
कोल्हापूर, दि. 09 (जिमाका): जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, कोल्हापूर मार्फत खेलो इंडिया कुस्ती प्रशिक्षण चाचणीकरिता जिल्हास्तर, विभागस्तर, राज्यस्तर व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धामध्ये सहभाग असणाऱ्या खेळाडूंना 16 जुलै रोजी होणाऱ्या निवड चाचणीमध्ये भाग घेता येणार आहे.
या प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रवेशाकरिता कुस्ती खेळणारी मुले (05) व मुली (09) खेळाडूंची निवड चाचणी घेण्यात येणार आहे. कुस्तीचे खेळाडू (मुले व मुली)- वयोगट 12 ते 16 वर्षे, चाचणी कालावधी- 16 जुलै रोजी जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय, कोल्हापूर छत्रपती शिवाजी स्टेडीयम, मंगळवार पेठ, कोल्हापूर. या चाचणीकरीता जिल्हा विभाग, राज्य व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये सहभागी असणारे खेळाडू पात्र असणार आहेत.
निवड चाचणीसाठी सोबत जन्म दाखला, आधार कार्ड व क्रीडा कामगिरी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. निवड चाचणी संदर्भात अधिक माहितीसाठी कार्यालयीन वेळेत मानतेश पाटील (क्रीडा प्रशिक्षक) संपर्क क्र. 8446589699 वर संर्पक साधावा, असे आवाहन जिल्हा क्रिडा अधिकारी विद्या शिरस यांनी केले आहे.
0000