कोल्हापूर दिनांक 6- कोल्हापूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी उमेदवारांचे पक्षप्रवेश जोरात सुरू आहेत.जुना बुधवार पेठेतून नेपोलियन सोनुले यांनी शिंदे गटात प्रवेश करून विरोधकांच्या समोर तगडे आव्हान निर्माण केले आहे.त्यामुळे विरोधक तुल्य बळ उमेदवार कोण देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
महानगरपालिकेच्या नवीन चार सदस्यीय प्रभाग रचनेनुसार येणारी निवडणूक पक्षीय पातळीवर जास्त लढावी लागणार असल्याचे दिसून येते.त्यानुसार सिद्धार्थनगर,जुना बुधवार पेठ ,शुक्रवार पेठ अशा परिसराचा समावेश यामध्ये झाल्याने उमेदवारांना मतदारांपर्यंत पोचण्यासाठी पायाला भिंगरी बांधून काम करावे लागणार आहे.त्यामुळे जुना बुधवार पेठेतून आपली उमेदवारी निश्चित समजून आपल्या कामाच्या जोरावर नेपोलियन सोनुले यांनी शिवसेना गटात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश करत शड्डू ठोकला आहे.कोरोना काळातील घरोघरी भाजीपाला,धान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप ,महिलांसाठी नवदुर्गा दर्शन ते गणेशोत्सव ,क्रीडा सामने यासाठी त्यांचा प्रत्येक तरुण मंडळांना असणारा पाठिंबा ही त्यांची जमेची बाजू असल्याने महिलांसह,तरुणांची फळी त्यांच्याकडे मजबूत असल्याचे दिसते.त्यामुळे नेपोलियन यांना आव्हान देण्यासाठी विरोधकांना उमेदवार शोधावा लागणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.त्यामुळे तुल्यबळ उमेदवार कोण येणार आणि कोणत्या पक्षाकडून येणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.परंतु सध्यस्थितीत नेपोलियन सोनुले यांचे पारडे जड असल्याचे दिसून येते.
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
