Author: admin

कोल्हापूर, दि. 05 (जिमाका): जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने 11 ते 20 मे या कालावधीत छत्रपती शिवाजी स्टेडियम, कोल्हापूर येथे उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर दररोज सकाळी 6 ते दुपारी 12.30 वाजेपर्यंत चालणार आहे. या शिबिरामध्ये योगा, ॲथलेटिक्स, व्हॉलीबॉल, कुस्ती, जलतरण, हॉकी, फुटबॉल, मल्लखांब, जिम्नॅस्टिक, ज्युदो, लाठी-काठी तसेच एरोबिक्स या विविध क्रीडा प्रकारांचे मूलभूत प्रशिक्षण दिले जाणार आहे. तज्ञ प्रशिक्षकांकडून प्रात्यक्षिकांसह खेळांचे कौशल्य शिकवून सराव घेतला जाणार आहे. याशिवाय, खेळाडूंना आवश्यक असणाऱ्या आहारविषयक मार्गदर्शनासोबतच फिजिओथेरपी व प्रथमोपचार याबाबत तज्ञ व्यक्तींची व्याख्यानेही आयोजित करण्यात येणार आहेत. शिबिरासाठी 8 ते 16 वयोगटातील प्रथम नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात…

Read More

कोल्हापूर, दि. 05 (जिमाका): पंचगंगा व भोगावती नद्यांच्या दोन्ही तीरावरील नमूद केलेल्या भागात रब्बी हंगाम 2026-27 मधील कालावधीत शेतीसाठी पाणी उपसा करणा-या उपसा यंत्रावर कोल्हापूर पाटबंधारे विभाग (उत्तर) च्या कार्यकारी अभियंता स्मिता माने यांनी महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम 1976 कलम 51 (3) व 97 मधील तरतूदीनुसार असलेल्या अधिकारान्वये उपसाबंदी जाहीर केली आहे. भोगावती नदी कार्यवाहीचा भाग- राधानगरी धरणापासून ते शिंगणापूर कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्यापर्यंच्या भोगावती नदीवरील दोन्ही तीरावरील भाग व कासारी नदीवरील यवलूज को.प. बंधाऱ्याच्या खाली ते शिंगणापूर को.प. बंधाऱ्यापंर्यंत दोन्ही तीरावर व कुंभी नदीवरील सांगरुळ को.प. बंधाऱ्याच्या खालील बांजू कुंभी व भोगावती नदीपर्यंतच्या संगमांपर्यंत दोन्हा तीरावर वर नमूद केलेल्या नदीवरील भागात…

Read More

कोल्हापूर, दि. 05 (जिमाका): जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व मॉडेल करिअर सेंटर, कोल्हापूर आणि डी. आर. माने महाविद्यालय कागल यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, 8 मे रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत डी. आर. माने महाविद्यालय, कागल येथे नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. या रोजगार मेळाव्यामध्ये 11 पेक्षा जास्त खासगी उद्योजकांनी सहभाग दर्शविला असून, त्यांच्याकडून उत्पादन क्षेत्रातील 250 पदे व सेवा क्षेत्रातील 150 पदे अशी सुमारे 400 पेक्षा जास्त रिक्तपदे या रोजगार मेळाव्याकरिता कळविण्यात आलेली आहेत. या पदांकरीता किमान 10 वी, 12 वी, आयटीआय, डिप्लोमा, बी.ई. तसेच कोणत्याही…

Read More

कोल्हापूर, दि. 05 (जिमाका): जिल्हा परिषद कोल्हापूर येथील महिला व बाल कल्याण समितीची पहिली सभा नवनियुक्त सभापती विद्या पाटील यांच्या अध्यक्षतेखाली स्व. वसंतराव नाईक समिती सभागृहात उत्साहात पार पडली. सभेच्या प्रारंभी जिल्हा कार्यक्रम अधिकारी तथा सचिव नितीन मस्के यांनी सभापती विद्या पाटील तसेच नवनियुक्त सदस्य वर्षाराणी पाटील, शिवानी भोसले, शैलजा पाटील, रोहिणी आबिटकर, संयोगिता मोरे, सोनाली पाटील आणि पंचायत समिती गडहिंग्लजच्या सभापती प्रतिभा चव्हाण यांचे स्वागत केले. यावेळी सन २०२६-२७ या वर्षातील विभागाच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. सभेत विविध महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा करून काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. सन २०२५ च्या शासन निर्णयानुसार सुरू असलेल्या लोककल्याणकारी योजनांची सन २०२६-२७ मध्ये…

Read More

कोल्हापूर, दि.०५ :* जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी मे अखेरपर्यंत नाले सफाईची कामे पूर्ण करून प्रशासनाला तसे प्रमाणपत्र सादर करावे. तसेच, संभाव्य पूरबाधित गावांतील नागरिकांसाठी निश्चित केलेल्या निवारागृहांमध्ये पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे आणि स्नागृहांच्या सुविधा सज्ज ठेवाव्यात. ऐनवेळी धावपळ करण्यापेक्षा वेळेत नियोजन करा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी शाहूजी सभागृहात आयोजित मान्सूनपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्ह्यातील आणि लगतच्या जिल्ह्यातील सर्व धरणांमधील यंत्रणेचा समन्वय, पूरस्थितीमध्ये कोणत्याही परिस्थितीत जीवितहानी होता कामा नये, हाच प्रशासनाचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. या बैठकीला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, अतिरिक्त…

Read More

कोल्हापूर, दि.04: श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी/अंबाबाई देवस्थान परिसर विकास आराखड्यांतर्गत प्राथमिक सर्वेक्षणास आजपासून सुरुवात करण्यात आली आहे. हे सर्वेक्षण तीन पथकांमार्फत राबविण्यात येत असून प्रत्येक पथकात कोल्हापूर महानगरपालिकेचे कनिष्ठ अभियंता पथक प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. प्रत्येक पथकात एक ग्राम महसूल अधिकारी, एक परिरक्षण भूमापक तसेच घरफाळा विभागाचे दोन कर्मचारी यांचा समावेश आहे. या प्राथमिक सर्वेक्षणामध्ये एकूण 137 सिटी सर्व्हे क्रमांक समाविष्ट आहेत. त्यापैकी आजच्या पहिल्याच दिवशी 35 सिटी सर्व्हे क्रमांकांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून 7 सिटी सर्व्हे क्रमांकांचे काम अंशतः पूर्ण झाले आहे. सर्वेक्षण प्रक्रियेला मिळकतधारकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. काही ठिकाणी मालकांऐवजी कुळ वास्तव्यास असल्याने संबंधित मिळकतधारकांचा संपर्क क्रमांक…

Read More

कोल्हापूर, दि. ०४ : सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली अन्न व औषध प्रशासन विभाग (FDA) विभागाची महत्त्वाची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. या बैठकीमध्ये प्रामुख्याने ‘अजिनोमोटो’ (मोनोसोडियम ग्लुटामेट) या पदार्थाच्या वाढत्या वापरामुळे मानवी आरोग्यावर होणाऱ्या गंभीर दुष्परिणामांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. हॉटेल व्यावसायिक आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडून याचा वापर मोठ्या प्रमाणात होत असून, त्याचे आरोग्यास घातक असलेले स्वरूप सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी व्यापक जनजागृती मोहीम राबविण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. तसेच, या पदार्थाच्या विक्रीवर आणि वापरावर कायदेशीररित्या बंदी आणण्यासाठी कोणत्या तांत्रिक व प्रशासकीय तरतुदी करता येतील, याचा सखोल आढावा घेण्याचे निर्देशही संबंधित विभागांना…

Read More

कोल्हापूर, दि. 4 (जिमाका) : कोल्हापूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (अ) ते (फ) आणि कलम 37 (3) अन्वये अपर जिल्हादंडाधिकारी गजानन गुरव यांनी संपूर्ण जिल्ह्यात 4 मे रोजी सकाळी 6 वाजल्यापासून ते 16 मे च्या मध्यरात्री 12 वाजेपर्यंत बंदी आदेश जारी केला आहे. हा हुकूम ज्या सरकारी अधिकारी, कर्मचारी यांना त्यांची कर्तव्य, अधिकार बजावण्यासंदर्भात कामकाज करताना उपनिर्दिष्ट वस्तू हाताळाव्या लागतात आणि एकत्र जमावे लागते व ज्या व्यक्तींनी पोलीस अधीक्षक अगर संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी अगर संबंधित विभागाचे पोलीस निरीक्षक किंवा सक्षम प्राधिकारी यांची परवानगी घेतलेली आहे, अशा व्यक्तींना तसेच सर्व…

Read More

कोल्हापूर, दि. 4 (जिमाका) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2026 उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) निकाल शनिवार, 2 मे रोजी ऑनलाइन जाहीर करण्यात आला. निकालानंतर राज्य मंडळ स्तरावरून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व समुपदेशन करण्यासाठी समुपदेशन सेवा सुरु ठेवण्यात येत असून या समुपदेशकांचे भ्रमणध्वनी क्रमांक पुढीलप्रमाणे – ९९६०६४४४११, ७९७२५७३७४२, ९८३४०८४५९३, ९३५९९७८३१५, ८१६९२०२२१४, ९३७१६६१२५५, ७२०८४२९३८१, ७७०९१५६०६८, ८४२११५०५२८, ९४०४७८३९९६ हे समुपदेशक परीक्षेच्या निकालाच्या दिवसापासून आठ दिवस सकाळी 8 ते रात्री 8 या कालावधीत विद्यार्थ्यांना भ्रमणध्वनीद्वारे निशुल्क आवश्यक ते समुपदेशन करतील. याची विद्यार्थी व पालकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. दिपक…

Read More

कोल्हापूर, दि. 4 (जिमाका) : 5 महाराष्ट्र राष्ट्रीय छात्रसेना पथक, कोल्हापूर कार्यालयामार्फत मे 2026 ते मार्च 2027 पर्यंत एनसीसी भवन, शिवाजी विद्यापीठ आवार येथे वेगवेगळी वार्षिक प्रशिक्षण शिबीरे आयोजित करण्यात येणार आहेत. त्यासाठी प्रतिदिन न्याहरी व जेवण पुरवठा करण्यासाठी प्रत्येक व्यक्ती प्रती दिन खर्चाचे दरपत्रक 8 मे पर्यंत समादेशक अधिकारी 5 महाराष्ट्र राष्ट्रीय छात्रसेना पथक, एनसीसी भवन, पहिला मजला, शिवाजी विद्यापीठ आवार, कोल्हापूर येथे पाठवावीत. अधिक माहितीसाठी 5 महाराष्ट्र राष्ट्रीय छात्रसेना पथक, एनसीसी भवन, पहिला मजला, शिवाजी विद्यापीठ आवार, कोल्हापूर दूरध्वनी क्रमांक 0231-2694573 वर संपर्क साधावा, असे आवाहन 5 महाराष्ट्र राष्ट्रीय छात्रसेना पथक, एनसीसी भवनचे कमांडींग ऑफिसर यांनी केले आहे.…

Read More