
कोल्हापूर, दि. 4 (जिमाका) : राज्यांतर्गत खरीप हंगाम 2026 मधील अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पीकस्पर्धेसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू असून, मूग व उडीद पीकस्पर्धेसाठी अर्ज करण्यास 10 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, तूर, सोयाबीन, भुईमुग व सूर्यफूल या पिकांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 31 ऑगस्ट आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या संकेतस्थळावरील पीकस्पर्धा टॅबमधून ऑनलाइन अर्ज करावा. अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे यांनी केले आहे.
0000