Author: admin

कोल्हापूर – संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमीत्त, अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या पुढाकाराने आयोजित संविधान जनजागृती प्रश्नमंजुषा – २०२५ हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संविधानाचे महत्त्व, त्यातील मुलभूत अधिकार व कर्तव्ये याबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी राबविण्यात येत आहे. हा कार्यक्रम विद्यार्थ्यांना संविधानाची समज वाढविण्यासाठी, तज्ज्ञ मार्गदर्शन, अनुभवात्मक शिक्षण आणि अभ्यास साहित्य प्रदान करण्याच्या दृष्टीकोणातून अत्यंत महत्त्वाचा आहे. यामुळे विद्यार्थ्यांना जागरूक, उत्तरदायी आणि सशक्त नागरिक होण्याची संधी मिळणार असल्याचे आयोगाचे उपाध्यक्ष ॲड धर्मपाल मेश्राम यांनी सांगितले. नागपूर येथे या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी बार्टीचे महासंचालक सुनील वारे, संचालक शिक्षण, अवर सचिव अल्पसंख्याक विकास, सह सचिव इतर मागासवर्ग विभाग,…

Read More

कोल्हापूर, दि. 19 (जिमाका): क्रीडा स्पर्धेत इतर खेळाडूंसोबत खेळताना किंवा त्यांचे खेळ पाहताना अनेक अनुभव येतात. अशा वेळी त्यांच्याकडील नवनवीन कौशल्ये आत्मसात करावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जिल्हास्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी केले. जिल्हा परिषद कोल्हापूरच्या ‘जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालया’मार्फत पोलीस परेड ग्राउंडवर या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, कोल्हापूर महानगरपालिकेचे उपायुक्त पारितोष कंकाळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे, कृषी विकास व प्रभारी समाजकल्याण अधिकारी राजेंद्र माने, कार्यकारी अभियंता (ग्रा.पा.पु.) अर्जुन गोळे, प्रभारी जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी सुवर्णा सावंत आणि वैद्यकीय सामाजिक कार्यकर्त्या साधना कांबळे यांसह अन्य मान्यवर…

Read More

कोल्हापूर, दि. १९* : जिल्ह्याच्या लौकिकाचा अविभाज्य भाग असलेल्या कोल्हापुरी चप्पलांविषयी काहीही गैरसमज किंवा अफवा पसरवू नयेत, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे. भारतीय पारंपरिक चर्मकलेचा वारसा जागतिक स्तरावर पोहोचवण्यासाठी नामांकित जागतिक फॅशन ब्रँड प्राडा, तसेच लिडकॉम (संत रोहिदास चर्मउद्योग आणि चर्मकार विकास महामंडळ) आणि लिडकार (डॉ. बाबू जगजीवनराम चर्मउद्योग विकास महामंडळ) यांच्यात सामंजस्य करार झाला आहे. या करारामुळे कोल्हापूरची “मेड इन कोल्हापूर” अशी आंतरराष्ट्रीय ओळख निर्माण होणार असून, जिल्ह्याच्या परंपरेचा सन्मान वाढणार आहे. जिल्हाधिकारी येडगे म्हणाले की, कोणतेही ब्रँड विक्रीसाठी असलेल्या उत्पादनांबाबत गोपनीयतेचे धोरण पाळतात. त्यामुळे कोल्हापुरी चप्पल निर्मिती प्रक्रियेदरम्यान गोपनीयता जपणे अत्यावश्यक आहे. करारानुसार लवकरच कोल्हापुरी…

Read More

कोल्हापूर, दि. 19 (जिमाका): अलीकडच्या कालावधीत समाजमाध्यमांद्वारे तसेच काही व्यक्तींमार्फत अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या कार्यवाहीबाबत अपूर्ण व दिशाभूल करणारी माहिती प्रसारित केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. या चुकीच्या माहितीतून महामंडळाची बदनामी होत असून मराठा समाजासह सर्वसामान्य नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर वस्तुस्थिती स्पष्ट करण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत खुलासा करण्यात आला आहे. राज्य शासनामार्फत विविध शासकीय विभाग, महामंडळे व शासन अंगीकृत उपक्रमांसाठी अर्थसंकल्पीय तरतूद निश्चित केली जाते. विधिमंडळाची मान्यता मिळाल्यानंतर त्या अर्थसंकल्पाची अंमलबजावणी होत असून, त्याअंतर्गत प्रत्येक विभाग व महामंडळास वार्षिक इष्टांक (Targets) निश्चित करणे बंधनकारक असते. राज्यातील इतर आर्थिक विकास महामंडळांप्रमाणेच…

Read More

कोल्हापूर, दि. 18 (जिमाका) : उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, इचलकरंजी येथे 17 डिसेंबर रोजी Wabco/Zf ब्रेक सिस्टीम तर्फे अवजड वाहने ब्रेक संदर्भात प्रशिक्षण शिबीर कार्यक्रम आयोजित करण्यात आला. चालक, वाहक, वाहनधारक, मेकॅनिक, स्कुल बस चालक यांना प्रणाली ABS, EBS याबद्दल चित्रफिती, प्रत्यक्ष वाहनांवर प्रणाली कशी काम करते, डुज आणि डोन्ट, प्रिव्हेंटिव्ह देखभाल इत्यादीवर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच अपघात तपासणीच्या दृष्टीने मोटार वाहन निरीक्षक व सहा. मोटार वाहन निरीक्षक यांना प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी वाहन चालकांचे आरोग्य तपासणी व डोळे तपासणी मोफत करण्यात आली. शिबीरास सर्व प्रमुख वाहतुक संघटना प्रतिनिधी, संजय घोडावत इंस्टिट्युट, डीकेटीई, राज्य परिवहन महामंडळमधील मॅकेनिक व वाहन चालक…

Read More

कोल्हापूर, दि. 18 (जिमाका) : ज्या स्कुल बस, स्कुल व्हॅन, ऑटोरिक्षा यांचे योग्यता प्रमाणपत्र संपुष्टात आले आहे, अशा वाहनधारकांनी त्यांचे योग्यता प्रमाणपत्र तातडीने नुतणीकरण करुन घ्यावे. विना वैध योग्यता प्रमाणपत्राशिवाय स्कुल बस, स्कुल व्हॅन, ऑटोरिक्षा रस्त्यावर चालताना तपासणीमध्ये आढळून आल्यास मोटार वाहन कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येईल, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी केले. त्यानुषंगाने सूचना खालीलप्रमाणे – शाळेतील मुलांची ने-आण करणाऱ्या सर्व बस व इतर वाहने शालेय विद्यार्थ्यांकरिता सुरक्षित राहतील याची खबरदारी शाळेने घेणे आवश्यक आहे. प्रत्येक शालेय बस व विद्यार्थ्यांच्या वाहतुकिसाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनात CCTV कॅमेरे कार्यरत स्थितीत असणे अनिवार्य आहे. 6 वर्षाखालील मुलांची ने-आण करणाऱ्या शालेय…

Read More

कोल्हापूर, दि. 18 (जिमाका) : राष्ट्रीय खाद्यतेल अभियान- तेलबीया (NMEO–OS) सन 2025-26 अंतर्गत देशातील तेलबियांवरील आयात अवलंबित्व कमी करण्यासाठी तसेच तेलबियांचे उत्पादन व उत्पादकता वाढविण्यासाठी शासनामार्फत विविध प्रोत्साहनपर योजना राबविल्या जात आहेत. सन 2025-26 मधील उन्हाळी हंगामासाठी भुईमूग पिकाकरिता जिल्ह्यासाठी प्रमाणित बियाणे वितरणाकरिता 750 क्विंटल व पिक प्रात्यक्षिक करिता 290 क्विंटल लक्षांक प्राप्त झाला आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भूईमूग पिकासाठी 100 टक्के अनुदानावर कृषी विभागाकडून प्रमाणित बियाणे उपलब्ध करुन देण्यात येत असून शेतकऱ्यांनी बियाण्याकरिता https://mahadbt.maharashtra.gov.in/,https://farmeragrilogin.gov.in/ या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावेत व महाविस्तार AI ॲपचा वापर करावा. या अनुषंगाने शासनमान्य बियाणे वितरण केंद्रांमार्फत उन्हाळी भूईमूग पिकासाठी हेक्टरी 150 किलो (दर रु.…

Read More

कोल्हापूर, दि. 18 (जिमाका) : मधुमेह व प्रीडायबेटिक अवस्थेचे निदान करण्यासाठी HbAlc या चाचणीची आवश्यकता असते व या चाचणीसाठी लागणारे अत्याधुनिक यंत्र Fully Automated HbAlc Analyzer (HPLC Method) Lab Tech Health care PVT.LTD. श्री. महालक्ष्मी डिस्ट्रीब्युटर्स, कोल्हापूर यांच्याकडून देणगी स्वरुपात प्राप्त झाले आहे. यावेळी अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे, जीवरसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. राहुल चौधरी, डॉ. गिरीष कांबळे, वैद्यकीय उपअधिक्षक उपस्थित होते. या चाचणीचा लाभ जिल्ह्यातील व जिल्ह्यालगत असलेल्या गरजु रुग्णांना होईल असा आशावाद डॉ भिसे यांनी यावेळी व्यक्त केला. 0000

Read More

कोल्हापूर, दि. 18 (जिमाका) :* अल्पसंख्याक समुदायासाठी राज्य व केंद्र शासनाच्या अनेक विविध योजना कार्यरत आहेत. या योजनांचा लाभ समुदायाने घेऊन स्व:हित साधावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले. महाराणी ताराबाई सभागृहात जिल्हा नियोजन विभाग व जिल्हा अल्पसंख्यांक कक्ष (जिल्हाधिकारी कार्यालय) यांच्या संयुक्त विद्यमाने आज अल्पसंख्यांक हक्क दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी मंचावर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी (जिल्हा परिषद) संतोष जोशी, जिल्हा नियोजन अधिकारी विक्रम देशमुख, पी.एस.आय. किरण कागलकर, शिक्षणाधिकारी (निरंतर) श्रीमती अनुराधा मेत्रे, मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापक उदय कांबळे, शिवाजी विद्यापीठाचे सहाय्यक प्राध्यापक अविनाश भाले व सहाय्यक कृषी…

Read More

मुंबई : सिकलसेल तपासणी विशेष पंधरवडा मोहिमेअंतर्गत राज्यातील सिकलसेल आजाराचे प्रमाण अधिक असलेल्या २१ जिल्ह्यांतील प्रत्येक नागरिकाची सिकलसेल तपासणी झाली पाहिजे. एकही नागरिक सिकलसेल तपासणीपासून वंचित राहू नये, याची काटेकोर दक्षता घेण्याच्या सूचना सार्वजनिक आरोग्यमंत्री नामदार प्रकाश आबिटकर यांनी दिल्या. आरोग्यमंत्री यांच्या मंत्रालयीन दालनात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या विविध विषयांबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस आरोग्य विभागाचे सचिव ई. रवींद्रन, आरोग्य आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, आरोग्य संचालक डॉ. विजय कंदेवाड, सहसंचालिका डॉ. सुनिता गोल्हाईत, यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने राज्यात दिनांक १८ डिसेंबर ते १५ जानेवारी २०२६ या कालावधीत “सिकलसेल अभियानाची पूर्व तयारी करण्यात…

Read More