
कोल्हापूर, दि. २९ (जिमाका) : माजी सैनिक, विधवा व अवलंबितांचे प्रश्न सोडविण्यासह त्यांना कल्याण व पुनर्वसनाच्या विविध योजना आणि सवलतींची माहिती देण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील कल्याण संघटकांचे नोव्हेंबर महिन्यातील सुधारित मासिक दौरे आयोजित करण्यात आले आहेत. संबंधित तालुक्यांतील जास्तीत जास्त माजी सैनिक, विधवा व अवलंबितांनी या दौऱ्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सुभाष डोंगरे यांनी केले आहे.
या दौऱ्यांतर्गत शुक्रवार, ६ नोव्हेंबर रोजी तहसील कार्यालय, गडहिंग्लज येथे, बुधवार, १८ नोव्हेंबर रोजी तहसील कार्यालय, चंदगड येथे, तर शुक्रवार, २० नोव्हेंबर रोजी तहसील कार्यालय, आजरा येथे कल्याण संघटक उपस्थित राहणार आहेत.
हे दौरे संबंधित तहसीलदारांच्या कार्यालयात आयोजित करण्यात येतील. दौऱ्याच्या दिवशी शासकीय किंवा अन्य सुट्टी असल्यास संबंधित तालुक्याचा दौरा पुढील महिन्यात आयोजित करण्यात येईल, असे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
0000