
कोल्हापूर, दि. 7 (जिमाका) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णयान्वये सन 2026-27 या आर्थिक वर्षात अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने पुरवठा योजनेअंतर्गत लाभ मिळविण्यासाठी अर्ज सादर करण्यास यापूर्वी 3 जुलैपर्यंत मुदत देण्यात आली होती.
तथापि या कालावधीत अतिवृष्टी व महा ई-सेवा केंद्र यांच्या संपामुळे लाभार्थ्यांना कागदपत्रे प्राप्त करुन घेण्यास अडचणी निर्माण झाल्यामुळे अल्प प्रमाणात अर्ज प्राप्त झाले असल्याने या योजनेंतर्गत लाभ मिळण्यासाठी इच्छुक बचत गटांना अर्ज सादर करण्यासाठी 17 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन साळे यांनी दिली.
0000