कोल्हापूर, दि. 30 (जिमाका): जिल्हाधिकारी लोकशाही दिन येत्या सोमवारी म्हणजे 6 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराराणी सभागृहात सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आपल्या शासकीय, निमशासकीय विषयांकीत कामांच्या प्रशासकीय स्तरावरील वैयक्तिक तक्रारींबाबत न्याय मिळण्यासाठी स्वत: उपस्थित राहून अर्ज सादर करावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा अपर जिल्हादंडाधिकारी गजानन गुरव यांनी केले.
तालुका स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचा तिसरा सोमवार, जिल्हाधिकारी/ महानगरपालिका आयुक्त स्तर प्रत्येक महिन्याचा पहिला सोमवार, विभागीय आयुक्तस्तर प्रत्येक महिन्याचा दुसरा सोमवार व मंत्रालय स्तरावर प्रत्येक महिन्याचा पहिला सोमवार याप्रमाणे आयोजित करण्यात येतो.
अर्ज स्वीकृतीचे निकष याप्रमाणे- अर्ज विहित नमुन्यात असावा (नमुना प्रपत्र 1 अ ते 1 ड), तक्रार /निवेदन वैयक्तिक स्वरुपाची असावी, तालुका लोकशाही दिनानंतर एक महिन्याने जिल्हाधिकारी/ महानगरपालिका आयुक्त लोकशाही दिनात अर्ज करता येईल, जिल्हाधिकारी/ महानगरपालिका आयुक्त लोकशाही दिनानंतर दोन महिन्यांनी विभागीय आयुक्त लोकशाही दिनात व विभागीय आयुक्त लोकशाही दिनानंतर दोन महिन्यानी मंत्रालय लोकशाही दिनात अर्ज करता येईल.
चारही स्तरावरील लोकशाही दिनात खालील बाबींशी संबंधित अर्ज स्विकारले जाणार नाहीत-
न्यायप्रविष्ठ प्रकरणे, राजस्व/अपील, सेवाविषयक, आस्थापना विषयक बाबी, विहित नमुन्यात नसणारे व त्यासोबत आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती न जोडलेले अर्ज, अंतिम उत्तर दिलेले आहे/ देण्यात येणार आहे अशा प्रकरणी पुन्हा त्याच विषयासंदर्भात केलेले अर्ज अशा प्रकारचे अर्ज यामध्ये स्विकारले जाणार नाहीत. सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत अर्ज स्विकारण्यात येतील एक नंतर कोणताही अर्ज स्विकारला जाणार नाही, असे पत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे.
0000
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.