
कोल्हापूर, दि. 20 (जिमाका): जिल्ह्यासाठी आयसीआयसी बँक लि., श्रीराम जनरल इन्शुरन्स कंपनी लि. या दोन कंपन्यांमधील 14 जागेच्या संधी प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेच्या पोर्टलवर नोंदविण्यात आलेल्या आहेत. या योजनेचा लाभ हा 18 ते 25 वर्ष वयोगटातील उमेदवारांना दिला जाणार आहे. शिक्षण पूर्ण झालेल्या व कोणत्याही ठिकाणी नोकरी करत नसलेल्या उमेदवारांसाठी आहे. पदवीधर उमेदवारांनी इंटर्नशिप संधीसाठी अर्ज करण्यासाठी http://pminternship.mca.gov.in या पोर्टलवर प्रोफाईल तयार करून विविध क्षेत्रातील इंटर्नशिपसाठी अर्ज करावा.
या योजनेच्या तिसऱ्या फेरीसाठी अर्ज करु इच्छिणाऱ्या उमेदवारांनी वेबसाईटवर प्रोफाईल तयार करुन विविध क्षेत्रातील इंटर्नशिपसाठी अर्ज करावा, उमेदवार अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत तीन इंटर्नशिप अर्ज करु शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 एप्रिल आहे. या अंतर्गत उमेदवारांना 11 महिन्यांसाठी इंटर्नशिप मिळेल. त्यासोबत दरमहा नऊ हजार रुपये विद्यावेतन मिळेल, तसेच या योजनेंतर्गत भारत सरकारकडून प्रत्येक प्रशिक्षणार्थीला प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेंतर्गत विमा संरक्षण प्रदान केले जाते.
जिल्ह्यातील जास्तीत जास्त इच्छुक पात्र उमेदवारांनी http://pminternship.mca.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन आपली नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, कोल्हापूर, सी बिल्डिंग, शासकीय निवासस्थान, कावळा नाका (दूरध्वनी क्र. 0231-2545677) येथे संपर्क साधावा.
0000