Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: admin
त्रऋकोल्हापूर, दि. 9 (जिमाका): राज्यामध्ये विविध पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी आणि प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कृषी विभागामार्फत दरवर्षी आयोजित करण्यात येणारी राज्यांतर्गत पीकस्पर्धा योजना सन 2026-27 साठी जाहीर करण्यात आली आहे. या स्पर्धेच्या सविस्तर मार्गदर्शक सूचना कृषी विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून उत्पादकतेत वाढ करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना प्रोत्साहन देणे, त्यांचा गौरव करणे आणि त्यांच्या अनुभवांचा लाभ इतर शेतकऱ्यांना व्हावा, या उद्देशाने ही स्पर्धा राबविण्यात येत आहे. यामुळे राज्याच्या एकूण कृषी उत्पादनात मोलाची भर पडण्यास मदत होणार आहे. सर्वसाधारण व आदिवासी गटातील शेतकऱ्यांसाठी तालुकास्तरावरील स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन मिळालेल्या उत्पादकतेच्या आधारे तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरावरील विजेत्यांची निवड…
कोल्हापूर दि. 9 (जिमाका) : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या अखत्यारित असलेल्या महासैनिक दरबार हॉल व लॉन येथे अशासकीय पदे तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी पध्दतीने भरण्यात येणार आहेत. अशासकीय सहा. व्यवस्थापक- एकत्रित मानधन 31 हजार 875 रुपये – जेसीओ पदावरुन सेवानिवृत्त असावा. लिपिक- एकत्रित मानधन 24 हजार 875 रुपये- जेसीओ/ हवलदार पदावरुन सेवानिवृत्त असावा. तसेच मल्टी टास्क सर्व्हिसेस (बहु कार्य सेवा) पदे- वाहन चालक- एक पद, मानधन- 14 हजार 700 रुपये, वीजतंत्री- एक पद, मानधन- 14 हजार 700 रुपये, प्लंबर- एक पद, मानधन- 13 हजार 271 रुपये, माळी- दोन पदे, मानधन- 13 हजार 271 रुपये, सफाई कामगार (पुरुष)- चार पदे, मानधन- 13…
कोल्हापूर दि. 9 (जिमाका) : प्रवर अधीक्षक डाकघर, कोल्हापूर यांच्याव्दारे 17 जून रोजी दुपारी 3 वाजता प्रवर अधीक्षक डाकघर, कोल्हापूर कार्यालयात डाक अदालत आयोजित करण्यात आली आहे. कोल्हापूर डाकघर विभागाशी संबंधित पोस्टाच्या सेवेविषयी किंवा कामकाजाबद्दल ज्या तक्रारींचे निवारण सहा आठवड्यांच्या आत झाले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारींची या डाक अदालतीध्ये दखल घेतली जाईल. विशेषत: टपाल वस्तू, मनीऑर्डर, बचत खाते, प्रमाणपत्र याबाबतच्या तक्रारी विचारात घेतल्या जातील. तक्रारींचा उल्लेख सर्व तपशिलासह केलेला असावा संबंधितांनी डाक सेवेबाबतची आपली तक्रार वैभव वाघमारे, प्रवर अधीक्षक डाकघर, कोल्हापूर विभाग, कोल्हापूर 416003 यांच्या नावे दोन प्रतींसह 12 जून पर्यंत अथवा तत्पूर्वी पोहचेल अशा रितीने…
कोल्हापूर दि. 9 (जिमाका) : कृषी विभागामार्फत खरीप हंगामात राष्ट्रीय अन्नसुरक्षा आणि पोषण अभियान अन्न धान्य पिक पौष्टिक तृणधान्य सन 2026-27 अंतर्गत जिल्ह्यातील पात्र शेतकरी गटासाठी नाचणी पिकांची प्रात्यक्षिके राबविण्यात येणार आहेत. यासाठी बियाणे मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. पिक प्रात्यक्षिकासाठी शेतकरी गट शेतकरी उत्पादक कंपनी, कृषी क्षेत्रात काम करणारी सहकारी संस्था पात्र राहतील. या योजनेंतर्गत लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतकरी गट व पात्र शेतक-यांनी mahadbt.maharashtra.gov.in या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावेत. यासाठी शेतक-यांचा फार्मर आयडी (Farmer (ID) असणे बंधनकारक आहे. बियाणांचा वापर पेरणीसाठी करणे बंधनकारक आहे. शेतकरी गट हा 31 मार्च पूर्वी नोंदणी केलेला असावा. अर्ज फक्त Mahadbt पोर्टलवरूनच स्वीकारले…
कोल्हापूर दि. 9 (जिमाका) : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या अखत्यारित असलेल्या सैनिकी मुला व मुलींचे वसतीगृह कोल्हापूर, सैनिकी मुलांचे वसतिगृह पन्हाळा आणि सैनिक आरामगृह कोल्हापूर साठी अशासकीय पदे निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी पध्दतीने भरण्यात येणार आहेत. सैनिकी मुलांचे वसतिगृह, कोल्हापूर येथे सहा. वसतिगृह अधिक्षक / लिपीक- 3 (पुरुष)- 24 हजार 875 रुपये एकत्रित मानधन, स्वयंपाकी- 6 (महिला)- 14 हजार 106 रुपये एकत्रित मानधन, सफाई कर्मचारी- 1 (पुरुष)- 13 हजार 271 रुपये एकत्रित मानधन, पहारेकरी- 1 (पुरुष)- -1 हजार 159 रुपये मानधन. सैनिकी मुलींचे वसतिगृह, कोल्हापूर येथे वसतिगृह अधिक्षीका- 1 (महिला)- 31 हजार 875 रुपये, वसतिगृह सहा. अधिक्षीका- 3 (महिला)- 24…
कोल्हापूर दि. 9 (जिमाका) : कृषी विभागामार्फत कडधान्य आत्मनिर्भरता अभियान सन 2026-27 अंतर्गत जिल्ह्यास खरीप तुर बीयाणे संच / सीडकीट ( वाण- गोदावरी तूर / BDN 2013-41) इच्छुक शेतक-यांना 100 टक्के अनुदानावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत लाभ घेण्यासाठी इच्छुक पात्र शेतकऱ्यांनी mahadbt.maharashtra.gov.in या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावेत. यासाठी शेतक-यांचा फार्मर आयडी (Farmer ID) असणे बंधनकारक आहे. बियाणांचा वापर पेरणीसाठी करणे बंधनकारक आहे. अर्ज फक्त Mahadbt पोर्टलवरूनच स्वीकारले जातील. महा-डी.बी.टी. पोर्टलद्वारे प्रथम अर्ज करणा-यास प्रथम प्राधान्य (F.C.F.S.) द्वारे लाभ देण्यात येणार आहे. जास्तीत जास्त इच्छुक व पात्र शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावेत. तांत्रिक माहितीसाठी गावातील सहाय्यक कृषी…
कोल्हापूर दि. 9 (जिमाका) : दूधगंगा धरणापासून ते सुळकूड कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्यापर्यंतच्या दूधगंगा नदीवरील दोन्ही तीरावरील भाग, नदीवरील भागात मिळणाऱ्या सर्व ओढे व नाल्यावरील पाणीफुगीच्या दोन्ही तीरावरील भागात शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या उपसा यंत्रासाठी 10 ते 11 जून या दोन दिवसांच्या कालावधीसाठीची उपसाबंदी रद्द करण्यात आली असल्याची माहिती कोल्हापूर पाटबंधारे उत्तर विभागाचे उपकार्यकारी अभियंता मिलिंद किटवाडकर यांनी दिली. 0000
कोल्हापूर, दि. ०९* : गर्भलिंग निदान, स्त्री भ्रूणहत्या आणि संबंधित बेकायदेशीर प्रकारांना आळा घालण्यासाठी नागरिकांनी पुढे येऊन संशयास्पद बाबींची माहिती टोल फ्री क्रमांक १८००-२३३-४४७५ वर द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केले. या बेकायदेशीर कृत्याची अचूक माहिती देणाऱ्या किंवा स्टिंग ऑपरेशनसाठी पुढाकार घेणाऱ्या नागरिकांना, न्यायालयात खटला दाखल झाल्यावर महाराष्ट्र शासनाकडून रक्कम स्वरूपात बक्षीस दिले जाते. पीसीपीएनडीटी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जनसहभागाबरोबरच कठोर कारवायांची आवश्यकता असून, संबंधित यंत्रणांनी अधिक सतर्कतेने काम करत कारवाया वाढवाव्यात, असे निर्देश त्यांनी जिल्हास्तरीय पीसीपीएनडीटी सल्लागार समितीच्या बैठकीत दिले. या बैठकीला जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.सरीता थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अनिरूद्ध पिंपळे, कोल्हापूर महापालिका आरोग्य अधिकारी डॉ.प्रकाश…
कोल्हापूर, दि. ०८ : ‘जागतिक तंबाखू विरोधी दिना’चे औचित्य साधून कोल्हापूर जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यात तंबाखूमुक्तीसाठी व्यापक जनजागृती आणि दंडात्मक मोहिम राबविण्यात आली. जिल्ह्यातील सामान्य रुग्णालय, उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच ‘हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ या सर्व ठिकाणी विविध उपक्रमांद्वारे हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या मोहिमेअंतर्गत कोल्हापूरचे जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुण, पालक आणि शिक्षकांना तंबाखूजन्य पदार्थांच्या दुष्परिणामांची जाणीव करून देत, व्यसनापासून दूर राहण्याचे विशेष आवाहन केले होते. तसेच, कोल्हापूर आकाशवाणीवरून जिल्हा सिव्हिल सर्जन (प्रभारी) डॉ. सरिता थोरात यांची जनजागृतीपर विशेष मुलाखत प्रसारित…
कोल्हापूर, दि. 8 (जिमाका): मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल मुंबईव्दारे 135 वी डाक अदालत 29 जून रोजी दुपारी 4 वा. मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, जीपीओ बिल्डिंग, जीपीओ कॉम्प्लेक्स, दुसरा मजला, मुंबई कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आली असल्याची माहिती कोल्हापूर डाकघर विभागाच्या प्रवर अधीक्षकांनी दिली. महाराष्ट्र आणि गोवा राज्याशी संबंधित पोस्टाच्या सेवेविषयी किंवा कामकाजाबद्दल ज्या तक्रारींचे निवारण सहा आठवड्यांच्या आत झालेले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारींची या डाक अदालतमध्ये दखल घेतली जाईल. विशेषतः टपाल वस्तु, मनी ऑर्डर, बचत बँक खाते, प्रमाणपत्र इत्यादी बाबतच्या तक्रारी विचारात घेतल्या जातील. तक्रारींचा उल्लेख सर्व तपशीलासह केलेला असावा. संबंधितांनी डाक सेवेबाबतची आपली तक्रार…