Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: admin
कोल्हापूर दिनांक 09 – कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकात, धनंजय महाडिक युवाशक्ती आणि भाजपच्यावतीने दहीहंडीचा थरार आणि जल्लोष रंगणार आहे. यावर्षी रविवार दि. २४ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ४ वाजता युवाशक्ती दहीहंडी स्पर्धेला प्रारंभ होईल. पश्चिम-दक्षिण महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि गाजलेल्या युवाशक्तीच्या दहीहंडी स्पर्धेतील ३ लाख रूपयांचे बक्षिस पटकावण्यासाठी, यंदाही गोविंदा पथकांची चुरस रंगणार आहे. स्पर्धेच्या उद्घाटनाला राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील, नामदार हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार अमल महाडिक, राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, खासदार धैर्यशील माने, आमदार विनय कोरे, आमदार चंद्रदीप नरके, आमदार राहूल आवाडे, माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यासह जिल्हयातील सर्व लोकप्रतिनिधींना निमंत्रण दिले…
कोल्हापूर, दि. 08* : संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीस थोडा विलंब झाला असला, तरी सर्व कामे महापालिकेकडून गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करून पूर्वीप्रमाणेच या नाट्यगृहाची भव्य उभारणी होईल, असा विश्वास उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला. कोल्हापूर शहरातील नाट्य क्षेत्रातील रंगकर्मींसमवेत संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या कामाची त्यांनी पाहणी केली. शासनाने नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीसाठी दिलेल्या 25 कोटी रुपयांमधील कामांची पाहणी करीत महापालिकेला आवश्यक सूचनाही त्यांनी केल्या. ते म्हणाले, हेरिटेज समिती तसेच नाट्य क्षेत्रातील अनुभवी तसेच नाट्य मंडळाच्या सूचनांचा समावेश नाट्यगृहाच्या उभारणीत करावा. यावेळी नाट्य क्षेत्रातील मिलिंद अष्टेकर, आनंद कुलकर्णी, सुनील घोरपडे, नाट्य परिषदेचे संचालक इतर रंगकर्मींसमवेत कोल्हापूर महानगरपालिकेचे अतिरीक्त…
*कोल्हापूर, दि. 28*: महिलांच्या प्रत्येक प्रकरणांमध्ये कायद्याच्या चौकटीतून त्यांना योग्य न्याय देण्याचा आयोगाचा निर्धार असल्याचे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी प्रतिपादन केले. कोल्हापूर पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित महिला तक्रार अर्जदारांच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी अर्जदार महिलांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि त्यावर संबंधित अधिकाऱ्यांना कार्यवाहीसाठी सूचना दिल्या. यावेळी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, पोलीस उपाधीक्षक गृह सुवर्णा पत्की, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, निर्भया पथकाच्या सहायक पोलीस निरिक्षक तथा नोडल स्वाती यादव यांच्यासह संबंधित इतर विभागांचे प्रमुख उपस्थित होते. यावेळी, महिलांवरील अत्याचार प्रकरणात पोलीसांनी प्राधान्याने तक्रार दाखल करून घेणे ही…
पुणे – पिंपरी-चिंचवड शहरात पत्रकार भवन उभारण्यासाठी स्वतंत्र जागेची तरतूद प्रारूप विकास आराखड्यात करण्यात यावी, अशी लेखी सूचना आमदार शंकर जगताप यांनी महापालिका आयुक्तांना केली आहे. या निर्णयामुळे शहरातील पत्रकारांना स्वतंत्र, सुसज्ज आणि हक्काचे व्यासपीठ निर्माण होणार आहे. मराठी पत्रकार संघाच्या वतीने आमदार शंकर जगताप यांनी विधानसभेत पत्रकारांचे प्रश्न मांडल्याबद्दल त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने आमदार जगताप यांची भेट घेऊन पत्रकारांच्या विविध समस्यांबाबत चर्चा केली. यावेळी पत्रकारांच्या प्रश्नांना विधानसभेत वाचा फोडल्याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले. पत्रकार हे लोकशाहीचे चौथे स्तंभ आहेत. त्यांच्या प्रश्नांची मला पूर्ण जाणीव असून त्यांच्या न्याय हक्कांसाठी…
कोल्हापूर : सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी बजावलेबद्दल सामाजिक कार्यकर्ते आणि कोल्हापूर जिल्हा उद्योग आघाडी भाजपचे उपाध्यक्ष डॉ. विकास बिसुरे यांची प्रांत ग्राहक संरक्षण समिती संघटनेच्या प्रदेश अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. ग्राहक चळवळीमध्ये अग्रेसर राहून सामान्य ग्राहकाला न्याय देण्याचं काम ते या पदावरुन करतील असा विश्वास आहे. महाराष्ट्रात नवीन कार्यकारणी स्थापन करण्याचे सर्वांधिकार त्यांना या निमित्ताने देण्यात आले आहेत. गेली ३० वर्षे महाराष्ट्रचं नव्हे तर संपूर्ण भारतभर आपल्या संघटनेचे पदाधिकारी असून ते ग्राहक चळवळीमध्ये काम करीत आहेत, अशी माहिती प्रांत ग्राहक संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष राजेश भोसले यांनी प्रसिद्धी पत्रकारद्वारे दिली आहे. गोरगरीबांची सुख-दु:खे आपली समजून त्यांच्यासाठी काम करणारे, हजारो…
कोल्हापूर, दि. 11 (जिमाका) : राज्यातील ऑटोरिक्षा व मिटर्स टॅक्सी चालकांच्या कल्याणासाठी धर्मवीर आनंद दिघे महाराष्ट्र ऑटो-रिक्षा आणि टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळ स्थापन केले असून यासाठी ऑटोरिक्षा व मिटर्स टॅक्सी चालकांनी मंडळाकडे नोंदणी करावयाची आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र अर्जदारांनी https://ananddighekalyankarimandal.org या संकेतस्थळावर ऑनलाईन सभासद नोंदणी करावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी केले आहे. या कल्याणकारी मंडळाकडून केंद्र शासनामार्फत व राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ ऑटोरिक्षा व मिटर्स टॅक्सी चालकांना देण्यात येणार आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने जीवन विमा व अपंगत्व विमा योजना, आरोग्य विषयक लाभ, कर्तव्यावर असताना दुखापत झाल्यास अर्थसहाय्य योजना (रु. 50 हजार…
कोल्हापूर दिनांक 8 – कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा तालुक्यातील तिसंगी येथील दत्ताजीराव मोहिते पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचा प्राचार्य शरद काटकर याने त्याच महाविद्यालयातील दीपक गुंडू कांबळे या शिक्षकाची डिग्री बोगस नसल्याबाबत इंदोर येथील विद्यापीठाची खोटी कागदपत्रे सादर करून त्याला वाचवायचा नादात स्वतःच अडकला आहे.त्यामुळे दोघांचेही पगार जिल्हा परिषद प्रशासनाने थांबविले आहेत.तसेच सुमारे एक कोटीच्या वर शासनाचा पगार खाल्लेल्या शिक्षकावर व प्राचार्यावर फौजदारी गुन्हा दाखल होणार का याकडे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. दत्ताजीराव मोहिते-पाटील कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक दीपक गुंडू कांबळे या शिक्षकाची एम. ए.आर्ट्स ची डिग्री खोटी असल्याच्या संशयातून अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघटनेच्या वतीने शिक्षणाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात…
कोल्हापूर – गडहिंग्लज पोलिस ठाण्यामध्ये महिला सहायक पोलिस उपनिरीक्षक नीता शिवाजी कांबळे रा. के. डी. सी.सी. बँक कॉलनी , गडहिंग्लज यांना रु.40000 हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.त्यामुळे कोल्हापूर जिल्हा पोलिस वर्तुळात खळबळ उडाली आहे.या महिला पोलिस अधिकारी यांच्यावर गडहिंग्लज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार यांच्या मुलाविरुद्ध गडहिंग्लज पोलिस ठाणे येथे अपघात प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.त्यामध्ये तक्रारदार यांचे वाहन जप्त करण्यात आले होते.त्याच्या मोबदल्यात तसेच गुन्ह्यातील कलमे कमी करून,गुन्ह्याचे कागदपत्रे देण्याच्या मोबदल्यात एकूण रु.60000 ची लाच मागणी होत असल्याची तक्रार तक्रारदार यांनी दिली होती.सदर तक्रारीच्या अनुषंगाने दिनांक 05 जुलै 2025 रोजी पंचासमक्ष तडजोडीअंती…