
कोल्हापूर, दि. 02 (जिमाका) : कोल्हापूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (अ) ते (फ) आणि कलम 37 (3) अन्वये अपर जिल्हादंडाधिकारी गजानन गुरव यांनी 2 ते 15 जुलै या कालावधीत बंदी आदेश जारी केला आहे.
हा हुकूम ज्या सरकारी अधिकारी, कर्मचारी यांना त्यांची कर्तव्य, अधिकार बजावण्यासंदर्भात कामकाज करताना उपनिर्दिष्ट वस्तू हाताळाव्या लागतात आणि एकत्र जमावे लागते व ज्या व्यक्तींनी पोलीस विभागाची परवानगी घेतलेली आहे, अशा व्यक्तींना तसेच सर्व जाती धर्माचे सण/उत्सव/जयंती/यात्रा इत्यादी शांततामय मार्गाने साजरे करण्याकरिता जमा होणारा जनसमुदाय यांना तसेच लग्न, इतर धार्मिक समारंभ, यात्रा, सण, प्रेतयात्रा आदींना लागू असणार नाही.
0000