Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: admin
कोल्हापूर, दि. 23 (जिमाका) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या मिशन लक्षवेध योजनेअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील क्रीडा प्रतिभावान खेळाडूंसाठी जिल्हा क्रीडा प्रतिभा विकास केंद्राकरिता निवड चाचण्यांचे आयोजन करण्यात आले आहे. राज्य शासनाचा उद्देश ऑलिम्पिक स्तरावरील १२ क्रीडा प्रकारांमध्ये गुणवत्तापूर्ण खेळाडू घडविणे हा असून या योजनेतून क्रीडा प्रशिक्षण, पायाभूत सुविधा, स्पर्धा आयोजन, क्रीडा वैद्यकशास्त्र, प्रोत्साहन व करिअर मार्गदर्शन अशा विविध घटकांचा सर्वांगीण विकास करण्यात येणार आहे. ही योजना त्रिस्तरीय असून राज्यस्तरावर हाय परफॉर्मन्स सेंटर, विभागीय स्तरावर स्पोर्ट्स एक्सलन्स सेंटर आणि जिल्हास्तरावर क्रीडा प्रतिभा विकास केंद्र कार्यान्वित करण्यात येणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात कुस्ती, मैदानी खेळ, वेटलिफ्टिंग,…
कोल्हापूर – कोल्हापूर जिल्ह्यातील नृसिंहवाडी, आळते व सांगवडे ग्रामपंचायतीना भाविकांना सोयी सुविधा पुरविण्यासाठी यात्राकर ऐवजी सहाय्यक अनुदान 1 कोटी 25 लाख रुपये मंजूर करण्यात आले असून येत्या दोन दिवसात ही रक्कम ग्रामपंचायत खात्यावर जमा होणार आहे. नृसिंहवाडी,आळते,सांगवडे या तीर्थक्षेत्र असणाऱ्या गावाना लाखो भाविक दरवर्षी येत असतात त्यांना मूलभूत सोयी सुविधा देण्यात याव्यात म्हणून ग्रामपंचायतीकडून यात्राकर गोळा केला जात होता.त्यामुळे सदरचा यात्राकर गोळा करण्याऐवजी शासनाकडून सहाय्यक अनुदान मंजूर करण्यात आले असून त्यातून ग्रामपंचायतींनी भाविकांसाठी लागणाऱ्या सोयी सुविधा पुरविण्याच्या आहेत. त्यानुसार नृसिंहवाडी ग्रामपंचायत 50 लाख 75 हजार आळते ग्रामपंचायत 42 लाख 76 हजार व सांगवडे ग्रामपंचायत 29 लाख रुपये मंजूर करण्यात आले…
भारतीय समाजव्यवस्थेतील जातीभेदाच्या भिंती पाडण्यासाठी आणि शोषित-वंचितांना आत्मभान मिळवून देण्यासाठी ज्या काही मोजक्या ऐतिहासिक घटना घडल्या, त्यात ‘माणगाव परिषद’ हे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. २१ आणि २२ मार्च १९२० रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील माणगाव या छोट्याशा गावात ही परिषद संपन्न झाली. या परिषदेला आता १०६ वर्षे पूर्ण होत आहेत. ही परिषद केवळ एक राजकीय सभा नव्हती, तर ती भारतीय लोकशाहीच्या आणि सामाजिक समतेच्या प्रवासातील एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा होता आणि तो पुढे एक सामाजिक क्रांतीचा एल्गार ठरला. दोन युगपुरुष एकाच मंचावर : शाहू महाराज आणि डॉ. आंबेडकर माणगाव परिषदेचे सर्वात ऐतिहासिक आणि रोमांचक वैशिष्ट्य म्हणजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज…
कोल्हापूर दि : 17 (जिमाका) वाढत्या धकाधकीच्या कालखंडात तसेच शासकीय सेवेत असताना कार्यालयीन कामकाजामुळे शासकीय कर्मचाऱ्यांच्या तब्येतीवर होणारा परिणाम लक्षात घेऊन जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कक्ष व जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आज जिल्हाधिकारी कार्यालयात शासकीय कर्मचाऱ्यांसाठी एक दिवशीय मोफत मौखिक आरोग्य व सर्व रोग आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते . या आरोग्य शिबिराचे उद्घाटन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी बोलताना सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी स्वतःसह आपल्या कुटुंबीयांची नियमित आरोग्य तपासणी करून घ्यावी असे आवाहन करून जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सर्व रोग निदान तपासणी व्हॅनला भेट देवून उपस्थित डॉक्टरांशी संवाद साधला . याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी संजय…
कोल्हापूर, दि. १७ : जिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांना दृष्टीदोष असूनही आर्थिक अडचणीमुळे चष्मा घेणे शक्य होत नाही. ही बाब लक्षात घेऊन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या प्रयत्नातून आणि रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई यांच्या सहकार्याने ‘व्हिजन फॉर ऑल’ या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत आर.बी.एस.के. कार्यक्रमातून शासकीय व निमशासकीय शाळांमधील गरजू मुला-मुलींना मोफत चष्मे देण्यात येत आहेत. या उपक्रमाअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात एकूण ५ हजार २८० विद्यार्थ्यांना मोफत चष्मे वितरित करण्यात आले आहेत. तालुकानिहाय तपशील पुढीलप्रमाणे आहे – आजरा १९९, भुदरगड १७४, चंदगड २८, गडहिंग्लज २१२, गगनबावडा १८, हातकणंगले ६८४, कागल १८७, करवीर ४०५,…
कोल्हापूर, दि. 17 (जिमाका) : पर्यटन संचालनालयामार्फत नमो पर्यटन कौशल्य प्रशिक्षण योजना अंतर्गत पुणे विभागातील इच्छुक युवक, युवतींसाठी Tourist Guide Training आयोजित करण्यात येणार आहे. या प्रशिक्षणामध्ये पर्यटन स्थळांवर मार्गदर्शन, आदरातिथ्य सेवा व पर्यटन संबंधित कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यात येणाऱ्या पर्यटकांना स्थानिक पर्यटन स्थळांची माहिती करून देण्यासाठो पर्यटन संचालनालयामार्फत पर्यटन सुलभ मार्गदर्शक (टूर गाइड) तयार करण्यात येणार आहे. यासाठी स्थानिक युवकांना प्रशिक्षण दिले जाणार असून, त्यांना रोजगाराची संधी मिळणार आहे. इच्छुकांनी गुगल फॉर्मवर अर्ज करावेत, असे आवाहन पर्यटन संचालनालयाचे उपसंचालक भरत लांघी यांनी केले. पुणे प्रादेशिक विभागातील (पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर) इच्छुक उमेदवारांना सहभाग घेता येणार…
कोल्हापूर, दि. १४* : जिल्ह्यात गॅस सिलेंडरची कृत्रिम टंचाई निर्माण झाल्याने सध्या वितरणांच्या ठिकाणी रांगा पाहायला मिळत आहेत. मात्र, नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता केवळ आवश्यकतेनुसारच बुकिंग करावे. जिल्ह्यात दररोज ६५ हजार सिलेंडरचा पुरेसा साठा उपलब्ध असून, टंचाईची भीती न बाळगता गरज असेल तेव्हाच नोंदणी करावी, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले आहे. आखाती देशांतील युद्धाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात उद्भवलेल्या गॅस व इंधन टंचाईच्या अनुषंगाने पालकमंत्री आबिटकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन सभागृहात प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. यावेळी खासदार छत्रपती शाहू महाराज, महापौर रुपाराणी निकम, आमदार अशोक माने, जिल्हाधिकारी अमोल येडगे, महापालिका सदस्य आदिल फरास, निवासी उपजिल्हाधिकारी…
कोल्हापूर, दि. 13 (जिमाका) : सोमवार, 16 मार्च रोजी प्रशासकीय इमारत, तहसिल कार्यालय, आजरा येथे सकाळी 11 वाजता लोकशाही दिन आयोजित करण्यात आला आहे. आजरा तालुक्यातील सर्व नागरिकांनी आपल्या शासकीय, निमशासकीय विषयांकीत कामांच्या प्रशासकीय स्तरावरील वैयक्तिक तक्रारीबाबत न्याय मिळण्यासाठी स्वत: उपस्थित राहू अर्ज सादर करावा, असे आवाहन आजरा तहसिलदार समीर माने यांनी केले आहे. अर्ज विहित नमुन्यात असावा (नमुना प्रपत्र 1 अ ते 1 ड), तक्रार, निवेदन वैयक्तिक स्वरुपाची असावी, चारही स्तरावरील लोकशाही दिनाकरिता अर्जदाराने अर्ज विहित नमुन्यात 15 दिवस आधी 2 प्रतीत पाठविणे आवश्यक राहिल. तालुका लोकशाही दिनानंतर एक महिन्याने जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त लोकशाही दिनात अर्ज करता येईल. जिल्हाधिकारी,…
कोल्हापूर, दि. 13 (जिमाका) : जिल्ह्यात PM National Apprenticeship Mela (PMNAM) अंतर्गत शिकाऊ उमेदवारी भरती (Apprenticeship) मेळावा सोमवार, 16 मार्च रोजी सकाळी 10 वाजता AVTS Hall, राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कळंबा रोड येथे आयोजित केलेला आहे. या मेळाव्यास जिल्ह्यातील नामांकीत आस्थापना सहभागी होणार आहेत. तरी आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र घेवून मेळाव्यास उपस्थित रहावे, असे आवाहन मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्र व्दारा राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार श्री. आवटे यांनी केले. 0000
कोल्हापूर, दि. 13 (जिमाका): चिकोत्रा प्रकल्पाच्या चिकोत्रा नदी भागामध्ये पाटबंधारे विभाग (दक्षिण)चे कार्यकारी अभियंता देवाप्पा शिंदे यांनी पाटबंधारे अधिनियम 1976 नुसार शेतीसाठी पाणी उपसा करणाऱ्या उपसा यंत्रावर उपसाबंदी लागू केली आहे. चिकोत्रा नदी को.प. बंधारा 1 ते को.प. बंधारा बेळुंखी (29) वर 21 ते 29 मार्चपर्यंत, 18 ते 26 एप्रिलपर्यंत, 16 ते 24 मे याप्रमाणे उपसाबंदी करण्यात आली आहे. उपसाबंदी कालावधीत अनाधिकृत उपसा आढळून आल्यास, संबंधित उपसा यंत्र जप्त करुन परवानाधारकाचा उपसा परवाना 1 वर्षाच्या कालावधीसाठी रद्द करण्यात येईल. होणाऱ्या नुकसानीस पाटबंधारे खाते जबाबदार राहणार नाही, असे पाटबंधारे विभागामार्फत कळविण्यात आले आहे. 000