Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: admin
कोल्हापूर, दि. २९ (जिमाका) : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत विविध कर्ज योजनांतर्गत कर्ज घेतलेल्या व थकबाकीदार असलेल्या लाभार्थ्यांसाठी एकरकमी परतावा (ओटीएस) योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत संपूर्ण थकीत कर्ज रकमेचा एकरकमी भरणा केल्यास थकीत व्याजाच्या ५० टक्के रकमेची सवलत देण्यात येणार आहे. ही योजना ३१ मार्च २०२७ पर्यंत लागू असून, पात्र लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घेऊन कर्जमुक्त व्हावे, असे आवाहन महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकांनी केले आहे. महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ हा राज्य शासनाच्या पूर्ण मालकीचा उपक्रम असून, महामंडळामार्फत इतर मागास प्रवर्गातील पात्र लाभार्थ्यांसाठी स्वयंरोजगाराच्या विविध योजना राबविण्यात येतात. महामंडळाकडून वितरित करण्यात आलेल्या कर्जाची…
कोल्हापूर, दि. २९ (जिमाका) : माजी सैनिक, विधवा व अवलंबितांचे प्रश्न सोडविण्यासह त्यांना कल्याण व पुनर्वसनाच्या विविध योजना आणि सवलतींची माहिती देण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील कल्याण संघटकांचे नोव्हेंबर महिन्यातील सुधारित मासिक दौरे आयोजित करण्यात आले आहेत. संबंधित तालुक्यांतील जास्तीत जास्त माजी सैनिक, विधवा व अवलंबितांनी या दौऱ्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सुभाष डोंगरे यांनी केले आहे. या दौऱ्यांतर्गत शुक्रवार, ६ नोव्हेंबर रोजी तहसील कार्यालय, गडहिंग्लज येथे, बुधवार, १८ नोव्हेंबर रोजी तहसील कार्यालय, चंदगड येथे, तर शुक्रवार, २० नोव्हेंबर रोजी तहसील कार्यालय, आजरा येथे कल्याण संघटक उपस्थित राहणार आहेत. हे दौरे संबंधित तहसीलदारांच्या कार्यालयात आयोजित…
कोल्हापूर, दि. 29 (जिमाका) : माहे नोव्हेंबरचा जिल्हास्तरीय लोकशाही दिन येत्या सोमवारी म्हणजेच 2 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराराणी सभागृहात सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आपल्या शासकीय, निमशासकीय विषयांकीत कामांच्या प्रशासकीय स्तरावरील वैयक्तिक तक्रारींबाबत न्याय मिळण्यासाठी स्वत: उपस्थित राहून अर्ज सादर करावा. शासन परिपत्रकातील मार्गदर्शक तत्वानुसार अर्ज स्वीकारले जातील. तसेच सकाळी 11 ते दुपारी 1 पर्यंत अर्ज स्विकारले जातील, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांनी दिली . तालुकास्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचा तिसरा सोमवार, जिल्हाधिकारी/ महानगरपालिका आयुक्त स्तर प्रत्येक महिन्याचा पहिला सोमवार, विभागीय आयुक्त स्तर प्रत्येक महिन्याचा दुसरा सोमवार व मंत्रालय स्तरावर प्रत्येक…
कोल्हापूर, दि.२८ (जिमाका) : कृषी विभागामार्फत पौष्टिक तृणधान्य पिकांच्या क्षेत्र विस्तारासाठी रब्बी ज्वारी पीक प्रात्यक्षिके आणि प्रमाणित बियाणे वितरण हा घटक राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यात ७८० हेक्टर क्षेत्रावर रब्बी ज्वारीची प्रात्यक्षिके राबविण्यात येणार असून, पात्र शेतकरी गटांना अनुदानाचा लाभ देण्यात येणार आहे. तसेच पात्र वैयक्तिक शेतकऱ्यांना रब्बी ज्वारीचे प्रमाणित बियाणे अनुदानावर वितरित करण्यात येणार आहे. पीक प्रात्यक्षिक घटकांतर्गत शेतकरी गटातील लाभार्थी शेतकऱ्यांना किमान ०.४० हेक्टर मर्यादेत 100 टक्के अनुदानावर लाभ देण्यात येणार आहे. यामध्ये बियाणे, बीजप्रक्रिया, पीक संरक्षण निविष्ठा, माती नमुने तपासणी, प्रशिक्षण व प्रशिक्षण साहित्य आदी बाबींचा समावेश आहे. रब्बी ज्वारी प्रमाणित बियाणे वितरणासाठी पात्र वैयक्तिक शेतकऱ्यांना…
कोल्हापूर, दि. 28 (जिमाका) : महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोक अदालत अभियानांतर्गत तहसिल कार्यालय पन्हाळा येथे नुकतेच महसूल लोक अदालतीचे आयोजन पार पडले . या लोक अदालतीसाठी एकूण ४५ प्रकरणांमध्ये संबंधितांना उपस्थित राहण्याबाबत नोटिसा देण्यात आल्या होत्या. त्यापैकी ३२ प्रकरणांमध्ये पक्षकार उपस्थित होते. यातील ३० प्रकरणांमध्ये दोन्ही पक्षकारांनी समक्ष परस्पर संमतीने तडजोड सादर केली. या महसूल लोक अदालतीमध्ये एकूण १४२ खातेदारांना लाभ दिल्या असल्याची माहिती तहसिलदार माधवी शिंदे यांनी दिली. महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान १ सप्टेंबर २०२६ ते ३१ मार्च २०२७ या कालावधीत राबविण्याबाबत निर्देश आहेत. त्यानुसार महसूल विषयक प्रकरणे सामोपचाराने निकाली काढण्यासाठी या अभियानांतर्गत लोक अदालतीचे…
कोल्हापूर विभागातील 570 टपाल कार्यालयांत आंतरराष्ट्रीय पार्सल सेवा उपलब्ध कोल्हापूर दि 28 (जिमाका) : दिवाळी हा भारतातील सर्वांत मोठा आणि आनंदाचा सण मानला जातो. दिवाळी म्हटले की घराघरांत तयार होणारा स्वादिष्ट फराळ, कुटुंबीयांची भेट आणि आनंदाचे वातावरण यांची आठवण होते. मात्र, शिक्षण, नोकरी व व्यवसायानिमित्त परदेशात वास्तव्यास असलेल्या अनेक नागरिकांना दिवाळीच्या सणात आपल्या घरच्या फराळाची विशेष आठवण येते. अशा नागरिकांना आपल्या परदेशातील नातेवाईकांना दिवाळीचा फराळ पाठविता यावा, यासाठी भारतीय डाक विभागामार्फत आंतरराष्ट्रीय पार्सल सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. कोल्हापूर डाक विभागांतर्गत एकूण 570 टपाल कार्यालयांमध्ये आंतरराष्ट्रीय पार्सल बुकिंगची सुविधा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना आपल्या घरातील तयार फराळ,…
-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस • संत रविदास महाराजांच्या ६५० व्या जयंती वर्षानिमित्त राज्यस्तरीय मुख्य कार्यक्रम नाशिक येथे होणार मुंबई, दि. २७ : संत रविदास महाराजांच्या ६५० व्या जयंती वर्षानिमित्त नोव्हेंबर २०२६ ते फेब्रुवारी २०२७ या कालावधीत राबविण्यात येणारे ‘हर घर संत रविदास विचार–विकसित महाराष्ट्र’ हे विशेष अभियान राज्यात व्यापक स्वरूपात राबवावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. संत रविदास महाराजांनी मांडलेले मानवता, समता, करुणा आणि दुःखमुक्त समाजाचे विचार तळागाळातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवावेत. त्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने प्रभावी अंमलबजावणी यंत्रणा उभारावी, असे निर्देशही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. सह्याद्री अतिथीगृह येथे संत रविदास महाराजांच्या ६५० व्या जयंती वर्षानिमित्त आयोजित विशेष…
कोल्हापूर दि २७ : जिल्ह्यातील बालकांचे आरोग्य सुदृढ राखण्यासाठी आणि त्यांना जंत संसर्गापासून मुक्त करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ करवीर तालुक्यातील उचगाव येथील कुमार व कन्या विद्यामंदिर येथे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.जॅसमीन यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थ्यांना अल्बेंडाझोल जंतनाशक गोळ्या देऊन मोहिमेची सुरुवात करण्यात आली. यावेळी मुख्य कार्य.अधिकारी डॉ. जॅसमीन यांनी राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहिमेचे महत्त्व विशद केले. बालकांच्या आरोग्याचे संरक्षण, शारीरिक वाढ आणि सर्वांगीण विकासासाठी जंतनाशक उपचार महत्त्वाचे असल्याचे सांगून जिल्ह्यातील एकही पात्र लाभार्थी या मोहिमेपासून वंचित राहणार नाही, याची सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दक्षता घ्यावी,अशी सूचनाही केली. जिल्ह्यात…
कोल्हापूर, दि. 27 (जिमाका) : कृषी विभागाच्यावतीने ‘महाराष्ट्र महिला सक्षमीकरण अधिनियम’ अंतर्गत,भोगावती महाविद्यालय कुरुकली येथे नुकतेच महिला शेतकरी प्रमाणपत्र नोंदणी विशेष प्रशिक्षण व मार्गदर्शन शिबीराचे कृषी विभाग व भोगावती महाविद्यालयाच्यावतीने आयोजन करण्यात आले होते . या कार्यक्रमात करवीर उपविभागीय कृषी अधिकारी अरुण भिंगारदिवे यांनी,महिला शेतकरी प्रमाणपत्र नोंदणीचे महत्त्व तसेच त्याद्वारे मिळणारे शासकीय लाभ आणि नोंदणीची प्रक्रिया याबाबत माहिती देवून महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्यास कुटुंब आणि समाज अधिक सशक्त होऊ शकतो असे सांगितले तर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.नेताजी पाटील यांनी महिला सक्षमीकरणासाठी कृषी विभागाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी महत्त्वाची असून, अशा उपक्रमांमुळे विद्यार्थिनी व महिलांमध्ये शेतीविषयक तसेच कायदेशीर बाबींबाबत जागरूकता निर्माण होण्यास मदत…
दुष्काळ म्हणजे केवळ पाऊस कमी पडणे नव्हे. पाण्याची टंचाई, शेतीच्या उत्पन्नात घट, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न, पशु पक्षांचा जगण्याचा प्रश्न, वाढता घरखर्च आणि रोजगाराच्या संधींवर होणारा परिणाम,असे त्याचे अनेक पैलू आहेत. मराठवाडा, विदर्भ आणि लगतच्या काही भागातील जनतेला दुष्काळाचे चटके वारंवार सहन करावे लागतात. अशा वेळी शासनाच्या मदतकार्याबरोबरच नागरिकांनीही उपलब्ध साधनसंपत्तीचा जपून वापर करणे आवश्यक आहे. जुन्या पिढीने अनुभवातून सांगितलेले एक वाक्य आजही महत्त्वाचे आहे, ‘दुष्काळ सगळ्यांना काटकसर शिकवतो!’ मात्र, ही काटकसर नेमकी कशी करावी, हे समजून घेणे अधिक महत्त्वाचे आहे. पाण्याचा अपव्यय टाळा, काटेकोर नियोजन करा. दुष्काळात प्रत्येक थेंब महत्त्वाचा असतो. पाण्याचे दुर्भिक्ष होऊ शकते हे आपल्या प्रत्येकाच्या लक्षात असले…