Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: admin
कोल्हापूर, दि. 20 (जिमाका) : मतदार यादींची विश्वासार्हता अबाधित राखण्यासाठी मतदार याद्या अचूक व अद्ययावत व्हाव्यात, त्या संबंधित यंत्रणेने तयार कराव्यात असे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले. मतदार याद्या तयार करणे व सूचना मागविण्याच्या अनुषंगाने आज जिल्ह्यातील विविध मान्यताप्राप्त राष्ट्रीय व राज्यस्तरीय राजकीय पक्षाची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या स्तरावर या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या याद्या अद्यावत असाव्या या दृष्टीने बीएलओ (BLO) चे ट्रेनिंग घेणार असल्याचे सांगून विविध राजकीय पक्षांनी केलेल्या सूचना एकत्रित संकलित करुन निवडणूक आयोगाकडे पाठवणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.…
दि.२०/०३/२०२५ प्रेसनोट खासदार धनंजय महाडिक यांनी आज नवी दिल्लीत रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नामदार नितीन गडकरी यांची भेट घेतली. ५० अश्वशक्तीवरील ट्रॅक्टरच्या नोंदणीसाठी घातलेली महाराष्ट्रातील एकतर्फी बंदी उठवावी आणि शेतकर्यांसह ट्रॅक्टर उत्पादक कंपन्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी खासदार महाडिक यांनी केली. अजुनही कोल्हापूरसह महाराष्ट्राच्या अनेक भागात, भारत तीन ए मानांकनाचे ५० अश्वशक्तीचे ट्रॅक्टर जसेच्या तसे पडून आहेत. परिवहन खात्याकडून नोंदणी करून घेतली जात नसल्यानं, हे ट्रॅक्टर शेतकर्यांना वापरता येत नाहीत. ही अडचण खासदार महाडिक यांनी नामदार गडकरी यांच्या निदर्शनास आणून दिली. शेतकर्यांच्या आणि ग्रामीण भागातील अर्थकारणासाठी ट्रॅक्टर महत्वाची भूमिका बजावतात. कोल्हापूर जिल्हा ट्रॅक्टर डिलर असोसिएशनकडून झालेल्या मागणीनुसार, खासदार महाडिक…
•अजूनही करा ऑनलाइन नोंदणी व जोडणी, करा पेपरचा सराव अन् द्या परीक्षा..! •कोणतेही परीक्षा शुल्क नाही. येत्या रविवारी सकाळी दहा ते सायंकाळी पाच वेळेत तीन तासांची परीक्षा. •साक्षरतेचे अधुरे स्वप्न साकार करण्याची संधी. प्रौढ शिक्षण ऐवजी ‘सर्वांसाठी शिक्षण’ या नावाने सुरू असलेल्या उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत चालू शैक्षणिक वर्षात पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी (एफएलएनएटी) ही परीक्षा रविवारी २३ मार्च रोजी महाराष्ट्र राज्यात केंद्र शासनाच्या निर्देशानुसार आयोजित करण्यात आली आहे. साक्षर होण्याचे अधुरे स्वप्न पूर्ण करण्याची व असाक्षरतेचा कलंक पुसण्याची संधी या निमित्ताने पंधरा वर्षे व त्या पुढील जेष्ठांना मिळाली आहे. याबाबत उल्लास कार्यक्रमाचे राज्य समन्वयक राजेश क्षीरसागर…
कोल्हापूर दिनांक 20- दोन दिवसापासून ठप्प झालेला गांधीनगर प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा पाणीपुरवठा अखेर सुरळीत झाला मुख्य जलवाही नीला लागलेली गळती यशस्वीपणे दुरुस्त करण्यात आली असून संतुलन टाक्यांमध्ये पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे आता रोटेशन पद्धतीने सर्व 13 गावांना आळीपाळीने पाणीपुरवठा सुरू होणार आहे येत्या चार दिवसात संपूर्ण योजनेअंतर्गत सर्व तेरा गावांना नियमित पाणीपुरवठा सुरळीत केला जाणार आहे यासाठी शाखा अभियंता टी एम अंबानी पीएच गायकवाड संदीप गारगोटे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे ठेकेदार माननीय सुभाष आकाराम पाटील राहणार श्रीराम कॉलनी कसबा बावडा आणि कर्मचारी विशेष परिश्रम घेतले तांत्रिक अडचणीवर मात करून पाणीपुरवठा पूर्ववत केल्यामुळे सर्व नागरिकांमध्ये समाधान आहे
जागतिक ग्राहक दिनाच्या कार्यक्रमात प्रतिपादन, ग्राहक संरक्षण विषयावर विविध मान्यवरांनी मांडले विचार कोल्हापूर, दि.18 : ग्राहकांनी सजग राहून सदसद्विवेकबुद्धीचा वापर केला तर फसवणूक टळेल असे प्रतिपादन जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी केले. कमी तेच अधिक मानून, अधिकचे न मिळवता, आहे त्यावरच समाधान मानून कोणत्याही अमिषाला बळी पडू नका असा सल्ला त्यांनी यावेळी दिला. त्या म्हणाल्या, ऑनलाईन विश्वासाठी आपण सावज असून, मोबाईलवर येणारी प्रत्येक लिंक समजून घेवून त्याबाबत खबरदारी घ्या. जेणेकरून आपली आर्थिक फसवणूक होणार नाही. एआयमुळे ग्राहकांच्यापुढे अनेक आव्हाने उभी आहेत असून अधिकच्या मोबदल्यासाठी ग्राहकांची फसवणूक वाढत गेल्याचे त्यांनी नमूद केले. जिल्हाधिकारी कार्यालयात ताराराणी सभागृहात दरवर्षी होणाऱ्या 15 मार्चच्या…
कोल्हापूर दिनांक 18- राज्य कुस्तीगिर संघटनेच्यावतीने नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये प्रतिस्पर्धी मल्लाला चितपट करत, पृथ्वीराज मोहोळने महाराष्ट्र केसरी किताब पटकावला. या यशाबद्दल खासदार धनंजय महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली भिमा साखर कारखान्याचे अध्यक्ष विश्वराज महाडिक यांच्याकडून पृथ्वीराज मोहोळला एक लाख रुपयांचे बक्षिस देण्यात आले. पुढील वर्षीच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे यजमानपद मिळण्यासाठी आपण प्रयत्नशिल असल्याचे विश्वराज महाडिक यांनी यावेळी सांगितले. मागील महिन्यात झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये पृथ्वीराज मोहोळ या मल्लाने आपल्या कौशल्याचे प्रदर्शन घडवत, महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावलाय. या कामगिरीनंतर पृथ्वीराजने भिमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विश्वराज महाडिक यांची आज कोल्हापुरात सदिच्छा भेट घेतली. महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावल्याबद्दल विश्वराज महाडिक यांनी…
कोल्हापूर दिनांक 18 – महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोल्हापूर च्या वतीने आज फायनान्स व बँकांच्या वसुली गुंडांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले जिल्हाध्यक्ष राजू दिंडोर्ले व शहराध्यक्ष प्रसाद पाटील यांच्या नेतृत्वाखाली धडाका आंदोलन छेडण्यात आले. आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन संयुक्त बैठकीची मागणी केलेली होती. मात्र केवळ पोलीस अधीक्षकांना एक पत्र पाठवून अशा प्रकारची कोणतीही बैठक न लावलेने मनसे कोल्हापूर तर्फे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज रस्त्यावरती उतरून फायनान्सच्या वसुली गुंडांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करत सर्व बँका व फायनान्स कंपनीमध्ये घुसून त्यांच्या मॅनेजरना मनसे स्टाईलने दणका देण्यात आला. कायद्याने वसुली गुंडांना पाठवणे बेकायदेशीर असून केवळ नागरिकांना फोनवरून विचारणे व हप्ते तटल्यास…
कोल्हापूर, दि. 17 (जिमाका) : भारतीय सेना मार्फत अग्निवीर अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात प्रसिध्द झाली आहे. अग्निवीर जनरल ड्युटी, अग्निवीर टेक्निकल, अग्निवीर लिपीक/स्टोअर कीपर टेक्निकल, अग्निवीर ट्रेडसमन 8 वी, अग्निवीर ट्रेडसिंग, 10 वी, महिला सहायक, सोलडी, 10 वी, अग्निवीर ट्रेडसमन, 10 वी, धार्मिक शिक्षक jco, हवालदार शिक्षण आणि हवालदार (सर्व्हेअर ऑटोमेटेड कार्टोग्राफर) यापदांसाठी दिनांक 10 एप्रिल 2025 पर्यंत www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी. जिल्ह्यातील पात्र उमेदवारांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र. जमीर करीम यांनी केले आहे.
कोल्हापूर, दि. 17 (जिमाका) : शित्तूर तर्फ मलकापूर, ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर येथील भूमिपुत्र, कै. सुनिल गुजर (११० इंजिनियर रेजिमेंट, अरुणाचल प्रदेश) हे देशसेवेच्या कर्तव्यावर असताना दिनांक १३ मार्च रोजी शहीद झाले. अरुणाचल प्रदेशातील चीन सीमेवरील काम सुरू असताना झालेल्या दुर्दैवी अपघातात त्यांनी प्राण गमावले. सोमवारी सकाळी त्यांच्या पार्थिवावर मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शोकाकुल वातावरणात झालेल्या या अंत्यविधीसाठी कुटुंबीय, ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. सर्वांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. कै. सुनिल गुजर यांच्या सेवा आणि त्यागाला संपूर्ण गावाने अभिमानपूर्वक सलाम केला. त्यांच्या जाण्याने गावात शोककळा पसरली असून, कुटुंबियांच्या दुःखात संपूर्ण जिल्हा…
मुंबई : प्रतिनिधी प्रेरणा थिएटर्सचे भव्य दिव्य धमाल बालनाट्य “अंजू उडाली भुर्रर्रर्र” लवकरच बाल रसिकांचेच नाही तर पालकांचे आणि नातेवाईकांचेही मनोरंजन करण्यासाठी रंगभूमीवर दाखल होत आहे. १९ एप्रिल रोजी डॉक्टर काशिनाथ घाणेकर नाट्यगृह ठाणे येथे शुभारंभाचा प्रयोग होणार असून त्यानंतर मुंबई, पुणे, नाशिक आणि संपूर्ण महाराष्ट्रभर हे बालनाट्य रसिकांचे मनोरंजन करत फिरणार आहे. श्री.अशोक पावसकर आणि सौ.चित्रा पावसकर हे गेली पन्नासहून अधिक वर्षे निस्वार्थीपणे बाल रंगभूमीची सेवा करणारे दाम्पत्य. ह्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक कलाकार तयार झाले. नावारूपाला आले. पावसकर दांपत्य डॉक्टर सलील सावंत ह्या तरुण निर्मात्याच्या साथीने अंजू उडाली भुर्र हे एक भव्य दिव्य बाल नाट्य प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. गुरुवर्य…