Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: admin
मुंबई, दि. 22 : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेतील पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील पाच जागांसाठी द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार औरंगाबाद विभाग पदवीधर, पुणे विभाग पदवीधर, नागपूर विभाग पदवीधर, अमरावती विभाग शिक्षक आणि पुणे विभाग शिक्षक या पाच मतदारसंघांसाठी 23 ऑक्टोबर 2026 रोजी मतदान होणार आहे. विद्यमान सदस्यांचा कार्यकाळ 6 डिसेंबर 2026 रोजी संपुष्टात येणार आहे. या निवडणुकीसाठी 29 सप्टेंबर 2026 रोजी अधिसूचना प्रसिद्ध होईल. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 6 ऑक्टोबर, अर्जांची छाननी 7 ऑक्टोबर, तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 9 ऑक्टोबर 2026 आहे. मतदान 23 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 4…
कोल्हापूर, दि. २१ सप्टेंबर २०२६ : मराठी चित्रपटसृष्टीच्या समृद्ध संगीत परंपरेचा आणि अविस्मरणीय चित्रपटगीतांचा रसिकांना अनुभव देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने ‘मराठी चित्रपटगीत महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. मंगळवार, दि. २९ सप्टेंबर आणि बुधवार, दि. ३० सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता डॉ. व्ही. टी. पाटील स्मृतिभवन, ताराराणी विद्यापीठ, कमला कॉलेज परिसर, राजारामपुरी, कोल्हापूर येथे हा महोत्सव होणार आहे. दोन दिवसांच्या या महोत्सवातून मराठी चित्रपटसृष्टीतील विविध कालखंडातील लोकप्रिय आणि सदाबहार गीतांचा सुरेल आविष्कार रसिकांना अनुभवता येणार आहे. मराठी चित्रपटगीतांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाशी जोडलेली भावविश्वे, संगीतपरंपरा आणि गीत-संगीताचा समृद्ध वारसा रसिकांसमोर…
कोल्हापूर दि 17( जिमाका ) आत्मनिर्भर भारत अंतर्गत कृषी विभागाची अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे केंद्रशासन पुरस्कृत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग अर्थात (PMFME) योजना होय.या योजनेत प्रति सदस्य 40 हजार तर प्रति स्वयंसहायता गटासाठी कमाल 4 लाख रुपये इतके खेळते भांडवल मिळते. या योजनेचा फायदा बचत गटांनी करून घेवून आपला आर्थिक विकास साधावा असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी अरुण भिंगारदिवे यांनी केले. वडणगे येथील हनुमान तरुण मंडळ येथे आयोजित ‘लोकसंवाद’ कार्यक्रमावेळी ते बोलत होते. तर सहा. कृषी अधिकारी श्रीमती माधुरी पाटील यांनी शेतकऱ्यांनी ऊस पिकासाठी ठिबकचा उपयोग करावा असे आवाहन करून गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार योजने संदर्भात सविस्तर माहिती दिली. राज्य…
कोल्हापूर दि : 17 ( जिमाका ) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य तसेच विश्वकर्मा दिनानिमित्त जिल्हा कार्यालय कोल्हापूर यांच्यावतीने रेल्वे स्टेशन कोल्हापूर येथे विश्वकर्मा दिव्यांग लाभार्थ्यास ‘ वन स्टेशन – वन प्रोडक्ट ‘ च्या माध्यमातून मंजूर झालेल्या स्टॉलचे मंजुरीचे पत्र देण्यात आले. त्याचबरोबर पीएम विश्वकर्मा योजनेतील सोनार कारागिरांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते टूलकिट वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी श्रीकांत जौंजाळ यांनी उपस्थितांना विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना व सद्यस्थितीची माहिती सांगितली. याप्रसंगी MSME राज्य संचालक मिलिंद बारापत्रे,केंद्र सरकार नियुक्त अशासकीय सदस्य डॉ. आनंद गुरव, व जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक मंगेश पवार यांनीही आपले समयोचित विचार व्यक्त केले. या कार्यक्रमास…
कोल्हापूर दि. 17 (जिमाका): कोल्हापूर जिल्ह्यात ‘अग्निवीर’ भरती प्रक्रियेला बुधवारी मध्यरात्री उत्साहात सुरुवात झाली. या भरतीचे उद्घाटन मध्यरात्री जिल्हाधिकारी डॉ विजय राठोड यांच्या हस्ते झाले. देश सेवेची उर्मी उराशी बाळगून मोठ्या संख्येने उमेदवार या भरतीसाठी उपस्थित होते. सैन्य भरती कार्यालयाचे संचालक कर्नल प्रशांत सिंग, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, लेफ्टनंट कर्नल डॉ. संबित पात्रा, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल डॉ. भीमसेन चवदार, तहसीलदार स्वप्निल पवार, सहाय्यक संचालक आर्मी भरती कार्यालय सुभेदार मेजर लखविंदर सिंग, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड म्हणाले, ही भरती प्रक्रिया आगामी १७ सप्टेंबर ते २९ सप्टेंबर या कालावधीत पार पडणार आहे. उमेदवारांच्या सोयीसाठी आणि सुरक्षेसाठी प्रशासनाकडून सर्वसमावेशक तयारी…
कोल्हापूर (जिमाका) 16 : सहायक आयुक्त, समाज कल्याण, कोल्हापूर या कार्यालयाच्या अधिनस्त जिल्हयात मुलां-मुलींची १८ शासकीय वसतिगृहे कार्यरत आहेत. मुलां-मुलींच्या या शासकीय वसतिगृहांमध्ये अनु. जाती, अनु. जमाती विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गामधील शालेय व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी सन २०२६-२७ मधील प्रवेशित विद्यार्थ्यांना विनामूल्य प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू आहे. सदर शासकिय वसतिगृहामध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांना सकाळचा नाष्टा, दोन्ही वेळेच्या भोजनाची व राहण्याची अंधरुण-पांघरुनासह मोफत सोय, मासिक दैनंदिन खर्चासाठी निर्वाह भत्ता, शैक्षणिक साहित्य, प्रोजेक्ट रिपोर्ट भता महाविदयालयाकरीता ड्रेसकोड, वैदयकिय अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांकरीता अॅपरन, स्टेट्सस्कोप, अभियांत्रिकी विदयार्थ्यांसाठी बॉयलर सुट, ड्रॉईंग बोर्ड, लॅब अॅपरन, छत्री, रेनकोड, गमबुट, सहल भत्ता, इत्यादी प्रकारच्या सोयी विनामूल्य उपलब्ध करून…
कोल्हापूर , १४ सप्टेंबर : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने गणेशोत्सवातील कला, परंपरा आणि सांस्कृतिक वारशाला जागतिक स्तरावर डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी ‘जागतिक महागणेशोत्सव रील स्पर्धा २०२६’ आयोजित करण्यात आली आहे. ‘जागर कलेचा, समृद्ध परंपरेचा..!’ या संकल्पनेवर आधारित ही स्पर्धा महाराष्ट्रासह भारतातील आणि जगभरातील स्पर्धकांसाठी खुली आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या संकल्पनेनुसार तसेच सांस्कृतिक विभागाचे सचिव डॉ.किरण कुलकर्णी आणि महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ‘जागतिक महागणेशोत्सव रील स्पर्धा २०२६’चे आयोजन करण्यात आले असून १४ ते २४ सप्टेंबर २०२६ या कालावधीत ही स्पर्धा राबविण्यात येणार…
कोल्हापूर, दि. १५ (जिमाका): अनुसूचित जाती (SC) प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती योजनांचे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ चे ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया महाडीबीटी २.० या नवीन प्रणालीवर सुरू करण्यात आली आहे. पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांनी भरून घेण्याचे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजेंद्र माने यांनी केले आहे. महाडीबीटी २.० पोर्टलवर इयत्ता ९ वी व १० वीतील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी भारत सरकार मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती योजना, साफसफाई व आरोग्यास धोकादायक क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांसाठी भारत सरकार मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती, इयत्ता ५ वी ते १० वीतील अनुसूचित जातीच्या मुलींसाठी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना, माध्यमिक…
कोल्हापूर, दि. 15 (जिमाका) : केंद्रीय गृह व सहकार मंत्री मा. अमित शहा हे कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे आहे. शनिवार, 19 सप्टेंबर रोजी सायं. 5.05 वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन. सायं. 5.10 वाजता शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. सायं. 5.20 वाजता शासकीय विश्रामगृह येथे आगमन. सायं. 5.20 पासून राखीव. (स्थळ : शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर) रविवार, 20 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता शासकीय विश्रामगृह येथून हुपरीकडे प्रयाण. सकाळी 11.25 वाजता कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर सहकारी साखर कारखाना, हुपरी येथे आगमन. सकाळी 11.30 ते 1 वाजता महालक्ष्मी ग्रीन एनर्जी कॉम्प्लेक्सचे भूमीपूजन आणि शेतकरी जनसभेसाठी राखीव. (स्थळ: कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर सहकारी साखर…
कोल्हापूर, दि. 15 (जिमाका) : दृष्टिहीन नागरिकांच्या शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक व पुनर्वसनासाठी काम करणाऱ्या संस्थेला जिल्ह्यातील नागरिकांनी आपल्या स्वच्छेने निधी द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईंड (नॅब) जिल्हा शाखा, कोल्हापूर यांच्यामार्फत ध्वजनिधी 2026- संकलन शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. जिल्हाधिकारी श्री. राठोड म्हणाले, नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईंड (नॅब) जिल्हा शाखा, कोल्हापूर ही संस्था गेली 36 वर्षापासून जिल्ह्यातील दृष्टिहीन नागरिकांसाठी कार्यरत आहे. या संस्थेच्या माध्यमातून दृष्टिहीन विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी मदत केली जाते. तसेच त्यांना स्वयंरोजगारासाठी सहाय्य करुन त्यांचे पुनर्वसन केले जाते. असे सांगून ते म्हणाले, जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी या…