
कोल्हापूर, दि. 29 (जिमाका) : जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सहायक आयुक्त, समाजकल्याण कार्यालय आणि महात्मा बसवेश्वर बहुउद्देशीय संस्था, लोहा, जि. नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता महालक्ष्मी सभागृह, रूईकर कॉलनी येथे जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष ‘सांस्कृतिक स्नेहसंमेलन’ आयोजित करण्यात आले आहे.
ज्येष्ठ नागरिकांचे समाजातील योगदान लक्षात घेऊन त्यांचे हक्क, कल्याण आणि शासनाच्या विविध योजनांबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी ज्येष्ठ नागरिकांच्या कला व कौशल्यांना वाव देणारे विविध सांस्कृतिक उपक्रम तसेच जनजागृतीपर कार्यक्रम होणार आहेत.
जिल्ह्यातील जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांनी या सांस्कृतिक स्नेहसंमेलनास उपस्थित राहावे, असे आवाहन ज्येष्ठ नागरिक समन्वय समितीचे सदस्य सचिव तथा समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन साळे यांनी केले.
0000