Author: admin

कोल्हापूर, दि. 22 : हातकणंगले येथील वीर धनाजी जाधव शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रवेश सत्र 2026 साठी विविध व्यवसाय अभ्यासक्रमांच्या एकूण 124 जागांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. यामध्ये वीजतंत्री, फिटर, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, पंप ऑपरेटर कम मेकॅनिक, शिट मेटल वर्कर आणि ड्रेस मेकिंग या सहा व्यवसायांचा समावेश आहे. प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 21 मेपासून सुरू झाली असून इच्छुक विद्यार्थ्यांनी www.dvet.admission.gov.in⁠ या संकेतस्थळावर जाऊन माहिती पुस्तिकेचे वाचन करून अर्ज भरावेत. अर्ज भरल्यानंतर मूळ कागदपत्रांच्या छायांकित प्रतींसह जवळच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये अर्ज निश्चित करावेत. प्रवेशासंदर्भातील अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी जवळच्या आयटीआयमध्ये किंवा हातकणंगले येथील शासकीय आयटीआयमध्ये थेट संपर्क साधावा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी…

Read More

कोल्हापूर, दि. 22: जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील शेतकऱ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. जिल्ह्यातील सर्व पात्र व इच्छुक अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी तात्काळ अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी यांनी केले आहे. योजनेचे प्रमुख घटक आणि अनुदान मर्यादा- नवीन सिंचन विहीर : 4 लाख रु., जुनी विहीर दुरुस्ती : 1 लाख रु., शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण : 2 लाख रु., इनवेल बोअरिंग : 40 हजार रु., सोलर पंप : 50 हजार रु., पंप संच…

Read More

कोल्हापूर, दि. 22 (जिमाका) : मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्र, नवीन सर्किट हाऊसजवळ, ताराबाई पार्क येथील कुक्कूट प्रक्षेत्रावर सुधारित देशी कावेरी कोंबडीची खाण्याची व उबवणुकीची अंडी विक्रीस उपलब्ध करण्यात आली आहेत. उबवणुकीसाठीची अंडी प्रती नग 8 रुपये दराने, तर खाण्यासाठीची अंडी प्रती नग 4 रुपये दराने उपलब्ध आहेत. इच्छुक नागरिकांनी सोमवार ते शुक्रवार दुपारी 3 ते 5 या वेळेत केंद्राशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक 0231-2651729 वर संपर्क साधावा, असे आवाहन मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्राचे सहायक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. एस.एम. राऊत यांनी केले आहे. 0000

Read More

कोल्हापूर, दि. 22 (जिमाका) : शासनाकडून 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (HSRP) 31 डिसेंबर 2025 पर्यंत बसविण्याचे निर्देश देण्यात आले होते. जुन्या वाहनांना HSRP बसविण्याचे कामकाज बाकी असल्याने परिवहन आयुक्त कार्यालय परिपत्रकान्वये 1 एप्रिल 2019 पूर्वी उत्पादीत झालेल्या सर्व जुन्या नोंदणीकृत वाहनांना HSRP बसविण्यासाठी दिनांक 30 जूनपर्यंत नव्याने अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे. 1 जुलै पासून उच्च सुरक्षा नोंदणी पाटी (HSRP) न बसविणाऱ्या वाहनांवर वायुवेग पथकाव्दारे कारवाई करण्यात येणार आहे. तथापि, 30 जूनपर्यंत HSRP बसविण्यासाठी पुढील अपॉइंटमेंट मिळालेल्या वाहन मालकांवर कोणतीही कारवाई करण्यात येणार नाही. प्रादेशिक परिवहन कार्यालय, कोल्हापूर या कार्यालयात वाहन मालकीचे…

Read More

कोल्हापूर, दि. 21 (जिमाका): जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय यांच्या अधिपत्याखालील सैनिकी मुलां/ मुलींचे वसतिगृह, कोल्हापूर व पन्हाळा येथे 2026 -2027 या शैक्षणिक वर्षाकरिता प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात येत असून 21 मे पासून प्रवेश पुस्तिकांची विक्री सुरु करण्यात आली आहे. प्रवेश अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 31 जुलै आहे. सर्व युध्द विधवा / इतर माजी सैनिक विधवा/ माजी सैनिक व सेवारत सैनिक व अनाथ पाल्ये यांनी याचा लाभ घ्यावा. तसेच उर्वरित जागा सामान्य (सिव्हीलीयन) विद्यार्थ्यांना देण्यात येतील, असे आवाहन प्रभारी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सुभाष डोंगरे यांनी केले. वसतिगृह प्रवेशासाठी खालीलप्रमाणे प्राधान्यक्रम देण्यात येईल :- युध्द विधवा/ माजी सैनिकांच्या विधवांची सर्व पाल्ये…

Read More

कोल्हापूर, दि. 21 (जिमाका) : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ हे जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. शुक्रवार, 22 मे रोजी सकाळी 7 वाजता कागल निवासस्थानी सर्व नागरिकांसाठी राखीव. सकाळी 10.30 वाजता समाधान शिबीर. (स्थळ : गडहिंग्लज) दुपारी 1 ते 4 वाजता राखीव. दुपारी 4 वाजता विविध विषयांबाबात आढावा बैठक. (स्थळ : शेंडा पार्क, कोल्हापूर) सोयीनुसार कागल निवासस्थानाकडे प्रयाण, आगमन व मुक्काम. शनिवार, 23 मे रोजी सकाळी 7 वाजता कागल निवासस्थानी सर्व नागरिकांसाठी राखीव. सकाळी 10 वाजता कै.पी.एन.पाटील सडोलीकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त प्रतिमा पुजन कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ : पी.एन.पाटील गॅरेज, फुलेवाडी) सकाळी 11 वाजता लोकमत सरपंच ॲवॉर्ड वितरण सोहळ्यास उपस्थिती. (स्थळ : अमृत…

Read More

कोल्हापूर, दि. २० : राधानगरी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या शासकीय वसतिगृहात अनुसूचित जाती/जमाती,अपंग, अनाथ,विशेष मागास प्रवर्ग,विमुक्त भटक्या जमाती,आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक तसेच इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रवेश नोंदणी सुरू करण्यात आली आहे. वसतिगृहामध्ये माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालयीन, महाविद्यालयीन तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार असून इच्छुक विद्यार्थ्यांनी वेळेत नोंदणी करून प्रवेश प्रक्रियेचा लाभ घ्यावा, असे आवाहन अधीक्षक ए. जी. पाटील यांनी केले आहे. या वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यांना मोफत निवास व भोजनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असून दरमहा निर्वाह,स्टेशनरी आणि गणवेश भत्ता तसेच छत्री व रेनकोट भत्ता दिला जातो.अद्ययावत संगणक कक्ष इंटरनेट सुविधेसह, सुसज्ज ग्रंथालय आणि इतर आवश्यक सुविधा…

Read More

कोल्हापूर, दि. 19 (जिमाका) : कोल्हापूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (अ) ते (फ) आणि कलम 37 (3) अन्वये अपर जिल्हादंडाधिकारी गजानन गुरव यांनी संपूर्ण जिल्ह्यात 19 मे रोजी सकाळी 6 वाजल्यापासून ते 2 जून च्या मध्यरात्री 12 वाजेपर्यंत बंदी आदेश जारी केला आहे. हा हुकूम ज्या सरकारी अधिकारी, कर्मचारी यांना त्यांची कर्तव्य, अधिकार बजावण्यासंदर्भात कामकाज करताना उपनिर्दिष्ट वस्तू हाताळाव्या लागतात आणि एकत्र जमावे लागते व ज्या व्यक्तींनी पोलीस अधीक्षक अगर संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी अगर संबंधित विभागाचे पोलीस निरीक्षक किंवा सक्षम प्राधिकारी यांची परवानगी घेतलेली आहे, अशा व्यक्तींना तसेच सर्व…

Read More

कोल्हापूर दिनांक 18 – केर्ली ता.करवीर येथे भोसले ग्राहक सेवा केंद्र बँक ऑफ बडोदा BC पॉईंट व कॅम्पुटर प्रशिक्षण केंद्र याचे उद्घाटन केर्ली गावचे लोकप्रिय महिला सरपंच सौ. नीलम माने व अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मा. धीरज रूकडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष धीरज रुकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच करवीरचे व केर्लेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच केर्ली गावाचे प्रमुख नागरिक यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा संपन्न झाला. उद्घाटन सोहळ्यात अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे करवीर कार्याध्यक्ष रामचंद्र माने,केर्ले शाखेचे अध्यक्ष संदीप गायकवाड उपाध्यक्ष फिरोज नायकवाडे, केर्ले शाखेचे सदस्य…

Read More

कोल्हापूर, दि. 18 (जिमाका) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने पुरवठा या योजनेंतर्गत लाभ देण्यात येतो. सन 2026-27 या आर्थिक वर्षात शासनस्तरावरून प्राप्त झालेल्या उदिदष्ट व तरतूदीच्या अधिन इच्छुक अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील स्वयंसहाय्यता बचत गटांनी सहायक आयुक्त, समाज कल्याण, कोल्हापूर यांच्या नावे परिपूर्ण मागणी अर्ज आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह 1 जूनपर्यंत सादर करावेत. अर्जासोबत द्यावयाची कागदपत्रे पुढीलप्रमाणे – अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वंयसहाय्यता बचत गट हा पुरूष किंवा महिलांचा असावा. बचत गटांची नोंदणी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद अथवा पंचायत समिती कृषी…

Read More