Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: admin
कोल्हापूर, दि. 03 (जिमाका) : कोल्हापूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (अ) ते (फ) आणि कलम 37 (3) अन्वये अपर जिल्हादंडाधिकारी गजानन गुरव यांनी संपूर्ण जिल्ह्यात 4 जून रोजी सकाळी 6 वाजल्यापासून ते 16 जून च्या मध्यरात्री 12 वाजेपर्यंत बंदी आदेश जारी केला आहे. हा हुकूम ज्या सरकारी अधिकारी, कर्मचारी यांना त्यांची कर्तव्य, अधिकार बजावण्यासंदर्भात कामकाज करताना उपनिर्दिष्ट वस्तू हाताळाव्या लागतात आणि एकत्र जमावे लागते व ज्या व्यक्तींनी पोलीस अधीक्षक अगर संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी अगर संबंधित विभागाचे पोलीस निरीक्षक किंवा सक्षम प्राधिकारी यांची परवानगी घेतलेली आहे, अशा व्यक्तींना तसेच सर्व…
कोल्हापूर, दि. 03 (जिमाका): पंचगंगा व भोगावती नद्यांच्या दोन्ही तीरावरील नमूद भागात रब्बी हंगाम 2026-27 मधील कालावधीत शेतीसाठी पाणी उपसा करणा-या उपसा यंत्रावर कोल्हापूर पाटबंधारे विभाग (उत्तर) च्या कार्यकारी अभियंता स्मिता माने यांनी महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम 1976 कलम 51 (3) व 97 मधील तरतूदीनुसार असलेल्या अधिकारान्वये उपसाबंदी जाहीर केली आहे. भोगावती नदी कार्यवाहीचा भाग- राधानगरी धरणापासून ते शिंगणापूर कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्यापर्यंच्या भोगावती नदीवरील दोन्ही तीरावरील भाग व कासारी नदीवरील यवलूज को.प. बंधाऱ्याच्या खाली ते शिंगणापूर को.प. बंधाऱ्यापंर्यंत दोन्ही तीरावर व कुंभी नदीवरील सांगरुळ को.प. बंधाऱ्याच्या खालील बांजू कुंभी व भोगावती नदीपर्यंतच्या संगमांपर्यंत दोन्हा तीरावर वर नमूद केलेल्या नदीवरील भागात मिळणाऱ्या…
कोल्हापूर, दि. 03 (जिमाका): फिट इंडिया अंतर्गत जागतिक सायकल दिवस (3 जून) व पर्यावरण दिन (5 जून) निमित्त कोल्हापूर जिल्हा प्रशासन व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि नेहरू युवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने 5 जून रोजी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या सायकल रॅलीची सुरुवात सकाळी 7.30 वाजता मिरजकर तिकटी येथून होणार असून जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, जिल्हा प्रशासनातील अधिकारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत. रॅलीचा मार्ग मिरजकर तिकटी – बिनखांबी गणेश मंदिर – पापाची तिकटी – महानगरपालिका चौक – छत्रपती शिवाजी महाराज चौक – बिंदू चौक – दसरा चौक – व्हिनस कॉर्नर – फोर्ड कॉर्नर – उमा…
कोल्हापूर दि. 03 (जिमाका): पोस्टमास्तर जनरल गोवा रिजन पणजीद्वारे 25 जून रोजी सकाळी 11 वाजता पोस्टमास्तर जनरल, गोवा रिजन (पणजी) यांच्या कार्यालयामध्ये 66 वी डाक अदालत आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती कोल्हापूर डाक विभागाच्या प्रवर अधीक्षकांनी दिली आहे. गोवा विभागाशी संबंधित पोस्टाच्या सेवेविषयी किंवा कामकाजाबद्दल ज्या तक्रारींचे निवारण सहा आठवड्याच्या आत झाले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारींची या डाक अदालतध्ये दखल घेतली जाईल. विशेषत: टपाल वस्तू, मनीऑर्डर, बचत खाते, प्रमाणपत्र याबाबतच्या तक्रारी विचारात घेतल्या जातील. तक्रारींचा उल्लेख सर्व तपशिलासह केलेला असावा. संबंधितांनी डाक सेवेबाबतची आपली तक्रार सहायक निदेशक डाक सेवा-1, पोस्टमास्तर जनरल यांचे कार्यालय, गोवा रिजन…
कोल्हापूर, दि. 03 (जिमाका) : कृषी विभागामार्फत राज्यात राष्ट्रीय खाद्य तेल अभियान-तेलबिया (NMEO-OS) ची अंमलबजावणी सन 2026-27 या वर्षात प्रभावीपणे सुरू करण्यात आली आहे. या अभियानांतर्गत काढणीपश्चात तंत्रज्ञान व पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी ‘गोदाम बांधकाम’ आणि ‘मिनी ऑईल मिल / एक्सपेलर (तेलघाणा)’ या घटकांसाठी विशेष आर्थिक सहाय्य मंजूर करण्यात आले आहे. जिल्ह्यातील पात्र शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्या (FPOs/ FPCs), सहकारी संस्था आणि मूल्य साखळी भागीदार (VCPs) यांनी या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे. गोदाम बांधकाम योजनेसाठी पात्रता व लाभार्थी: शेतकरी उत्पादक संस्था / कंपन्या (FPOs/FPCs), सहकारी संस्था, सरकारी/ खाजगी उद्योग तसेच वैयक्तिक लाभार्थी.…
कोल्हापूर, दि. 03 (जिमाका) : कृषी विभागामार्फत कडधान्य आत्मनिर्भरता अभियान सन 2026-27 अंतर्गत जिल्ह्यातील पात्र इच्छुक शेतकऱ्यांना खरीप हंगामात तुर पिकाचे बियाणे संच / सीडकीट (5 वर्षाच्या आतील वाणाचे 4 किलो प्रती सीडकीट याप्रमाणे) 300 संख्या सीडकीट इतके लक्षांक प्राप्त झाले आहे. तुर बीयाणे संच / सीडकीट ( वाण- गोदावरी तूर / BDN 2013-41) इच्छुक शेतक-यांना 100 टक्के अनुदानावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत लाभ घेण्यासाठी इच्छुक पात्र शेतकऱ्यांनी mahadbt.maharashtra.gov.in या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावेत. यासाठी शेतक-यांचा फार्मर आयडी (Farmer ID) असणे बंधनकारक आहे. बियाणांचा वापर पेरणीसाठी करणे बंधनकारक आहे. अर्ज फक्त Mahadbt पोर्टलवरूनच स्वीकारले जातील. जास्तीत जास्त…
कोल्हापूर, दि. 03 (जिमाका) : धर्मवीर आनंद दिघे महाराष्ट्र ऑटो-रिक्षा आणि मीटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळ या मंडळाचे नामकरण करून आता धर्मवीर आनंद दिघे महाराष्ट्र प्रवासी वाहतूक चालक कल्याणकारी मंडळ असे करण्यात आले आहे. यापूर्वी हे मंडळ केवळ ऑटो-रिक्षा आणि मीटर्ड टॅक्सी चालकांपुरते मर्यादित होते. मात्र, नव्या निर्णयानुसार राज्यातील सर्व प्रकारची अधिकृत प्रवासी वाहने चालवणारे आणि बॅज (Badge) असलेले अनुज्ञप्तीधारक (परवानाधारक) चालक मंडळाचे सभासद होण्यास पात्र ठरणार आहेत. प्रवासी वाहन चालकांना विविध कल्याणकारी योजना, सामाजिक सुरक्षा आणि आर्थिक सहाय्याचा लाभ मिळावा, यासाठी मंडळामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येतात. या सुविधांचा लाभ आता अधिक व्यापक स्वरूपात राज्यातील सर्व पात्र चालकांना मिळणार आहे.…
कोल्हापूर, दि. 03 (जिमाका) : पाटबंधारे विभागाच्या अधिनियम 1976 नुसार कासारी नदीच्या दोन्ही तीरावरील नमुद केलेल्या भागात पाटबंधारे विभाग उत्तरच्या कार्यकारी अभियंता स्मिता माने यांनी रब्बी हंगाम 2026-27 मधील कालावधीत शेतीसाठी पाणी उपसा करणाऱ्या उपसा यंत्रावर उपसाबंदी जाहीर केली आहे. कासारी धरण ते बाजारभोगाव येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यापर्यंतच्या नदीपात्रातील तसेच संबंधित ओढे-नाल्यांच्या दोन्ही तीरांवरील भागात 4 ते 5 जून या कालावधीत दोन दिवसांची उपसाबंदी राहील. तसेच बाजारभोगाव येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याखालून यवलूज येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यापर्यंतच्या नदीपात्रातील तसेच संबंधित ओढे-नाल्यांच्या दोन्ही तीरांवरील भागात 6 ते 7 जून या कालावधीत दोन दिवसांची उपसाबंदी लागू राहील. उपसाबंदीच्या कालावधीत शेतीसाठी अनधिकृतरीत्या पाणी उपसा…
कोल्हापूर, दि. २ : पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या प्रशासकाचा कार्यकाल ६ एप्रिल २०२६ रोजी संपुष्टात आल्याने समितीच्या कामकाजात कोणताही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. समितीमार्फत व्यवस्थापित विविध न्यासांचे दैनंदिन प्रशासकीय, आर्थिक तसेच न्यायप्रविष्ट कामकाज अखंडितपणे सुरू राहणे आवश्यक असल्याने आणि प्रशासक पद रिक्त राहिल्यास कामकाजावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन शासनाने विशेष बाब म्हणून जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांची देवस्थान व्यवस्थापन समितीच्या प्रशासकपदी नियुक्ती केली आहे. तसेच समितीची पुनर्रचना होईपर्यंत संबंधित न्यासांच्या स्थावर व जंगम मालमत्तेचे संरक्षण, संवर्धन व व्यवस्थापन अबाधित राहावे, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांची ही नियुक्ती समितीची…
कोल्हापूर दिनांक 02- करवीर पोलीस ठाण गुन्हे शोध पथकाकडुन अवैधरीत्या देशी विदेशी दारुची वाहतूक करणाऱ्या दोन इसमांकडुन एकुण ४,५९,५७५/- रुपये किंमतीची दारू तसेच टेंपो व चारचाकी अशा दोन वाहनांसहएकुण- १३,६९,५७५/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त. कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रमुख नीलोत्पल यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन करण्याच्या अनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना सुचना दिलेल्या आहेत. मा.पोलीस अधीक्षक साो यांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे श्री. रविंद्र कळमकर पोलीस निरीक्षक करवीर पोलीस ठाणे यांनी करवीर पोलीस ठाणे कडील गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करुन अवैध धंद्यांवर कारवाई करणेबाबत मुखशिल आदेश दिले होते. त्या…