Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: admin
कोल्हापूर, दि. ११* : आज सकाळी ६:३० वाजता कोल्हापूरच्या पोलीस परेड मैदानावर रन अँड वॉक च्या माध्यमातून उत्साहाचा धबधबा अवतरला. जिल्हा प्रशासनाने आयोजित केलेल्या नशामुक्त भारत अभियान अंतर्गत ‘नशामुक्त कोल्हापूर’ या रन-वॉक रॅलीत ६ ते ६० वयोगटातील तब्बल ५ हजारांहून अधिक बालक, महाविद्यालयीन विद्यार्थी, वयोवृद्ध नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला. या रॅलीला जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी हिरवा झेंडा दाखवत शुभारंभ केला. या रॅलीचा मार्ग पोलीस परेड ग्राऊंड (कसबा बावडा) येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आणि पुन्हा परत पोलीस परेड ग्राऊंड असा होता. ही दौड सर्व वयोगटांसाठी खुली आणि मोफत होती. आरोग्य, फिटनेस…
कोल्हापूर, दि. १० (जिमाका) : पर्यावरणपूरक जीवनशैलीचा प्रसार आणि प्रदूषण कमी करण्याच्या उद्देशाने आज १० ऑक्टोबर रोजी संपूर्ण जिल्ह्यात ‘ग्रीन डे’ उपक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमात जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय संस्था, शैक्षणिक संस्था तसेच नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला. जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी स्वतः सायकलचा वापर करुन कार्यालयात येत उपक्रमात प्रत्यक्ष सहभाग घेत पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला. या अभिनव उपक्रमाद्वारे कोल्हापूर जिल्ह्याने देशभरात पर्यावरणपूरक जीवनशैलीचा आदर्श निर्माण केला असून, हा उपक्रम केवळ एका दिवसापुरता न राहता वर्षभर आपल्या दैनंदिन जीवनात अंमलात आणावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले. सर्व…
कोल्हापूर, दि. ४ : मराठवाड्यातील पूरग्रस्त बांधवांसाठी कोल्हापुरातील सामाजिक संस्था आणि नागरिकांनी पुढाकार घेत सढळ हाताने मदत केली आहे. नृसिंह सरस्वती देवस्थान, नृसिंह वाडी, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर यांच्याकडून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ५ लाख रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला. हा धनादेश संस्थानचे अध्यक्ष वैभव पुजारी आणि सहकारी संस्था सदस्य यांनी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्यमंत्री सहाय्यता निधी जिल्हा कक्षाचे प्रमुख डॉ. चंद्रकांत परुळेकर आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांना सुपूर्द केला. याशिवाय, ज्येष्ठ नागरिक संघ, हुपरी यांच्याकडून १५ हजार रुपयांचा धनादेशही या निधीसाठी प्राप्त झाला. आतापर्यंत एकूण ५ लाख १७ हजार १११ रुपयांचा मदतनिधी पूरग्रस्तांसाठी जमा झाला आहे,…
कोल्हापूर, दि.०४ : महाराष्ट्रात एक ऐतिहासिक पाऊल उचलत कोल्हापूर जिल्ह्यात प्रथमच तृतीयपंथी समुदायाच्या मैत्री संघटनेला रास्त भाव धान्य दुकानाचा परवाना मंजूर झाला आहे. तृतीयपंथी समुदायाला भेदभाव, गरिबी, सामाजिक बहिष्करण आणि रोजगाराच्या संधी मिळण्यातील अडचणींना सामोरे जावे लागते. या पार्श्वभूमीवर, त्यांना रोजगाराचे साधन आणि मूलभूत हक्क मिळावेत, यासाठी मैत्री संघटनेने राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे यांच्याकडे मागणी केली होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत, जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी नवीन रास्त भाव धान्य दुकान प्रक्रिया राबवली. त्यानुसार, कोल्हापूर शहरात मैत्री संघटनेची निवड करून त्यांना नवीन दुकानाचा परवाना देण्यात आला. हा महाराष्ट्रातील पहिलाच प्रयोग असून, यामुळे तृतीयपंथी समुदायासाठी एक आदर्श…
कोल्हापूर, दि. ४ ऑक्टोबर २०२५ – पोदार इंटरनॅशनल स्कूल, कोल्हापूर येथे नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. शाळेतील नर्सरी ते १० वीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला. उत्सवाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून गरबा आणि ढोल ताशाच्या तालावर नृत्य सादर केले. विविध गायन स्पर्धा,नृत्य स्पर्धा,रांगोळी, नृत्य आणि देवींच्या स्वरूपातील सादरीकरण विद्यार्थ्यांनी रंगतदार पद्धतीने सादर केल्या. शाळेच्या परिसरात देवीची आकर्षक सजावट करण्यात आली होती. मुख्याध्यापिका शिल्पा कपूर,उपमुख्याध्यापिका मनीषा अंब्राळे व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवत कार्यक्रमाची शोभा वाढवली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृतीचे आणि परंपरेचे महत्व समजून घेण्यास मदत झाली.
नृसिंहवाडी ता.शिरोळ येथील दत्तमंदिर परिसरातील छत्रपती शाहू महाराजांनी सुरू केलेल्या धार्मिक परंपरा पुन्हा सुरू करण्याची मागणी तीव्र झाली आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने सनई-चौघडा, नगारा आणि इतर पारंपरिक कार्यक्रम बंद केल्याच्या निषेधार्थ ‘छत्रपती राजे प्रेमीं’ आणि सामाजिक कार्यकर्ते मोरया ग्रुप पुणे चे अध्यक्ष योगेश घुले व सकल मराठा क्रांती मोर्चाचे नेते सागर धनवडे यांच्यातर्फे निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात नमूद आहे की, शाहू महाराजांनी दत्तमंदिरातील आरती व पूजेच्या वेळी सनई-चौघडा आणि नगारा सुरू करण्याची परंपरा रुजवली होती. समता, श्रद्धा आणि लोकपरंपरेचे दर्शन घडवणाऱ्या या प्रथा सि. स. नं. ४६९ येथील त्यांच्या धर्मशाळा आणि नगारखान्यातून चालवल्या जात. ही जागा…
कोल्हापूर : प्रतिनिधी: शाही दसरा महोत्सवाला वेगळी ओळख आणि ऐतिहासिक वारसा आहे. यावर्षी राज्य शासनाने राज्यातील प्रमुख महोत्सवांमध्ये कोल्हापूरच्या शाही दसरा महोत्सवाचा समावेश केल्याने आपणा सर्वांचा हा सन्मान आहे. हा महोत्सव सर्वांनी मिळून यशस्वी करूया, असे आवाहन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले. यावेळी त्यांच्या हस्ते शाही दसरा महोत्सवाच्या लोगोचे अनावरण करण्यात आले. सोमवार दिनांक 22 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत आयोजित करण्यात आलेले विविध सांस्कृतिक कार्यक्रम, नवरात्र उत्सव आणि इतर विषयांबाबत पालकमंत्री आबिटकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात आढावा घेतला. महोत्सवाच्या तयारीबाबत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी माहिती दिली. यावेळी पालकमंत्री म्हणाले,…
कोल्हापूर दिनांक 17 – बोगस डिग्री देऊन नोकरी घेतल्याच्या प्रकरणाचा पर्दाफाश झाल्यानंतर निलंबनासह पुढील कार्यवाही शासनाकडून सुरू असताना संबंधित शिक्षक आणि संस्था चालक हे संगनमताने तक्रारदाराला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा होऊ लागल्या आहेत.त्या अनुषंगाने संस्थाचालकांच्या हा विषय जिव्हारी लागल्याने सूड भावनेने तक्रादाराला खोट्या गुन्ह्यात अडकविण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे समजते.त्याकामी राजकीय हस्तक्षेप होण्याच्या हालचाली सुरू असल्याचे समजते.
कोल्हापूर, दि. 11 (जिमाका): अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या राज्यातील सर्व लाभार्थींना आता CSC (कॉमन सर्व्हिस सेंटर) केंद्रामधून महामंडळाच्या योजनांचा लाभ माफक दरात घेता येणार आहे. याबाबतचा सामंजस्य करार (M0U) महामंडळाच्या मुख्य कार्यालयात महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख व CSC चे प्रमुख वैभव देशपांडे उपस्थितीत करण्यात आला आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे राज्यातील सर्व लाभार्थी आता त्यांच्या जवळच्या कोणत्याही CSC केंद्रावर जाऊन महामंडळच्या योजनाचा लाभ कमी दरात घेऊ शकतील. यामध्ये महामंडळच्या योजनांसाठी ऑनलाइन अर्ज भरणे ,कागदपत्रे आपलोड करणे,योजनेची सध्यस्थिती तपासणे आणि आवश्यक मार्गदर्शन मिळवणे यासारख्या सुविधांचा समावेश आहे. राज्यामध्ये CSC चे ७२ हजार पेक्षा जास्त केंद्र कार्यरत…
*कोल्हापूर, दि. ०८ (जिमाका)* : या वर्षीचा नवरात्रोत्सव दि. २४ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान असून जिल्हा प्रशासनाकडून तयारीच्या अनुषंगाने नियोजन बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी भाविकांसाठी नवरात्रोत्सवात चांगल्या सुविधा देण्याचे निर्देश संबंधित सर्व विभागांना दिले. ते म्हणाले, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतुक मार्गावर योग्य पद्धतीने उपाययोजना राबवा आणि शहरातील गर्दी टाळण्यासाठी बाहेर पुरेशी वाहनतळ व्यवस्था करा. याबाबत दोन दिवसात निर्णय घेवून जागा निश्चिती आणि आवश्यक कामे पूर्ण करा. नवरात्रोत्सवात करावयाच्या कामांच्या अनुषंगाने तसेच आवश्यक नियोजनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात शाहूजी सभागृहात बैठक घेण्यात आली. जिल्हाधिकारी म्हणाले, भाविकांना चांगल्या पध्दतीने दर्शन घेण्यासाठी रांगांची व्यवस्था करा, स्वच्छता विषयक कामांना सुरुवात करा,…