
कोल्हापूर, दि. 10 (जिमाका) : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे शुक्रवार, दिनांक 10 जुलै रोजी रात्री 8.30 वाजता कोल्हापूर विमानतळावर आगमन व कागल निवासस्थानाकडे प्रयाण, आगमन व मुक्काम.
शनिवार, 11 जुलै रोजी सकाळी 7 वाजता कागल निवासस्थानी सर्व नागरिकांसाठी राखीव. सकाळी 10 वाजता कै. उर्मिला उदय कुलकर्णी यांच्या राहत्या घराची भिंत व छप्पर कोसळून पडलेल्या स्थळाची पाहणी व त्यांच्या निधन पश्चात घरी सांत्वनपर भेट. (स्थळ : लोहार गल्ली, कागल) सकाळी 10.15 वाजता शेंडा पार्क येथील सुरु असलेल्या 600 बेड रुग्णालय, 250 बेड अतिविशेषोपचार रुग्णालय व 250 बेड कर्करोग रुग्णालय येथील बांधकामाची पाहणी. सकाळी 10.30 वाजता शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, सांगाव, शासकीय होमिओपॅथीक महाविद्यालय, पिंपळगाव येथील बांधकामाचा आढावा व योग व निसर्गोपचार महाविद्यालय उत्तूर येथील शासकीय महाविद्यालयाचा आढावा बैठकीस उपस्थिती. (स्थळ : शेंडा पार्क) दुपारी 1 ते 7 राखीव. सोयीनुसार कागल निवासस्थानाकडे प्रयाण, आगमन व मुक्काम.
रविवार, 12 जुलै रोजी सकाळी 7 वाजता कागल निवासस्थानी सर्व नागरिकांसाठी राखीव. सकाळी 10 वाजता उत्तूर येथील पक्ष कार्यालयात नागरिकांच्या गाठीभेटी. दुपारी 1 ते 4 वाजता राखीव. दुपारी 4 वाजता सोशल मीडिया इन्फ्लुएंसर यांच्या समवेत संवाद व चाय पे चर्चा. सोयीनुसार कागल निवासस्थानाकडे प्रयाण, आगमन व मुक्काम.
सोमवार, 13 जुलै रोजी सकाळी 7 वाजता सर्व नागरिकांसाठी राखीव. सकाळी 10 ते 3.30 वाजता राखीव. दुपारी 3.30 वाजता संजय गांधी निराधार समिती कागलच्या वतीने लाभार्थ्यांना मंजुरी पत्र वाटप कार्यक्रमास उपस्थिती. रात्री 8.50 वाजता विमानाने मुंबईकडे प्रयाण.
0000