Author: admin

कोल्हापूर दि : 27 (जिमाका) एनसीसी ग्रुप मुख्यालय, कोल्हापूरच्या अंतर्गंत ११ विद्यार्थ्यांची प्रजासत्ताक दिन परेड (2026) शिबिरासाठी निवड झाली आहे .यामध्ये 5 विद्यार्थी तर 6 विद्यार्थीनींचा समावेश आहे. या तुकडीत राज्यभरातून 127 एनसीसी विद्यार्थी सहभागी झाले आहेत.कोल्हापूर मुख्यालयासाठी हा अत्यंत अभिमान व गौरवास्पद क्षण आहे. निवड झालेले विद्यार्थी पुढीलप्रमाणे-सीनियर अंडर ऑफिसर हिमेश राठोड,रिद्धी पदमुखे,सर्जंट राधिका क्षत्रिय (डी.वाय.पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी),मधुरा बाटे (न्यू कॉलेज कोल्हापूर),सीनि.अंडर ऑफिसर ओंकार पवार (वाय.सी.कॉलेज ऑफ सायन्स, कराड) प्रसाद वांगेकर (गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग,कराड),प्रमोद चव्हाण,सुष्मिता राठोड(आर.पी.गोगटे जोगळेकर कॉलेज रत्नागिरी ज्युनि.अंडर ऑफिसर तनिष्का चव्हाण (सी.एस. कॉलेज सातारा) ज्युनि.अंडर ऑफिसर निशांत चव्हाण(विलिंग्डन कॉलेज सांगली) ज्युनि.अंडर ऑफिसर सृष्टी…

Read More

कोल्हापूर, दि. 24 (जिमाका) : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. गुरुवार, 25 डिसेंबर रोजी सकाळी 10.50 वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन व राखीव. सोमवार, 29 डिसेंबर रोजी रात्री 8 वाजता 8.50 वाजता महालक्ष्मी एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण. 0000

Read More

कोल्हापूर, दि. २४ : सायबर क्राईम आणि डिजिटल फसवणुकीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे प्रत्येक ग्राहकाने मोबाईल वापरताना जागरूक राहणे गरजेचे आहे. फसवणूक टाळण्यासाठी सतर्क राहा, असा सल्ला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या सदस्य रूपाली घाटगे यांनी दिला. राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त भवानी मंडप येथे आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी ‘ग्राहक प्रबोधन स्टॉल’चे उद्घाटन करण्यात आले. रूपाली घाटगे म्हणाल्या की, ग्राहक चळवळीमधील संघटनांचे काम उत्तम सुरू आहे. ग्राहक संरक्षण कायद्यानुसार ग्राहकांना ६ अधिकार देण्यात आले आहेत. या अधिकारांचे उल्लंघन झाल्यास दाद मागण्यासाठी ग्राहक संरक्षण कायदा अस्तित्वात आला. २०१९ च्या नवीन कायद्यामुळे ग्राहक आणि ग्राहक न्यायालयाच्या अधिकारात वाढ झाली असून,…

Read More

कोल्हापूर, दि. 23 : राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 288 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या अनुषंगाने संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू केली होती. दि. 29 नोव्हेंबर रोजीच्या आदेशान्वये 24 नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी सुधारित निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. मा. उच्च न्यायालय, मुंबई खंडपीठ नागपूर यांनी दि. 2 डिसेंबर रोजी दिलेल्या आदेशानुसार सर्व 288 नगरपरिषदा व नगरपंचायतींची मतमोजणी व निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया दि. 21 डिसेंबर 2025 रोजी होणार असल्याचे नमूद केले होते. तसेच तोपर्यंत संबंधित क्षेत्रांमध्ये आदर्श आचारसंहिता लागू राहील, असेही स्पष्ट करण्यात आले होते. या निर्णयाला मा. सर्वोच्च न्यायालयाने दि. 5 डिसेंबर 2025 रोजीच्या आदेशाद्वारे कायम…

Read More

कोल्हापूर, दि. 23 : राज्यातील महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम -2025 जाहीर झाला आहे. राखीव जागांसाठी निवडणूक इच्छुक उमेदवारांकडून अर्ज दाखल करण्याची अंतिम दि. 30 डिसेंबर असून निवडणूक लढविणाऱ्या अर्जदारांची गैरसोय होऊ नये यासाठी गुरुवार, 25 शनिवार, 27 व रविवार, 28 डिसेंबर या सुट्टीच्या दिवशी ‘फक्त निवडणूक विषयक अर्ज’ स्विकारण्याकरिता जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, कोल्हापूर येथील कार्यालय सुरु ठेवण्यात येणार आहे. फक्त निवडणूक विषयक अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांनी या करिता उपस्थित रहावे व अर्ज दाखल करुन पोहोच घ्यावी, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त तथा सदस्य भारत केंद्रे यांनी केले. विद्यार्थी विषयक व सेवाविषयक अर्ज सादर करणाऱ्या अर्जदारांचे…

Read More

कोल्हापूर, दि. 23 (जिमाका) : शासनाने प्रधानमंत्री क्षयमुक्त भारत अभियानाची सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. एस भिसे आणि क्षय व उरोरोगशास्त्र विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन कुंभार यांनी रुग्णालयातील दोन क्षय रुग्णांना व त्यांच्या घरातील व्यक्तींना पोषण आहारासाठी फुड बास्केटची मदत केली. या क्षयरुग्णांना किमान 6 महिन्यांकरीता सहा किट देण्यात येणार आहेत. त्यातील पहिल्या पोषण आहारासाठी फुड बास्केटची मदत देण्यात आली. यामध्ये बाजरी/ज्वारी तीन किलो, मटकी/वाटाणा किंवा मुगाची डाळ /तुरीची डाळ-दिड किलो, स्वयंपाक तेल-पाव किलो, शेंगदाणे-एक किलो असे एकूण एका महिन्याच्या पोषण आहारासाठी फुड बास्केटची…

Read More

कोल्हापूर, दि. 23 (जिमाका) : जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (अ) ते (फ) आणि कलम 37 (3) अन्वये संपूर्ण जिल्ह्यात 24 डिसेंबरच्या सकाळी 6 वाजल्यापासून ते 6 जानेवारी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत जिल्हा प्रशासनाकडून बंदी आदेश जारी करण्यात आला आहे. हा हुकूम सरकारी अधिकारी, कर्मचारी यांना त्यांची कर्तव्ये,अधिकार बजावण्यासंदर्भात आणि कामकाज करताना उपनिर्दिष्ट वस्तू हाताळाव्या लागतात तसेच एकत्र जमावे लागते व ज्या व्यक्तींनी पोलीस अधीक्षक, संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी अगर संबंधित विभागाचे पोलीस निरीक्षक किंवा सक्षम प्राधिकारी यांची परवानगी घेतलेली आहे, अशा व्यक्तींना तसेच सर्व जाती धर्माचे सण/उत्सव/जयंती/यात्रा इत्यादी शांततामय मार्गाने साजरे…

Read More

कोल्हापूर, दि. २३* : कोल्हापूरकरांच्या दातृत्वाचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे. पंतप्रधान क्षयमुक्त भारत अभियानांतर्गत ‘निक्षय मित्र’ होऊन क्षयरुग्णांना पोषण आहार किटची मदत देणाऱ्या अभियानामध्ये डिसेंबर २०२५ मध्ये प्रसिद्ध झालेल्या राज्यस्तरीय अहवालानुसार २०१३ क्षयरुग्णांना पोषण आहार किट पुरवून ‘कोल्हापूर ग्रामीण’ प्रथम क्रमांकावर आला आहे. या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीत सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे आणि जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. हर्षला वेदक यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. डॉ. हर्षला वेदक यांच्या उत्कृष्ट व्यवस्थापनाखाली राबविण्यात येणाऱ्या या अभियानास मदत करणाऱ्या सर्व ‘निक्षय…

Read More

कोल्हापूर – संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमीत्त, अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या पुढाकाराने आयोजित संविधान जनजागृती प्रश्नमंजुषा – २०२५ हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संविधानाचे महत्त्व, त्यातील मुलभूत अधिकार व कर्तव्ये याबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी राबविण्यात येत आहे. हा कार्यक्रम विद्यार्थ्यांना संविधानाची समज वाढविण्यासाठी, तज्ज्ञ मार्गदर्शन, अनुभवात्मक शिक्षण आणि अभ्यास साहित्य प्रदान करण्याच्या दृष्टीकोणातून अत्यंत महत्त्वाचा आहे. यामुळे विद्यार्थ्यांना जागरूक, उत्तरदायी आणि सशक्त नागरिक होण्याची संधी मिळणार असल्याचे आयोगाचे उपाध्यक्ष ॲड धर्मपाल मेश्राम यांनी सांगितले. नागपूर येथे या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी बार्टीचे महासंचालक सुनील वारे, संचालक शिक्षण, अवर सचिव अल्पसंख्याक विकास, सह सचिव इतर मागासवर्ग विभाग,…

Read More