Author: admin

पुणे – पिंपरी-चिंचवड शहरात पत्रकार भवन उभारण्यासाठी स्वतंत्र जागेची तरतूद प्रारूप विकास आराखड्यात करण्यात यावी, अशी लेखी सूचना आमदार शंकर जगताप यांनी महापालिका आयुक्तांना केली आहे. या निर्णयामुळे शहरातील पत्रकारांना स्वतंत्र, सुसज्ज आणि हक्काचे व्यासपीठ निर्माण होणार आहे. मराठी पत्रकार संघाच्या वतीने आमदार शंकर जगताप यांनी विधानसभेत पत्रकारांचे प्रश्न मांडल्याबद्दल त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने आमदार जगताप यांची भेट घेऊन पत्रकारांच्या विविध समस्यांबाबत चर्चा केली. यावेळी पत्रकारांच्या प्रश्नांना विधानसभेत वाचा फोडल्याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले. पत्रकार हे लोकशाहीचे चौथे स्तंभ आहेत. त्यांच्या प्रश्नांची मला पूर्ण जाणीव असून त्यांच्या न्याय हक्कांसाठी…

Read More

कोल्हापूर : सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी बजावलेबद्दल सामाजिक कार्यकर्ते आणि कोल्हापूर जिल्हा उद्योग आघाडी भाजपचे उपाध्यक्ष डॉ. विकास बिसुरे यांची प्रांत ग्राहक संरक्षण समिती संघटनेच्या प्रदेश अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. ग्राहक चळवळीमध्ये अग्रेसर राहून सामान्य ग्राहकाला न्याय देण्याचं काम ते या पदावरुन करतील असा विश्वास आहे. महाराष्ट्रात नवीन कार्यकारणी स्थापन करण्याचे सर्वांधिकार त्यांना या निमित्ताने देण्यात आले आहेत. गेली ३० वर्षे महाराष्ट्रचं नव्हे तर संपूर्ण भारतभर आपल्या संघटनेचे पदाधिकारी असून ते ग्राहक चळवळीमध्ये काम करीत आहेत, अशी माहिती प्रांत ग्राहक संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष राजेश भोसले यांनी प्रसिद्धी पत्रकारद्वारे दिली आहे. गोरगरीबांची सुख-दु:खे आपली समजून त्यांच्यासाठी काम करणारे, हजारो…

Read More

कोल्हापूर, दि. 11 (जिमाका) : राज्यातील ऑटोरिक्षा व मिटर्स टॅक्सी चालकांच्या कल्याणासाठी धर्मवीर आनंद दिघे महाराष्ट्र ऑटो-रिक्षा आणि टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळ स्थापन केले असून यासाठी ऑटोरिक्षा व मिटर्स टॅक्सी चालकांनी मंडळाकडे नोंदणी करावयाची आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र अर्जदारांनी https://ananddighekalyankarimandal.org या संकेतस्थळावर ऑनलाईन सभासद नोंदणी करावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी केले आहे. या कल्याणकारी मंडळाकडून केंद्र शासनामार्फत व राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ ऑटोरिक्षा व मिटर्स टॅक्सी चालकांना देण्यात येणार आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने जीवन विमा व अपंगत्व विमा योजना, आरोग्य विषयक लाभ, कर्तव्यावर असताना दुखापत झाल्यास अर्थसहाय्य योजना (रु. 50 हजार…

Read More

कोल्हापूर दिनांक 8 – कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा तालुक्यातील तिसंगी येथील दत्ताजीराव मोहिते पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचा प्राचार्य शरद काटकर याने त्याच महाविद्यालयातील दीपक गुंडू कांबळे या शिक्षकाची डिग्री बोगस नसल्याबाबत इंदोर येथील विद्यापीठाची खोटी कागदपत्रे सादर करून त्याला वाचवायचा नादात स्वतःच अडकला आहे.त्यामुळे दोघांचेही पगार जिल्हा परिषद प्रशासनाने थांबविले आहेत.तसेच सुमारे एक कोटीच्या वर शासनाचा पगार खाल्लेल्या शिक्षकावर व प्राचार्यावर फौजदारी गुन्हा दाखल होणार का याकडे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. दत्ताजीराव मोहिते-पाटील कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक दीपक गुंडू कांबळे या शिक्षकाची एम. ए.आर्ट्स ची डिग्री खोटी असल्याच्या संशयातून अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघटनेच्या वतीने शिक्षणाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात…

Read More

कोल्हापूर – गडहिंग्लज पोलिस ठाण्यामध्ये महिला सहायक पोलिस उपनिरीक्षक नीता शिवाजी कांबळे रा. के. डी. सी.सी. बँक कॉलनी , गडहिंग्लज यांना रु.40000 हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.त्यामुळे कोल्हापूर जिल्हा पोलिस वर्तुळात खळबळ उडाली आहे.या महिला पोलिस अधिकारी यांच्यावर गडहिंग्लज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार यांच्या मुलाविरुद्ध गडहिंग्लज पोलिस ठाणे येथे अपघात प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.त्यामध्ये तक्रारदार यांचे वाहन जप्त करण्यात आले होते.त्याच्या मोबदल्यात तसेच गुन्ह्यातील कलमे कमी करून,गुन्ह्याचे कागदपत्रे देण्याच्या मोबदल्यात एकूण रु.60000 ची लाच मागणी होत असल्याची तक्रार तक्रारदार यांनी दिली होती.सदर तक्रारीच्या अनुषंगाने दिनांक 05 जुलै 2025 रोजी पंचासमक्ष तडजोडीअंती…

Read More

कोल्हापूर दिनांक  30- शाहू छत्रपती फौंडेशनच्या शाहू आदर्श शिक्षक पुरस्कारांचे वितरण श्रीराम साळुंखे, हणमंत बागल,संदीप आडनाईक आनंदराव भोसले यांच्यासह बारा गुरुजन शाहू पुरस्कारानं सन्मानित लग्नात आलिशान मोटारी, फ्रिज, वॉशिंग मशीन यासारख्या महागड्या वस्तू आंदण म्हणून देण्याची प्रथा समाजाला अधोगतीकडे नेत आहे. ज्या दिवशी वधू पित्याकडून वराला पुस्तकाचे कपाट भेट देण्याची प्रथा सुरु होईल, त्या दिवशी समाजाची प्रगतीकडे वाटचाल सुरु होईल, असा विश्वास ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ जयसिंगराव पवार यांनी बोलताना व्यक्त केला. गेली तेरा वर्षे राजर्षी शाहू महाराजांच्या विचार आणि कार्याचा प्रचार आणि प्रसार यासाठी कार्यरत असलेल्या शाहू छत्रपती फौंडेशनच्या राजर्षी शाहू आदर्श शिक्षक आणि विशेष उल्लेखनीय पुरस्कारांचं वितरण शाहू…

Read More

कोल्हापूर दिनांक 30 – गेली दोन तीन दिवस शिवसेना उबाठा मध्ये जिल्हाध्यक्ष निवडीवरून वादंग उठले आहे.त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या अस्वस्थता झाल्याचे दिसत होते.त्या पार्श्वभूमीवर आज शिवसेनेचे निष्ठावंत आणि जुने कार्यकर्ते हर्षल सुर्वे यांनी आता शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आहे.सुर्वे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे,”साहेब माझी जिल्हाप्रमुख पदी निवड झाली नाही त्यामुळे मनातील खद व्यक्त केली होती, मात्र आदित्य साहेबांनी ज्या पद्धतीने प्रतिक्रिया दिली तीच जास्त जीव्हारी लागली आज पर्यंत आदेश मानूनच काम केले होते कधी आदेश डावलला नाही पण आता आदित्य साहेबांचा आदेश आला निर्णय मान्य नसेल तर निघुन जावा,मला निर्णय मान्य नाही साहेब साहेबांचा आदेश…

Read More

कोल्हापूर दिनांक 29 – प्रभाग क्रमांक ८१ क्रांतिसिंह नाना पाटील नगर येथील अरिहंत अपार्टमेंट यांच्या ड्रेनेजचे मैला युक्त पाणी गेली आठ दिवस विशाल नगर कॉलनीतील रस्त्यावरून वाहत आहे. त्यामुळे येथील नागरिकांना दुर्गंधीचा व रोगराईचा सामना करावा लागत आहे. कॉलनीतील नागरिकांनी मनसेचे जिल्हा सचिव निलेश आजगावकर यांच्याकडे तक्रार केल्यानंतर आज त्यांनी अरिहंत अपार्टमेंटचे चेअरमन डॉ. वैशाली मुगडे व महानगरपालिकेचे अधिकारी यांना प्रत्यक्ष जागेवर बोलवून घेऊन योग्य ती कार्यवाही करण्यास सांगितले. अरिहंत अपार्टमेंट मध्ये जवळपास ५५ फ्लॅट धारक व ३६ गाळे धारक असून त्या अनुषंगाने ड्रेनेजचे पाणी निर्गत करण्यासाठी योग्य ती काळजी घेतली नसल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर नागरिकांचा रोष व वस्तुस्थिती पाहून…

Read More