
कोल्हापूर दि. 20 (जिमाका) : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी जिल्हा परिषद व त्याअंतर्गत 12 पंचायत समितीमार्फत 20 जानेवारी रोजी 722 उमेदवारांना 1 हजार 117 नामनिर्देशनपत्रे वितरण करण्यात आली . आज अखेर एकूण 2 हजार 633 उमेदवारांना 4 हजार 968 इतकी नामनिर्देशनपत्रे वितरीत करण्यात आली आहेत. आज 20 जानेवारी रोजी निवडणूक विभागातून 267 व निर्वाचक गणातून 328 नामनिर्देशपत्र दाखल झाली. आजअखेर निवडणूक विभागातून एकूण 309 तर निर्वाचक गणातून 371 नामनिर्देशपत्र दाखल झाली आहेत.
***