
कोल्हापूर, दि. 03 (जिमाका): फिट इंडिया अंतर्गत जागतिक सायकल दिवस (3 जून) व पर्यावरण दिन (5 जून) निमित्त कोल्हापूर जिल्हा प्रशासन व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि नेहरू युवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने 5 जून रोजी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
या सायकल रॅलीची सुरुवात सकाळी 7.30 वाजता मिरजकर तिकटी येथून होणार असून जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, जिल्हा प्रशासनातील अधिकारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत. रॅलीचा मार्ग मिरजकर तिकटी – बिनखांबी गणेश मंदिर – पापाची तिकटी – महानगरपालिका चौक – छत्रपती शिवाजी महाराज चौक – बिंदू चौक – दसरा चौक – व्हिनस कॉर्नर – फोर्ड कॉर्नर – उमा टॉकीज – सावित्रीबाई फुले आरोग्य केंद्र मार्गे छत्रपती शिवाजी स्टेडियम असा राहणार आहे.
कोल्हापूर शहरातील सायकलपटू, खेळाडू, युवक-युवती तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने या सायकल रॅलीत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.
0000
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.