Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: admin
अघोरी विचारातून रस्त्यावर लिंबू-मिरची टाकल्याने, करणीमुळे एखाद्याचे आयुष्य उद्ध्वस्त होते, अघोरी विधी केल्याने शत्रूचा नायनाट होतो किंवा चमत्काराने आजार बरा होतो, अशा समजुती जेव्हा माणसाच्या विवेकावर मात करतात, तेव्हा अंधश्रद्धा ही केवळ वैयक्तिक श्रद्धेची बाब राहत नाही; ती गुन्हेगारीला खतपाणी घालणारी सामाजिक समस्या बनते. भीती, असहायता आणि अज्ञान यांचा गैरफायदा घेत विकृत भोंदू बाबा, मांत्रिक आणि फसवे लोक आर्थिक लूट, शारीरिक छळ, लैंगिक अत्याचार आणि अमानुष कृत्यांसारख्या गंभीर गुन्ह्यांना खतपाणी घालतात. त्यामुळे अंधश्रद्धेकडे केवळ चुकीची समजूत म्हणून नव्हे, तर समाजाच्या सुरक्षिततेसमोरील एक गंभीर आव्हान म्हणून पाहण्याची गरज आहे. स्मशानभूमीच्या परिसरात अघोरी पूजा, नदी घाटावर जादूटोण्याचे विधी, करणी काढण्याच्या नावाखाली उपचार,…
मतदानाचा दिवस उजाडतो. उत्साहाने एक नागरिक मतदान केंद्रावर पोहोचतो. रांगेत उभा राहतो. त्याची वेळ येते. मात्र मतदार यादी तपासल्यानंतर त्याला सांगितले जाते आपले नाव यादीत नाही. काही क्षणांसाठी तो स्तब्ध होतो. मतदानाचा अधिकार असतानाही तो त्या दिवशी तो वापरू शकत नाही. त्या क्षणी त्याला जाणवते की लोकशाहीतील सर्वात मोठा अधिकार केवळ मतदानाच्या दिवशी मिळत नाही; तो त्याही आधी मतदार यादीत आपल्या नावाच्या अचूक नोंदीपासून सुरू होतो. ही जाणीव प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचावी, यासाठी भारत निवडणूक आयोग वेळोवेळी मतदार यादी अद्ययावत ठेवण्याचे काम करतो. त्याचाच एक महत्त्वाचा भाग म्हणजे विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण (एसआयआर). ही प्रक्रिया केवळ प्रशासकीय उपक्रम नाही; ती…
मुंबई, दि 7 जुलै: जुलै च्या सुरुवातीला मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रात अति वृष्टी झाली असली तरी राज्यातील विविध भागांमध्ये आता पर्यंत सरासरी पेक्षा कमी पाऊस झाला आहे, विशेषतः खानदेश (धुळे आणि नंदुरबार जिल्हे), मध्य महाराष्ट्र (अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्हे), पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भाग. 8 जुलैपासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाच्या प्रमाणात लक्षणीय घट होण्याचा अंदाज असून, ही परिस्थिती किमान पुढील 10 दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. या दरम्यान राज्यातील विविध भागांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस अपेक्षित आहे. तसेच, राज्यातील कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्राथमिक अंदाजानुसार जुलै महिन्याच्या दुसऱ्या अर्ध्यात पहिल्या अर्ध्याच्या तुलनेत पावसाचे प्रमाण कमी राहू शकते.…
कोल्हापूर, दि. 06 (जिमाका): हॅन्डीकॅप व्यवसाय प्रशिक्षण व रोजगार उद्योग केंद्र (संमिश्र कार्यशाळा) येथे अस्थीव्यंग, मुखबधीर, अंध आणि मतिमंद प्रवर्गातील दिव्यांग व्यक्तींसाठी विविध व्यवसाय प्रशिक्षण अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. या प्रशिक्षणामध्ये कॉम्प्युटर, मोबाईल रिपेअरिंग, हस्तकला, टायपिंग, बागकाम, फॅशन डिझाईन असे विविध कोर्सचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना स्टायफंडचीही सुविधा उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह व भोजनाची मोफत सोय असून प्रवेश मर्यादित असल्याने इच्छुक दिव्यांगांनी लवकरात लवकर प्रवेश निश्चित करावा. अधिक माहितीसाठी यशोधा विश्वास कॉलनी, आण्णासो शिंदे शाळेजवळ, लक्षतीर्थ वसाहत, कोल्हापूर मोबाईल 8793747455 व 9107059797 या क्रमांकांवर इच्छुकांनी संपर्क साधावा. 0000
कोल्हापूर, दि. 7 (जिमाका) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णयान्वये सन 2026-27 या आर्थिक वर्षात अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने पुरवठा योजनेअंतर्गत लाभ मिळविण्यासाठी अर्ज सादर करण्यास यापूर्वी 3 जुलैपर्यंत मुदत देण्यात आली होती. तथापि या कालावधीत अतिवृष्टी व महा ई-सेवा केंद्र यांच्या संपामुळे लाभार्थ्यांना कागदपत्रे प्राप्त करुन घेण्यास अडचणी निर्माण झाल्यामुळे अल्प प्रमाणात अर्ज प्राप्त झाले असल्याने या योजनेंतर्गत लाभ मिळण्यासाठी इच्छुक बचत गटांना अर्ज सादर करण्यासाठी 17 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन साळे यांनी दिली. 0000
कोल्हापूर, दि. 06 (जिमाका): पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर वन विभागाच्या हद्दीतील सवतकडा धबधबा (ता. भुदरगड), बर्की धबधबा (ता. शाहूवाडी), रामतिर्थ धबधबा (ता. आजरा), तिलारी परिसरातील धबधबे (ता. चंदगड) तसेच मसाई पठार येथे मोठ्या प्रमाणावर पर्यटक भेट देताहेत. या पार्श्वभूमीवर पर्यटकांनी स्वतःची व कुटुंबीयांची सुरक्षितता लक्षात घेऊन आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन कोल्हापूर वन विभागाचे उपवनसंरक्षक धैर्यशिल पाटील यांनी केले आहे. वन विभागाने पर्यटकांना धबधब्याच्या खोल पाण्यात जाणे, धोकादायक ठिकाणी सेल्फी काढणे आणि निसरड्या कड्यांवर किंवा दगडांवर चढ-उतार करणे टाळण्याचा सल्ला दिला आहे. लहान मुलांवर सतत लक्ष ठेवावे, मद्यपान करून पर्यटनस्थळी किंवा पाण्यात उतरू नये, तसेच वन विभाग, पोलीस व स्थानिक प्रशासनाच्या…
कोल्हापूर, दि. 06 (जिमाका): राज्यातील इतर मागासवर्गीयांच्या सर्वांगिण कल्याणासाठी कार्यरत असलेले महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ व या महामंडळाअतंर्गत विविध इतर मागास प्रवार्गातील कार्यरत 13 उपकंपन्या शासनाने स्थापन केल्या असुन कोल्हापूर जिल्हास्तरावरील कामकाज कार्यान्वित करण्यात आलेले आहे. या महामंडळ व उपकंपन्यामार्फत 2026-27 या आर्थिक वर्षासाठी थेट कर्ज योजना, बीजभांडवल योजना, वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना, शैक्षणिक कर्ज व्याज परतावा व महिला स्वयंसिध्दी व्याज परतावा योजना अशा एकूण 6 योजना राबविण्यात येत आहेत. या सर्व योजना संपुर्णपणे ऑनलाईन स्वरुपाच्या असुन इतर मागास प्रवर्गातील पात्र अर्जदारास नाव नोंदणीसाठी महामंडळाच्या www.msobcfdc.org पोर्टलवरुन आवश्यक कागदपत्रांसह अर्ज…
कोल्हापूर, दि. २ (जिमाका) राज्य शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना-२०२६’ अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना लवकरात लवकर लाभ मिळावा, यासाठी कर्ज खात्यांची तपासणी आणि माहिती अपलोड करण्याचे काम जवळपास पूर्ण होत आले असून शासन निर्देशानुसार पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक निलकंठ करे यांनी दिली . कोल्हापूर जिल्ह्यातील २९ हजार ६५० शेतकरी कर्जखात्यांचे लेखापरीक्षण पूर्ण झाले आहे .या कर्ज खातेदारांपैकी सुमारे २९ हजार ४०९ खातेदारांची माहिती शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे.उर्वरीत लाभधारकांची माहिती अपलोड करण्याचे काम सध्या सुरु आहे .लवकरच या कर्ज खातेधारकांमधून पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. या योजनेअंतर्गत १ एप्रिल २०१९…
मुंबई, दि. २ : गंभीर अपघातामुळे उपचारासाठी आर्थिक अडचणीत सापडलेल्या १०० वर्षीय सरूबाई मुंजवार यांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून अवघ्या २४ तासांत आर्थिक सहाय्य मंजूर करण्यात आले. या सहाय्यामुळे त्यांच्यावर आवश्यक शस्त्रक्रिया वेळेत पार पडून पुढील उपचार तातडीने सुरू करणे शक्य झाले. सरूबाई मुंजवार या रस्ता ओलांडत असताना भरधाव दुचाकीच्या धडकेत गंभीर जखमी झाल्या. या अपघातात त्यांच्या डाव्या मांडीला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर त्यांना फलटण येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. उपचारासाठी सुमारे सव्वा लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याने त्यांच्या कुटुंबासमोर आर्थिक अडचण निर्माण झाली. नातेवाईकांच्या माध्यमातून मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी…
कर्जमुक्ती ही केवळ खर्च नाही; ती राज्यातील अन्नदात्यांच्या भविष्यावर केलेली खरी गुंतवणूक आहे. राज्य शासनाने जाहीर केलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’ कडे पाहताना ही भावना प्रकर्षाने जाणवते. ही योजना केवळ थकीत कर्जाची रक्कम माफ करण्यापुरती मर्यादित नाही, तर शेती, शेतकरी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला नव्याने सक्षम करण्याचा दूरदृष्टीचा प्रयत्न आहे. महाराष्ट्रातील शेती ही आजही मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक परिस्थितीवर अवलंबून आहे. गेल्या काही वर्षांत अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, दुष्काळ, महापूर, गारपीट, रोगराई आणि वाढता उत्पादन खर्च या संकटांनी शेतकऱ्यांची आर्थिक घडी विस्कटली आहे. अशा वेळी अनेक शेतकरी पीक कर्ज घेतात; मात्र प्रतिकूल परिस्थितीमुळे वेळेत परतफेड करता येत नाही. परिणामी ते नव्या…