Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: admin
कोल्हापूर, दि. 29 : कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सव’ डॉ. व्ही. टी. पाटील स्मृतीभवन, राजारामपुरी येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधून ३०० हून अधिक महिला शेतकरी व शेतकरी बचत गट महोत्सवात सहभागी झाले होते. प्रदर्शनात टाकळा, शेवगा, कुर्डू, दिंडा, फोडशी, कर्टुले, भारंगी, आळंबी यांसह ८० हून अधिक प्रकारच्या रानभाज्यांचे नमुने मांडण्यात आले होते. यासोबतच शेतकऱ्यांनी थेट विक्रीसाठी आणलेल्या ताज्या रानभाज्यांना ग्राहकांकडून हातोहात मागणी मिळाली. प्रदर्शनासोबतच आयोजित करण्यात आलेल्या ‘रानभाजी खाद्य महोत्सवा’ला नागरिकांनी विशेष पसंती दिली. महोत्सवात महिला शेतकऱ्यांसाठी रानभाजी पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये उत्कृष्ट व…
कोल्हापूर, दि. 29 (जिमाका) : जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सहायक आयुक्त, समाजकल्याण कार्यालय आणि महात्मा बसवेश्वर बहुउद्देशीय संस्था, लोहा, जि. नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता महालक्ष्मी सभागृह, रूईकर कॉलनी येथे जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष ‘सांस्कृतिक स्नेहसंमेलन’ आयोजित करण्यात आले आहे. ज्येष्ठ नागरिकांचे समाजातील योगदान लक्षात घेऊन त्यांचे हक्क, कल्याण आणि शासनाच्या विविध योजनांबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी ज्येष्ठ नागरिकांच्या कला व कौशल्यांना वाव देणारे विविध सांस्कृतिक उपक्रम तसेच जनजागृतीपर कार्यक्रम होणार आहेत. जिल्ह्यातील जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांनी या सांस्कृतिक स्नेहसंमेलनास उपस्थित राहावे, असे आवाहन ज्येष्ठ नागरिक समन्वय समितीचे सदस्य…
कोल्हापूर, दि. 29 (जिमाका) : महासैनिक दरबार हॉल, लॉन व ट्रेनिंग सेंटर येथे लग्नविधी, स्वागत समारंभ, स्नेहमेळावे, व्यावसायिक प्रदर्शन तसेच अन्य लहान कार्यक्रमांसाठी भाडेतत्त्वावर सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात. या माध्यमातून महासैनिक दरबार हॉल व लॉनच्या खात्यावर भाड्यापोटी जमा होणाऱ्या रकमेचे लेखांकन तसेच वेळोवेळी आयकर विवरणपत्र भरण्यासाठी सनदी लेखापाल व लेखापाल लिपिक यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. यासाठी इच्छुक पात्र व्यक्तींनी आपले आवेदनपत्र व संबंधित आवश्यक कागदपत्रांसह 5 ऑक्टोबरपर्यंत महासैनिक दरबार हॉल व लॉन येथे संपर्क साधावा, असे आवाहन ले. कर्नल (निवृत्त) डॉ. भीमसेन चवदार यांनी केले आहे. 0000
कोल्हापूर, दि.28 (जिमाका) : दानोळी (ता. शिरोळ) येथे छत्रपती प्रतिष्ठानच्यावतीने गणेशोत्सवानिमित्त आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले होते. या शिबिरात सेवा संकल्प अभियानांतर्गत BP, शुगर, ECG, नेत्र तपासणीसह आभा व गोल्डन कार्डची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. शिबिराचे उदद्याटन सरपंच सुनिता वाळकुंजे यांच्या हस्ते करण्यात आले. शिबिरात रक्तदाब, रक्तातील साखर, ECG, नेत्र तपासणी करण्यात आले. तपासणीनंतर आवश्यकतेनुसार औषध उपचार, आरोग्य विषयक सल्ला व मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी उदय राऊत, मंडळाचे अध्यक्ष भरत मुळीक, उपाध्यक्ष सुनिल चौगुले, अभय राऊत, सुजय राऊत, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पांडुरंग खटावकर, प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. ए.एन. मोघे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अर्चना यादव आदी उपस्थित होते. 00000
कोल्हापूर, दि. 28 (जिमाका) : राष्ट्रीय कर्णबधिरता प्रतिबंध व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत ‘कर्णबधिर लोकांचा आंतरराष्ट्रीय सप्ताह’ निमित्त 24 सप्टेंबर रोजी परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालय, कोल्हापूर येथे विद्यार्थिनींसाठी जनजागृतीपर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यावेळी बालरोगतज्ज्ञ डॉ. थोरात यांनी नवजात बालकांमधील श्रवणदोषाची कारणे, श्रवणदोषाचे लवकर निदान व त्याचे महत्त्व तसेच सांकेतिक भाषेचे महत्त्व या विषयांवर विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. नवजात बालकांमधील श्रवणदोषाचे वेळेत निदान झाल्यास आवश्यक उपचार व पुनर्वसनाच्या माध्यमातून त्यांचे भवितव्य अधिक सक्षम करता येते, याबाबत त्यांनी माहिती दिली. सांकेतिक भाषेचे महत्त्वही त्यांनी स्पष्ट केले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सरिता थोरात व सेवा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. निलिमा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यशाळेत…
कोल्हापूर, दि. 28 (जिमाका) : ‘सेवा परमो धर्म:’ या भावनेतून सेवा संकल्प अभियानाचा मुलींचे शासकीय वसतिगृह, हातकणंगले येथे आज उत्साहात प्रारंभ झाला. यानिमित्त विविध सेवाभावी व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. वसतिगृहातील मुलींनी प्रवेशद्वारावर आकर्षक रांगोळी साकारून परिसराची सजावट केली. मुलींमध्ये सेवा, समर्पण आणि सामाजिक बांधिलकीची भावना रुजविण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बालपणातील जीवनमूल्ये व सेवाभावावर आधारित ‘चलो जीते हैं’ हा प्रेरणादायी लघुपट दाखविण्यात आला. अभियानांतर्गत वसतिगृह व परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. मुली व कर्मचाऱ्यांनी श्रमदानातून परिसराची स्वच्छता केली. तसेच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वसतिगृह परिसरात…
कोल्हापूर, दि. २६ (जिमाका) : खरीप हंगाम २०२६ मधील पर्जन्यमानातील तूट व अन्य घटकांच्या आधारे राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती असल्याचे शासनाच्या निदर्शनास आल्याने महाराष्ट्र शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाने २५ सप्टेंबर २०२६ रोजी याबाबत शासन निर्णय निर्गमित केला आहे. राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा, राधानगरी, गगनबावडा, भूदरगड, आजरा व चंदगड या तालुक्यांचा समावेश झाल्याने या सहा तालुक्यांमध्ये ‘Trigger-1’ (प्रथम कळ) लागू करण्यात आली आहे. ‘Trigger-1’ लागू झाल्यामुळे दुष्काळग्रस्त भागासाठी शासनाने विशेष बाब म्हणून विविध सवलती व उपाययोजना लागू केल्या आहेत. यामध्ये जमीन महसूलात सूट, पीक कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती तसेच ७.५ हॉर्सपॉवरपेक्षा अधिक क्षमतेच्या कृषी…
कोल्हापूर दि. २६ (जिमाका): पंचायत समिती भुदरगड अंतर्गत दिनांक २४ सप्टेंबर रोजी ‘सेवा संकल्प अभियान’ मोठ्या उत्साहात पार पडले. “सेवा माझे योगदान” या मुख्य संकल्पनेखाली राबविण्यात आलेल्या या अभियानात आरोग्य, पर्यावरण, स्वच्छता, महिला-बालविकास आणि पशुसंवर्धन या क्षेत्रांत विविध गतिमान उपक्रम राबवून तालुक्यातील हजारो नागरिकांना प्रत्यक्ष लाभ प्रदान करण्यात आल्याची माहिती गट विकास अधिकारी डॉ. शेखर जाधव यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली. सेवा माझे योगदान अंतर्गत ८५३ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींमध्ये ३ हजार ७५८ नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये आभा कार्ड – ५१०, गोल्डन कार्ड- ३४२, रक्त तपासणी- ३७३, नेत्र तपासणी- ४३१, अवयवदान – १२६,…
कोल्हापूर, दि.26 (जिमाका) : प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, कोल्हापूर यांच्या वतीने सेवा संकल्प अभियानांतर्गत दि. 25 सप्टेंबर रोजी गडहिंग्लज येथे शिकाऊ अनुज्ञप्ती संदर्भातील नियमित शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात नागरिकांना शिकाऊ अनुज्ञप्ती मिळविण्याची प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, ऑनलाइन अर्ज प्रक्रिया तसेच संबंधित नियम व तरतुदींबाबत मार्गदर्शन करण्यात आले. ऑनलाइन पोर्टलवर अर्ज करताना येणाऱ्या अडचणींबाबत उमेदवारांना आवश्यक माहिती देऊन त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. या शिबिराचा एकूण 103 नागरिकांनी लाभ घेतला असून त्यांना शिकाऊ अनुज्ञप्तीची सेवा उपलब्ध करून देण्यात आली. **
कोल्हापूर, दि.२६ (जिमाका) : सेवा संकल्प अभियानांतर्गत राष्ट्रीय आयुष अभियान, सार्वजनिक आरोग्य विभाग, जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत जिल्ह्यातील आयुष्मान आरोग्य मंदिर, आयुष, उपजिल्हा रुग्णालये व ग्रामीण रुग्णालयांमध्ये विविध आयुर्वेदिक आरोग्य शिबिरे, योग, ध्यान व जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येत आहेत. ११ वा आयुर्वेद दिवस २३ सप्टेंबर आणि जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन १ ऑक्टोबरच्या अनुषंगाने ‘निरोगी उद्यासाठी आयुर्वेद’ हा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. १७ सप्टेंबर रोजी सन्मती हायस्कूल, तारदाळ येथे सेवा संकल्प अभियानांतर्गत २५० शालेय मुलांसाठी योग व ध्यान शिबिर घेण्यात आले. तसेच उपजिल्हा रुग्णालय गारगोटीच्या आयुष विभागामार्फत सुदर्शन…