Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: admin
कोल्हापूर, दि. 11 (जिमाका) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात सुमारे 8.31 टीएमसी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 च्या अहवालानुसार राधानगरी धरणाच्या सिंचन तथा विद्युत विमोचकातून 1400 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, कासारी नदीवरील- यवलूज, भोगावती नदीवरील- सरकारी कोगे, खडक कोगे व हळदी, दूधगंगा नदीवरील- दत्तवाड व सुळकूड असे एकूण 13 बंधारे पाण्याखाली आहेत. जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा (कंसात एकूण टक्केवारी )- राधानगरी 8.31 (99 टक्के), तुळशी 3.40 (98 टक्के), वारणा 30.56 (89 टक्के), दूधगंगा 22.05 (87 टक्के), कासारी 2.40 (86 टक्के), कडवी 2.52 (100 टक्के), कुंभी 2.48 (91 टक्के), पाटगाव 3.26 (88…
कोल्हापूर दि. 7 (जिमाका): संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला ऑगस्ट 2024 रोजी दुर्दैवाने आग लागली आणि ते आगीच्या भक्षस्थानी पडले. संपूर्ण कला जगताच्या आणि जिल्हावासीयांच्या हृदयाला चटका लावणारी ही घटना होती. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सध्याचे मुख्यमंत्री आणि त्यावेळचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, स्वर्गीय अजितदादा पवार यांनी या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली होती, आणि त्याच दिवशी त्यांनी घोषणा केली संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचे पूर्वस्थितीसारखेच वैभव निर्माण केले जाईल. संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाची दिमाखदार पुनर्निर्मिती करण्यात आली आहे. याचे उद्घाटन रविवार, दिनांक 9 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासह मान्यवर मंत्री महोदय, लोकप्रतिनिधी यांच्या…
पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील (ज्ञानदेव यशवंतराव पाटील) यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद असून, त्यांच्या जाण्याने शिक्षण, समाजसेवा आणि सहकार क्षेत्रातील एक दूरदर्शी नेतृत्व हरपल्याची भावना सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त केली. मंत्री श्री. आबिटकर म्हणाले, “डॉ. डी. वाय. पाटील यांनी शिक्षणाच्या माध्यमातून लाखो विद्यार्थ्यांच्या जीवनाला दिशा दिली. ग्रामीण भागापासून ते जागतिक स्तरापर्यंत दर्जेदार शिक्षण संस्था उभारून त्यांनी महाराष्ट्राचे नाव उंचावले. शिक्षणाबरोबरच सामाजिक बांधिलकी, सहकार आणि सेवाभाव यांचा आदर्श त्यांनी आयुष्यभर जपला.” “त्यांच्या कार्याची दखल देश-विदेशात घेण्यात आली. शिक्षण क्षेत्रातील त्यांचे योगदान भावी पिढ्यांसाठी कायम प्रेरणादायी राहील. त्यांच्या निधनाने समाजाचा मोठा आधारवड हरपला आहे,” असेही…
पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद असून, त्यांच्या निधनाने शिक्षण, सामाजिक कार्य आणि सहकार क्षेत्रातील एक दूरदर्शी नेतृत्व हरपले आहे. डॉ. डी. वाय. पाटील यांनी शिक्षणाचा दीप ग्रामीण भागापर्यंत पोहोचवत लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला नवी दिशा दिली. वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात त्यांनी उभारलेल्या संस्था दर्जेदार शिक्षण, संशोधन आणि आरोग्यसेवेचे उत्कृष्ट केंद्र बनल्या. महाराष्ट्रासह देशाच्या शैक्षणिक आणि सामाजिक विकासात त्यांचे योगदान सदैव स्मरणात राहील. त्यांचे कार्य, दूरदृष्टी आणि समाजसेवेचा वारसा भावी पिढ्यांना प्रेरणा देत राहील. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून निघणे कठीण आहे. ईश्वर त्यांच्या पुण्यात्म्यास चिरशांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना, आप्तेष्टांना तसेच असंख्य विद्यार्थ्यांना व अनुयायांना हे…
कोल्हापूर, दि. 4 (जिमाका) : राज्यांतर्गत खरीप हंगाम 2026 मधील अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पीकस्पर्धेसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू असून, मूग व उडीद पीकस्पर्धेसाठी अर्ज करण्यास 10 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, तूर, सोयाबीन, भुईमुग व सूर्यफूल या पिकांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 31 ऑगस्ट आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या संकेतस्थळावरील पीकस्पर्धा टॅबमधून ऑनलाइन अर्ज करावा. अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे यांनी केले आहे. 0000
कोल्हापूर, दि. 4 (जिमाका) : प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत नवीन दुचाकी नोंदणी मालिका MH09-HJ दिनांक 5 ऑगस्टपासून सुरु करण्यात येत असून संबंधित वाहन चालकांच्या पसंती क्रमांकाचे अर्ज 5 व 6 ऑगस्ट रोजी सकाळी 9.45 ते दुपारी 3 या वेळेत खिडकी क्र. 9 येथे स्वीकारण्यात येतील. पसंतीचा नोंदणी क्रमांक घेण्यासाठी अर्जासोबत शासनाने विहित केलेल्या शुल्कानुसार त्या क्रमांकासाठी विहित असलेल्या मुळ रकमेचा Demand Draft (धनाकर्ष) जोडलेला असणे आवश्यक आहे. धनादेश किंवा पे ऑर्डर अर्जासोबत देवू नये. Demand Draft (धनाकर्ष) काढताना REGIONAL TRANSPORT OFFICE KOLHAPUR या नावानेच काढलेला असावा. इतर कोणत्याही नावे काढलेला धनाकर्ष स्वीकारला जाणार नाही. पसंतीच्या क्रमांकाच्या मूळ रकमेचा एकच Demand Draft…
मुंबई, दि. ४ : ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, समाजसेवक आणि माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाबद्दल परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी तीव्र दुःख व्यक्त करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. आपल्या शोकसंदेशात प्रताप सरनाईक म्हणाले की, “डॉ. डी. वाय. पाटील यांनी शिक्षण, आरोग्य आणि क्रीडा क्षेत्रात केलेले कार्य अतुलनीय असून, त्यांच्या दूरदृष्टीमुळे लाखो विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी उपलब्ध झाली. समाजहिताची जाणीव ठेवून उभारलेला त्यांचा शैक्षणिक आणि सामाजिक वारसा भावी पिढ्यांसाठी कायम प्रेरणादायी राहील.” “डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक दूरदृष्टीचा शिक्षणमहर्षी, समाजाभिमुख विचारवंत आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व गमावले आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास…
मुंबई दि. ४: डॉ. डी. वाय. पाटील हे केवळ शिक्षणसंस्था उभारणारे प्रशासक नव्हते, तर समाजपरिवर्तनाचे ध्येय डोळ्यांसमोर ठेवून शिक्षणाला नवे क्षितिज देणारे दूरदृष्टीचे शिक्षणमहर्षी होते अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली श्रद्धांजली वाहिली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, त्यांनी उभी केलेली शैक्षणिक चळवळ लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणारी ठरली. आज डी. वाय. पाटील विद्यापीठातून विविध अभ्यासक्रमांच्या माध्यमातून देश-विदेशातील हजारो विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण मिळत आहे. देशभरात सात स्वतंत्र विद्यापीठांची निर्मिती हा त्यांच्या दूरदृष्टीचा आणि कार्यक्षम नेतृत्वाचा ऐतिहासिक ठेवा असल्याचेही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी नमूद केले. कोल्हापूर, पुणे आणि नवी मुंबई येथे उभारलेल्या अत्याधुनिक रुग्णालयांमुळे लाखो नागरिकांना दर्जेदार…
मुंबई दि.4 : आर्थिक परिस्थिती प्रतिकूल असल्यामुळे यकृत प्रत्यारोपणाचा खर्च उचलणे अशक्य झाले होते. उपचारासाठी तब्बल २५ ते ३० लाख रुपयांची आवश्यकता असताना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी आणि टाटा ट्रस्टच्या आर्थिक मदतीमुळे अकोला येथील प्रशांत इंगळे (वय ४७) यांच्यावर मुंबईतील नानावटी रुग्णालयात यशस्वी यकृत प्रत्यारोपण करण्यात आले. या प्रत्यारोपण शस्त्रक्रियेत त्यांच्या पत्नी वर्षा इंगळे यांनी स्वतःच्या यकृताचा काही भाग दान करून पतीला नवजीवन दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून प्रशांत इंगळे यांच्यासाठी २ लाख रुपयांची मदत मंजूर करण्यात आली. तसेच मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे टाटा ट्रस्टकडून १९ लाख ६०…
मुंबई, दि. ४ : ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, माजी राज्यपाल, डी. वाय. पाटील समूहाचे संस्थापक पद्मश्री डॉ. ज्ञानदेव यशवंतराव तथा डी. वाय. पाटील यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद असून, त्यांच्या जाण्याने शिक्षण, समाजसेवा आणि सार्वजनिक जीवनाला दिशा देणारे एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व हरपल्याची शोकभावना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी व्यक्त केली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात, डॉ. डी. वाय. पाटील यांनी शिक्षण हेच समाजपरिवर्तनाचे प्रभावी माध्यम मानून आयुष्यभर कार्य केले. देशभरात शेकडो शैक्षणिक संस्था, विद्यापीठे, वैद्यकीय, अभियांत्रिकी आणि अन्य उच्च शिक्षण संस्था उभारून त्यांनी लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याला नवी दिशा दिली. शिक्षण, आरोग्य, क्रीडा आणि समाजसेवा या क्षेत्रांतील त्यांचे योगदान अत्यंत…