कोल्हापूर दिनांक 20- दोन दिवसापासून ठप्प झालेला गांधीनगर प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा पाणीपुरवठा अखेर सुरळीत झाला मुख्य जलवाही नीला लागलेली गळती यशस्वीपणे दुरुस्त करण्यात आली असून संतुलन टाक्यांमध्ये पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे आता रोटेशन पद्धतीने सर्व 13 गावांना आळीपाळीने पाणीपुरवठा सुरू होणार आहे येत्या चार दिवसात संपूर्ण योजनेअंतर्गत सर्व तेरा गावांना नियमित पाणीपुरवठा सुरळीत केला जाणार आहे यासाठी शाखा अभियंता टी एम अंबानी पीएच गायकवाड संदीप गारगोटे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे ठेकेदार माननीय सुभाष आकाराम पाटील राहणार श्रीराम कॉलनी कसबा बावडा आणि कर्मचारी विशेष परिश्रम घेतले तांत्रिक अडचणीवर मात करून पाणीपुरवठा पूर्ववत केल्यामुळे सर्व नागरिकांमध्ये समाधान आहे
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.