Author: admin

कोल्हापूर दिनांक 27- पोदार इंटरनॅशनल स्कूल, कोल्हापूर येथे नृत्यकलेचा एक भव्य, मनोहारी आणि उत्साहपूर्ण सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. इंग्लंडमधील प्रसिध्द डान्सर कॅरन ले तसेच ‘पोदार एनरिचमेंट अकॅडमीच्या प्रमुख श्रीमती ज्योती गाला यांच्या विशेष उपस्थितीमुळे संपूर्ण शाळेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. कॅरन हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील सुप्रसिध्द डान्सर असून जगभरातील विविध नृत्य शैलींचा त्यांनी सखोल अभ्यास केलेला आहे. पॉपिंग वेव्हिग आणि टटिंग अशा विविध नृत्यशैलीत त्यांचा हातखंडा आहे. तसेच देश-विदेशातील विविध शाळा व कॉलेजमधील विद्यार्थ्यांना व तरुणांना ते नृत्याचे धडे देत आहेत. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे ब्रिटन्स गॉट टॅलेंट या नृत्य स्पर्धेत सहभागी होऊन त्यांनी प्रचंड लोकप्रियता मिळवली. तसेच गेली…

Read More

कोल्हापूर/सांगली, दि. 26 नोव्हेंबर 2025:* विजेचा वापर केल्यानंतरही बिलांचा मासिक भरणा नियमित होत नसल्याने कोल्हापूर परिमंडल अंतर्गत प्रामुख्याने घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक, सार्वजनिक सेवा व इतर वर्गवारीतील 4 लाख 10 हजार 378 ग्राहकांकडे 68 कोटी 34 लाख रुपयांची थकबाकी झाली आहे. वीज बिल थकवणाऱ्या कोल्हापूर परिमंडलातील 10 हजार 354 वीजग्राहकांचा वीजपुरवठा तात्पुरत्या स्वरूपात खंडीत करण्यात आला आहे. यात कोल्हापूर जिल्ह्यातील 5 हजार 835 तर सांगली जिल्ह्यातील 4 हजार 519 ग्राहकांचा समावेश आहे. थकबाकीदार वीजग्राहकांनी थकीत बिलांचा त्वरित भरणा करावा व वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळावी असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. कोल्हापूर परिमंडल अंतर्गत येणाऱ्या कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील घरगुती…

Read More

कोल्हापूर दिनांक 26- प्रभाग क्र 8 मधील उत्तरेश्वर पेठ नका ते जिव्हाळा कॉलनी जुना शिंगणापूर रोडवरील दोन्ही बाजूस काही शेतकऱ्यांनी उंच भराव टाकल्या मुळे जिव्हाळा कॉलनी विश्वभारती कॉलनी प्रबुद्धत भारत कॉलनी स्वराज्य कॉलनी आयडिल कॉलनी व सुतार माळ परिसरातील जवळ पास 125-150 घरे पुरा मुळे पाण्याखाली जातात या साठी आज भागातील सर्व नागरिकांनी सामूहिक आंदोलन केले त्यात प्रामुख्याने अविनाश पाटील यांच्या व नागरिकांच्या नेतृत्वाखाली रस्ता रोको करण्यात आला तसेच जुना रस्ता रस्ता खराब असल्या मुळे नवीन रस्ता करण्याचीही मागणी केली यावेळी उपशहर अभियंता सुरेश पाटील, दळवी मॅडम यांनी 8 दिवसात सर्व भर काडून कडक कार्यवाही करण्याची हमी दिली यावेळी अविनाश…

Read More

कोल्हापूर, दि. २४* : जिल्ह्यात विविध घटकांमधून होणाऱ्या प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी विविध पर्यायांसह ठोस उपाययोजना हाती घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात झालेल्या जिल्हा पर्यावरण समितीच्या बैठकीत प्रदूषण नियंत्रण मंडळ, कृषी, वन, जिल्हा परिषद आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांसोबत पर्यावरण विषयक सविस्तर चर्चा करण्यात आली. जिल्ह्यातील हवा, माती आणि पाणी स्वच्छ राहील, यासाठी विविध उपाययोजना आणि जनजागृती कार्यक्रम हाती घेण्यासाठी त्यांनी संबंधित विभागांना सूचना केल्या. बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी निखिल घरत, उपप्रादेशिक अधिकारी प्रमोद माने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगारे, सहायक वनसंरक्षक विलास काळे,…

Read More

कोल्हापूर दिनांक 21 – शिवसेना व शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष कोल्हापूर यांच्या वतीने श्री सुनील तुकाराम कानूरकर यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य शिबिर तपासणी व रक्तदान शिबिर घेण्यात आले त्यावेळी उपस्थितीत शिवसेना लाडकी बहीण योजनेच्या अध्यक्ष माननीय पवित्रा रांगणेकर उपजिल्हाप्रमुख किशोर घाडगे साहेब सुनील कानूरकर मंडलिक साहेब उपशहर प्रमुख सचिन क्षीरसागर भाई यांच्या उपस्थितीत व शिवसेनेचे पदाधिकारी कार्यक्रम पार पडला.

Read More

कोल्हापूर, दि. 7 (जिमाका) : अलीकडील काही दिवसांपासून मराठा समाजातील बेरोजगार युवकांसाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांबाबत “महामंडळाचे कामकाज बंद झाले आहे, व्याज परतावा थांबविण्यात आला आहे. अशा प्रकारच्या निराधार अफवा काही व्यक्तींकडून सोशल मीडियासह विविध माध्यमांतून पसरवल्या जात आहेत. या अफवांना कोणतेही तथ्य नसून, महामंडळाचे नवीन पात्रता प्रमाणपत्र देण्याचे काम वगळता इतर सर्व कामकाज सुरळीतपणे सुरु असल्याची माहिती अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्या. मुंबईचे व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे. दि. 10 ऑक्टोबर 2025 पासून महामंडळाच्या वेब प्रणालीचे अपग्रेडेशनचे काम हाती घेण्यात आले असून, त्यामागील प्रमुख कारणे खालीलप्रमाणे: वेब प्रणालीचे…

Read More

कोल्हापूर दिनांक 6- छत्रपती शिवाजी पुलानजीक आंबेवाडी रोडवर पुरबाधित क्षेत्रात भराव टाकण्याचे काम काही लोकांनी जोरात चालू केले असल्याचे दिसून येते.त्यामुळे नागरिकांच्यातून तीव्र नाराजी व्यक्त होत असून याचा फटका शुक्रवार पेठ परिसरातील नागरिकांना होणार असल्याने सदरचे काम त्वरित थांबविण्याची मागणी होत आहे. छत्रपती शिवाजी पुलानजीक यापूर्वी सुद्धा भराव टाकून त्याठिकाणी गाळे उभा करण्यात आलेले आहेत.मुळात महामार्गालगत असणारी जागा कोणाच्या अखत्यारीत आहे हे समजून येत नाही.परंतु सदर जागेमध्ये भराव टाकून त्याठिकाणी व्यवसायासाठी गाळे तयार करणे म्हणजे पूरग्रस्त भागातील नागरिकांच्या जीवाशी खेळ करणे होय.सदर ठिकाणी गाळे बांधण्यास परवानगी कोणी दिली याची चौकशी होणे गरजेचे आहे.सदर जागेतील सर्व बेकायदेशीर गाळे पाडून संबंधित जबाबदार…

Read More

चंदगड (प्रतिनिधी): चंदगड तालुक्यातील रहिवासी श्री. विठ्ठल व्यंकट पाटील (व्यवसाय – गवंडी काम) आणि कै. श्रीमती शशिकला विठ्ठल पाटील यांचा मुलगा जोतिबा विठ्ठल पाटील याने सप्टेंबर महिन्यात झालेल्या चार्टर्ड अकाउंटंट (CA) परीक्षेत यश संपादन करत आपल्या आई-वडिलांचे नाव उज्ज्वल केले आहे. अत्यंत साध्या घरातून, कष्टाच्या वातावरणातून जोतिबाने आपला प्रवास सुरु केला. शाळेत असतानाच अभ्यासाची आवड आणि प्रचंड जिद्द या जोरावर त्याने शिक्षणात सातत्य ठेवले. र. भा. माडखोलकर कॉलेज, चंदगड येथून पदवी शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने कोल्हापूर येथे काम करत करत CA चं शिक्षण पूर्ण केलं. त्याचबरोबर स्वतःचा टॅक्स कन्सल्टन्सी व्यवसाय सुरू करून आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले. या यशामागे त्याच्या…

Read More

कोल्हापूर दिनांक 6- कोल्हापूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी उमेदवारांचे पक्षप्रवेश जोरात सुरू आहेत.जुना बुधवार पेठेतून नेपोलियन सोनुले यांनी शिंदे गटात प्रवेश करून विरोधकांच्या समोर तगडे आव्हान निर्माण केले आहे.त्यामुळे विरोधक तुल्य बळ उमेदवार कोण देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. महानगरपालिकेच्या नवीन चार सदस्यीय प्रभाग रचनेनुसार येणारी निवडणूक पक्षीय पातळीवर जास्त लढावी लागणार असल्याचे दिसून येते.त्यानुसार सिद्धार्थनगर,जुना बुधवार पेठ ,शुक्रवार पेठ अशा परिसराचा समावेश यामध्ये झाल्याने उमेदवारांना मतदारांपर्यंत पोचण्यासाठी पायाला भिंगरी बांधून काम करावे लागणार आहे.त्यामुळे जुना बुधवार पेठेतून आपली उमेदवारी निश्चित समजून आपल्या कामाच्या जोरावर नेपोलियन सोनुले यांनी शिवसेना गटात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश करत शड्डू ठोकला…

Read More