
कोल्हापूर, दि. 06 (जिमाका): हॅन्डीकॅप व्यवसाय प्रशिक्षण व रोजगार उद्योग केंद्र (संमिश्र कार्यशाळा) येथे अस्थीव्यंग, मुखबधीर, अंध आणि मतिमंद प्रवर्गातील दिव्यांग व्यक्तींसाठी विविध व्यवसाय प्रशिक्षण अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.
या प्रशिक्षणामध्ये कॉम्प्युटर, मोबाईल रिपेअरिंग, हस्तकला, टायपिंग, बागकाम, फॅशन डिझाईन असे विविध कोर्सचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
तसेच विद्यार्थ्यांना स्टायफंडचीही सुविधा उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह व भोजनाची मोफत सोय असून प्रवेश मर्यादित असल्याने इच्छुक दिव्यांगांनी लवकरात लवकर प्रवेश निश्चित करावा.
अधिक माहितीसाठी यशोधा विश्वास कॉलनी, आण्णासो शिंदे शाळेजवळ, लक्षतीर्थ वसाहत, कोल्हापूर मोबाईल 8793747455 व 9107059797 या क्रमांकांवर इच्छुकांनी संपर्क साधावा.
0000