या वतीने आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली. व्हि. एस. इंटरप्राइजेस चे मयुर लिंबेकर याने ESIC हॉस्पिटलचे बनावट लेटर तयार करून त्यावर खोटी सही केल्याने लक्ष्मीपुरी पोलिसात गुन्हा दाखल आहे.तसेच याकामी मयुर लिंबेकर याला भ्रष्टाचारमध्ये साथ दिल्याबद्दल तत्कालीन आयुक्त व संचालक,मुंबई,तत्कालीन जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष खरेदी समिती राहुल रेखावार,अधिष्ठाता डॉ प्रदीप दीक्षित, डॉ गिरीश कांबळे वैद्यकीय अधिक्षक,सुनीता धामटे,रमेश खेडेकर,सारंग…
कोल्हापूर दिनांक 20 – कुमार विद्या मंदिर केर्ले शाळेतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी असणारा डिजिटल टीव्ही स्क्रीन हा प्रोजेक्ट दाखवण्यासाठी ग्रामपंचायत ऑफिस केर्ले या ठिकाणी आणण्यात आला होता. प्रोजेक्ट दाखविल्यानंतर सदर डिजिटल टीव्ही स्क्रीन ही शाळेमध्ये पोहोच करणे गरजेचे होते मात्र गेली अनेक महिने ही डिजिटल टीव्ही स्क्रीन ग्रामपंचायत मध्ये तशीच पडून होती. सदर बाब दि.15 ऑगस्ट 2025 रोजी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती शाखा केर्ले च्या कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आली व शाळेतील मुलांचे होणारे शैक्षणिक नुकसान ही गंभीर बाब ध्यानात घेऊन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायत मध्ये मा. ग्रामसेवक पाटील साहेब व क्लार्क मारुती गुरव साहेब यांना संबंधित गंभीर बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर…
कोल्हापूर दिनांक 09 – कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकात, धनंजय महाडिक युवाशक्ती आणि भाजपच्यावतीने दहीहंडीचा थरार आणि जल्लोष रंगणार आहे. यावर्षी रविवार दि. २४ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ४ वाजता युवाशक्ती दहीहंडी स्पर्धेला प्रारंभ होईल. पश्चिम-दक्षिण महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि गाजलेल्या युवाशक्तीच्या दहीहंडी स्पर्धेतील ३ लाख रूपयांचे बक्षिस पटकावण्यासाठी, यंदाही गोविंदा पथकांची चुरस रंगणार आहे. स्पर्धेच्या उद्घाटनाला राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील, नामदार हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार अमल महाडिक, राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, खासदार धैर्यशील माने, आमदार विनय कोरे, आमदार चंद्रदीप नरके, आमदार राहूल आवाडे, माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यासह जिल्हयातील सर्व लोकप्रतिनिधींना निमंत्रण दिले…
कोल्हापूर, दि. 08* : संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीस थोडा विलंब झाला असला, तरी सर्व कामे महापालिकेकडून गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करून पूर्वीप्रमाणेच या नाट्यगृहाची भव्य उभारणी होईल, असा विश्वास उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला. कोल्हापूर शहरातील नाट्य क्षेत्रातील रंगकर्मींसमवेत संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या कामाची त्यांनी पाहणी केली. शासनाने नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीसाठी दिलेल्या 25 कोटी रुपयांमधील कामांची पाहणी करीत महापालिकेला आवश्यक सूचनाही त्यांनी केल्या. ते म्हणाले, हेरिटेज समिती तसेच नाट्य क्षेत्रातील अनुभवी तसेच नाट्य मंडळाच्या सूचनांचा समावेश नाट्यगृहाच्या उभारणीत करावा. यावेळी नाट्य क्षेत्रातील मिलिंद अष्टेकर, आनंद कुलकर्णी, सुनील घोरपडे, नाट्य परिषदेचे संचालक इतर रंगकर्मींसमवेत कोल्हापूर महानगरपालिकेचे अतिरीक्त…
*कोल्हापूर, दि. 28*: महिलांच्या प्रत्येक प्रकरणांमध्ये कायद्याच्या चौकटीतून त्यांना योग्य न्याय देण्याचा आयोगाचा निर्धार असल्याचे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी प्रतिपादन केले. कोल्हापूर पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित महिला तक्रार अर्जदारांच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी अर्जदार महिलांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि त्यावर संबंधित अधिकाऱ्यांना कार्यवाहीसाठी सूचना दिल्या. यावेळी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, पोलीस उपाधीक्षक गृह सुवर्णा पत्की, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, निर्भया पथकाच्या सहायक पोलीस निरिक्षक तथा नोडल स्वाती यादव यांच्यासह संबंधित इतर विभागांचे प्रमुख उपस्थित होते. यावेळी, महिलांवरील अत्याचार प्रकरणात पोलीसांनी प्राधान्याने तक्रार दाखल करून घेणे ही…