Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: admin
कोल्हापूर दि : 9 (जिमाका) जिल्हा नियोजनमधून नाविन्यपूर्ण योजनेतंर्गत राबविण्यात येणाऱ्या राज्यातील या पहिल्या अभिनव उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील 72 विद्यार्थ्यांची पहिली तुकडी आज विमानतळावरून विमानाने इस्त्रोकडे रवाना झाली. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील समाज कल्याण विभागातंर्गत येणाऱ्या चार अनुसूचित जाती व नवबौद्ध मुला-मुलींच्या पन्हाळा तालुक्यातील मसूद माले,शिरोळ,राधानगरी आणि गगनबावडा येथील शाळेमधील विद्यार्थ्यांची इस्त्रोच्या या अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली आहे.शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये यश प्राप्त करणाऱ्या गुणवंत,होतकरू आणि जिज्ञासू विद्यार्थ्यांचा यामध्ये प्राधान्याने समावेश आहे. निवड झालेले हे विद्यार्थी बेंगळुरू व हैदराबाद येथील इस्रो संस्थेतील उपग्रह निर्मिती,प्रक्षेपण प्रक्रिया,अंतराळ संशोधन त्याचबरोबर अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहिती हे विद्यार्थी घेणार असल्याने विज्ञान आणि संशोधन क्षेत्रामध्ये करिअर करण्याची प्रेरणा त्यांना या दौऱ्यामुळे…
कोल्हापूर, दि. 8 (जिमाका) : विलास विनायक मोहोळकर, प्लॉट नं 702, मोहिते पॅराडाईज, मॅकडॉनल्ड शेजारी, आनंदनगर, सिंहगड रोड पुणे यांच्याकडून 1 लाख रुपये इतकी रक्कम वसुल करण्यासाठी मौजे कसबा करवीर जि. कोल्हापूर येथील ई वॉर्ड नगर भूमापन क्रमांक 514/1/क/अ तसेच समीर उत्तमराव काळे, डायरेक्टर भारतीय कामगार कर्मचारी महासंघ वि.के.ए. के फाँड्री प्रा.लि. यांच्याकडून एकूण रक्कम रु. 9 लाख 85 हजार 480 इतकी रक्कम वसुल करण्यासाठी मौजे कसबा बावडा येथील नगर भूमापन क्रमांक 1/अ/16/17/अ ही स्थावर संपत्ती जप्त करण्यात आली आहे. संबंधितांनी आवश्यक ती रक्कम भरली नाही तर सदरची मालमत्ता तहसिलदार कार्यालय करवीर, कोल्हापूर येथे 13 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता…
कोल्हापूर, दि. 8 (जिमाका) : जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (अ) ते (फ) आणि कलम 37 (3) अन्वये संपूर्ण जिल्ह्यात 9 जानेवारीच्या सकाळी 6 वाजल्यापासून ते 21 जानेवारी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत जिल्हा प्रशासनाकडून बंदी आदेश जारी करण्यात आला आहे. हा हुकूम सरकारी अधिकारी, कर्मचारी यांना त्यांची कर्तव्ये, अधिकार बजावण्यासंदर्भात आणि कामकाज करताना उपनिर्दिष्ट वस्तू हाताळाव्या लागतात तसेच एकत्र जमावे लागते व ज्या व्यक्तींनी पोलीस अधीक्षक, संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी अगर संबंधित विभागाचे पोलीस निरीक्षक किंवा सक्षम प्राधिकारी यांची परवानगी घेतलेली आहे, अशा व्यक्तींना तसेच सर्व जाती धर्माचे सण/उत्सव/जयंती/यात्रा इत्यादी शांततामय मार्गाने…
कोल्हापूर, दि. 7 (जिमाका) : रघुनाथ पाटील, त्र्यंबक पाटील, म.वा. तेजस्वीनी पाटील, नम्रता पाटील, ओंकार पाटील, सर्जेराव शिपुगडे, उदयसिंग पाटील यांच्याकडून एकूण रक्कम रु. 5 लाख 67 हजार 508 इतकी रक्कम वसुल करण्यासाठी स्थावर संपत्ती जप्त करण्यात आली आहे. यामध्ये विक्रीसाठी निश्चित केलेल्या दिवसापूर्वी पुर्वोवत एकूण 5 लाख 67 हजार 508 रुपये रक्कम भरली नाही तर नमुद मालमत्ता तहसिलदार कार्यालय, करवीर येथे 13 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता किंवा दुपारी 3 वाजता जाहीर लिलाव करुन विकली जाणार आहे, अशी माहिती करवीर तहसिलदार यांनी दिली आहे. रघुनाथ पाटील यांच्या मालकीचे मौजे हिरवडे दुमाला येथील 1 कोटी 49 हजार 800, त्र्यंबक पाटील,…
कोल्हापूर, दि. 7 (जिमाका) : सर्व शासकीय, निमशासकीय, केंद्र शासन व राज्य शासन अंगिकृत व खासगी क्षेत्रातील सर्व आस्थापनांनी त्यांच्या कार्यालयाचे ई-आर-1 विवरणपत्र 31 जानेवारी पर्यंत ऑनलाईन पध्दतीने भरावे,असे आवाहन जिल्हा रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त जमीर करीम यांनी केले. डिसेंबर 2025 रोजी संपणाऱ्या तिमाहीची ई-आर-1 (त्रैमासिक) सर्व सार्वजनिक क्षेत्रातील शासकीय, निमशासकीय व खासगी क्षेत्रातील सर्व आस्थापनांकडून त्यांच्या आस्थापनेवर असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांच्या मनुष्यबळाची सांख्यिकी माहिती (पुरुष/स्त्री ) संकलीत करण्याचे काम सुरु आहे. सांख्यिकी विभागाकडून यापूर्वीच युझरनेम व पासवर्ड देण्यात आले आहेत. ई-आर 1 विवरणपत्र सांख्यिकी माहिती प्रत्येक तिमाही नंतर महिन्याच्या 1 ते 30 तारखेपर्यंत भरणे आवश्यक आहे. अधिक…
कोल्हापूर, दि. 5 (जिमाका) : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना कंम्बाईनड डिफेन्स सर्व्हिस (CDS) परीक्षेची पूर्व तयारी करुन घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे राज्यातील नवयुवक व नवयुवतींसाठी 19 जानेवारी ते 3 एप्रिल या कालावधीत CDS कोर्स क्र. 66 आयोजित करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाच्या प्रशिक्षणासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, कोल्हापूर येथे 15 जानेवारी रोजी मुलाखतीस उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी (निवृत्त) ले.कर्नल डॉ. भिमसेन चवदार यांनी केले. कोर्स कालावधीत प्रशिक्षणार्थीना निःशुल्क प्रशिक्षण, निवास व भोजन दिले जाणार आहे. मुलाखतीस येताना उमेदवारांनी Department of…
कोल्हापूर, दि. 5 (जिमाका) : पोस्टल पेन्शनधारकांच्या / कुटुंब निवृत्त वेतनधारकांच्या तक्रारींचे प्रभावीपणे निवारण करण्यासाठी पोस्टमास्तर जनरल, गोवा रिजन, पणजीव्दारे पेंशन अदालत मंगळवार, 27 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजता पोस्टमास्तर जनरल यांचे कार्यालय, गोवा रिजन, पणजी-403001 येथे आयोजित केली आहे. (गोवा राज्य, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गचा समावेश आहे.) निवृत्ती वेतनधारकांच्या लाभाशी संबंधित तक्रारी, जे टपाल विभागातून निवृत्त झाले आहेत / ज्यांचा सेवेत असताना मृत्यु झालेला आहे./टपाल विभागाचे निवृत्ती वेतनधारक ज्यांचे 3 महिन्यांच्या आत पूर्तता झालेली नाही अशा प्रकरणांचा डाक पेन्शन अदालतमध्ये विचार केला जाईल. पेन्शन अदालतमध्ये पूर्णपणे कायदेशीर मुद्यांसह प्रकरणे जसे की वारसा प्रमाणपत्र आणि धोरणात्मक बाबींसह प्रलंबित प्रकरणांचा…
भारतीय समाजाच्या इतिहासात सावित्रीबाई फुले यांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे व प्रेरणादायी आहे. स्त्री शिक्षण, सामाजिक समता आणि मानवतावादी मूल्ये यासाठी आयुष्य वेचणाऱ्या सावित्रीबाई फुले या केवळ शिक्षिका नव्हत्या, तर त्या एक थोर समाजसुधारक, कवयित्री आणि परिवर्तनाच्या सर्वकालीन प्रतिक आहेत. ज्या काळात स्त्रीने शिकणे पाप मानले जात होते, त्या काळात त्यांनी शिक्षणाचा दिप प्रज्वलित करुन सामाजिक अज्ञानाच्या अंधाराला आव्हान दिले. स्वत:च्या आयुष्याला आकार देतानाच भारतीय स्त्री- शिक्षणाच्या पायाही त्यांनी घातला. सावित्रीबाई फुले यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे झाला. त्यांचे वडील खंडोजी नेवसे पाटील हे शेतकरी होते. बालवयातच त्यांचा विवाह महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले…
कोल्हापूर दिनांक 30 – राज्यात सर्वत्र महानगरपालिकांच्या निवडणुकीची धूम चालू झाली आहे.यापूर्वी विधानसभेला निवडून आलेल्या आमदारांच्या विजयासाठी जीवाचे रान केलेल्या कार्यकर्त्यांची यंदाच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत केवळ आर्थिक कमजोरी बघून नेत्यांनी तिकिटे कापली आहेत.त्यामुळे हाडाच्या कार्यकर्त्यांना नेत्यांनीच कट्ट्यावर बसविले असल्याचे विदारक चित्र पहायला मिळत आहे.त्यामुळे पायाला भिंगरी लावून नेत्यांचा प्रचार करणाऱ्या कार्यकर्त्यांनी आत्मदहन करण्याऐवजी आत्मचिंतन करण्याची गरज आहे.त्यामुळे कार्यकर्त्यांनी आपले करिअर सांभाळून राजकारण करावे असा मोलाचा सल्ला जाणकार देत असल्याचे दिसून येते.
कोल्हापूर, दि. 29 (जिमाका) : अनुसूचित जाती आणि जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियमांतर्गंत दाखल प्रकरणांमध्ये पोलिसांनी 60 दिवसांच्या आत तपास करुन दोषींवर मुदतपूर्व दोषारोपपत्र दाखल करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले . जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या जिल्हा दक्षता व सनियंत्रण समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, सहाय्यक आयुक्त (समाज कल्याण) सचिन साळे, पो. उपअधिक्षक तानाजी सावंत प्रामुख्याने उपस्थित होते . जिल्हाधिकारी म्हणाले, अत्याचारग्रस्तांची संख्या एखाद्या महिन्यातच अचानक का वाढते आहे याचे अवलोकन व्हावे. त्याचबरोबर दाखल प्रकरणांचा त्वरीत निपटारा करण्यात यावा. अशासकीय सदस्यांनी निकषांची पूर्तता करणाऱ्या पिडीतांना तसेच त्यांच्या वारसदारांना शासकीय नोकरीच्या अनुषंगाने परिपूर्ण असे…