Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: admin
कोल्हापूर, दि. २३ (जिमाका) : भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य शासकीय समारंभ सोमवार, दिनांक २६ जानेवारी २०२६ रोजी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याहस्ते व सह पालकमंत्री माधुरी मिसाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी ९.१५ वाजता पोलीस परेड ग्राऊंड, कोल्हापूर येथे होणार आहे. या कार्यक्रमास स्थानिक लोकप्रतिनिधी, नागरिक, स्वातंत्र्य सैनिक व शहिद जवानांचे कुटुंब यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. ध्वजारोहणाचा समारंभ सुरु होण्यापूर्वी २० मिनिटे आसनस्थ व्हावे व सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतीही बॅग सोबत आणू नये असेही आवाहन करण्यात आले आहे. मुख्य शासकीय समारंभात निमंत्रितांना सहभागी होता यावे यासाठी दि. २६…
कोल्हापूर, दि. २३ : २५ जानेवारी या १६ व्या ‘राष्ट्रीय मतदार दिना’च्या निमित्ताने संपूर्ण देशभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात प्रशासनातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांसह मतदानाची सामूहिक प्रतिज्ञा घेतली. यावेळी उपजिल्हाधिकारी (निवडणूक) गीता गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, उपजिल्हाधिकारी (महसूल) डॉ. संपत खिलारी, जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ, नायब तहसीलदार जयंत गुरव यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. “आम्ही, भारताचे नागरिक, लोकशाहीवर दृढ निष्ठा ठेवून, अशी प्रतिज्ञा घेतो की, देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू. मुक्त, निष्पक्ष व शांततापूर्ण निवडणुकांचा गौरव कायम राखू. तसेच…
कोल्हापूर, दि. २३* : महिलांकडे पाहण्याचा पुरूषांचा दृष्टीकोन बदलण्याबरोबरच महिलांचेही महिलांप्रती वर्तन बदलल्यास समाज खऱ्या अर्थाने बदलेल, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी आज येथे केले. महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि शिवाजी विद्यापीठाची अंतर्गत तक्रार समिती, बेटी बचाओ अभियान आणि विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शिवाजी विद्यापीठात आज एकदिवसीय ‘सक्षमा: महिलांविषयक कायदे जाणीव जागृती आणि अंधश्रद्धा निर्मूलनातून महिला सक्षमीकरण’ या कार्यशाळेचे उद्घाटन श्रीमती चाकणकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास शिंदे, पोलीस उपअधीक्षक सुवर्णा पत्की प्रमुख उपस्थित होते. रुपाली चाकणकर म्हणाल्या, कोल्हापूर ही राजर्षी शाहू महाराजांची पुरोगामी नगरी असून महाराणी…
कोल्हापूर दि. 20 (जिमाका) : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी जिल्हा परिषद व त्याअंतर्गत 12 पंचायत समितीमार्फत 20 जानेवारी रोजी 722 उमेदवारांना 1 हजार 117 नामनिर्देशनपत्रे वितरण करण्यात आली . आज अखेर एकूण 2 हजार 633 उमेदवारांना 4 हजार 968 इतकी नामनिर्देशनपत्रे वितरीत करण्यात आली आहेत. आज 20 जानेवारी रोजी निवडणूक विभागातून 267 व निर्वाचक गणातून 328 नामनिर्देशपत्र दाखल झाली. आजअखेर निवडणूक विभागातून एकूण 309 तर निर्वाचक गणातून 371 नामनिर्देशपत्र दाखल झाली आहेत. ***
कोल्हापूर, दिनांक २० (जिमाका): जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने नामनिर्देशन पत्र सादर करण्याचा उद्या, बुधवार दिनांक २१ जानेवारी हा अंतिम दिवस आहे. या पार्श्वभूमीवर, कोणत्याही स्तरावर तांत्रिक अडथळा किंवा गोंधळ निर्माण होऊ नये, यासाठी निवडणूक यंत्रणेने आवश्यक ती सर्व खबरदारी घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज येथे दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित दूरदृश्य प्रणाली (Video Conferencing) बैठकीद्वारे त्यांनी जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रियेचा आढावा घेतला. यावेळी पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, महसूल उपजिल्हाधिकारी डॉ. संपत खिलारी यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रशासकीय नियोजनाबाबत महत्त्वाचे निर्देश: * कार्यालयीन वेळ: नामनिर्देशन पत्राचा अंतिम दिवस असल्याने होणारी संभाव्य गर्दी…
कोल्हापूर, दि. २१ : मागच्या आठवड्यामध्ये राधानगरी तालुक्यातील ओलवण, दाजीपूर येथील जंगलामध्ये माकडताप या आजारीसाठी कारणीभूत असणाऱ्या गोचीडचे सर्वेक्षण करण्यात आले. यासाठी मणीपाल इंस्टीट्युट ऑफ व्हायरॉलॉजी कर्नाटक येथील टीमने सहाय्यक संचालक हिवताप कार्यालय, कोल्हापूर यांच्या मदतीने सर्वेक्षण केले. यावेळी दाजीपूर जंगल परिसरामध्ये 50-60 गोचीड मिळाले आहेत. या गोचीडमधून विषाणू आहेत किंवा नाहीत याची खातरजमा करण्यासाठी नॅशनल इंस्टीट्युट ऑफ व्हायरॉलॉजी पुणे येथे पाठविण्यात आले आहेत. अद्याप अहवाल येणे बाकी आहे. तथापि, या आजाराविषयी थोडे जाणून घेवूया. क्यासनूर फॉरेस्ट डिसीज KFD (माकडताप)- क्यासनूर फॉरेस्ट डिसीज ज्याला स्थानिक भाषेत (माकडताप) असे म्हणतात. या रोगाचा शोध सर्वप्रथम मार्च 1957 मध्ये लागला. कर्नाटकातील शिमोगा जिल्ह्यातील…
नांदेड, दि. 21: शीख धर्माचे नववे गुरु श्री गुरु तेग बहादुर यांच्या ३५० व्या शहीदी समागम- हिंद-की-चादर शताब्दी कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यातील संपूर्ण आरोग्य यंत्रणा सज्ज झाली असून, लाखो भाविकांच्या आरोग्य सुरक्षेसाठी अत्यंत काटेकोर, बहुस्तरीय व समन्वयित वैद्यकीय व्यवस्थापन उभारण्यात आले आहे. 24 व 25 जानेवारी २०२६ रोजी नांदेड शहरात होणाऱ्या मुख्य सोहळ्यासाठी राज्यभरासह देशाच्या विविध भागांतून १० लाखांपेक्षा अधिक भाविक सहभागी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर २२ ते २६ जानेवारी २०२६ या पाच दिवसांच्या कालावधीत अखंड आरोग्य सेवा उपलब्ध असणार आहे. मुख्यमंत्री कार्यालयाच्या निर्देशानुसार सूक्ष्म नियोजन मुख्यमंत्री कार्यालयाच्या स्पष्ट निर्देशानुसार विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, जिल्हाधिकारी राहुल कर्डीले तसेच मुख्यमंत्री…
कोल्हापूर, दि. २१ : मागच्या आठवड्यामध्ये राधानगरी तालुक्यातील ओलवण, दाजीपूर येथील जंगलामध्ये माकडताप या आजारीसाठी कारणीभूत असणाऱ्या गोचीडचे सर्वेक्षण करण्यात आले. यासाठी मणीपाल इंस्टीट्युट ऑफ व्हायरॉलॉजी कर्नाटक येथील टीमने सहाय्यक संचालक हिवताप कार्यालय, कोल्हापूर यांच्या मदतीने सर्वेक्षण केले. यावेळी दाजीपूर जंगल परिसरामध्ये 50-60 गोचीड मिळाले आहेत. या गोचीडमधून विषाणू आहेत किंवा नाहीत याची खातरजमा करण्यासाठी नॅशनल इंस्टीट्युट ऑफ व्हायरॉलॉजी पुणे येथे पाठविण्यात आले आहेत. अद्याप अहवाल येणे बाकी आहे. तथापि, या आजाराविषयी थोडे जाणून घेवूया. क्यासनूर फॉरेस्ट डिसीज KFD (माकडताप)- क्यासनूर फॉरेस्ट डिसीज ज्याला स्थानिक भाषेत (माकडताप) असे म्हणतात. या रोगाचा शोध सर्वप्रथम मार्च 1957 मध्ये लागला. कर्नाटकातील शिमोगा जिल्ह्यातील…
कोल्हापूर दि. 19 (जिमाका): महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे कार्यालयामार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) 2025 चे पेपर क्र. 1 व पेपर क्र. 2 ची अंतिम उत्तरसूची महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या http://mahatet.in या अधिकृत संकेतस्थळावर 12 जानेवारी रोजी प्रसिध्द झाली. पेपर क्र. 1 व पेपर क्र. 2 साठी प्रविष्ठ झालेल्या उमेदवार, परीक्षार्थ्यांचा अंतरिम निकाल 26 जानेवारी रोजी http://mahatet.in या संकेतस्थळावर उमेदवार, परीक्षार्थ्यांच्या लॉगिनमध्ये ऑनलाईन पद्धतीने सायंकाळी 6 वाजल्यापासून पाहता येईल. अंतरिम निकालाच्या अनुषंगाने गुण पडताळणी करावयाची असल्यास अथवा त्रुटी किंवा आक्षेप असल्यास http://mahatet.in या संकेतस्थळावर 21 जानेवारी रोजी सांयकाळी 6 वाजेपर्यंत उमेदवार, परीक्षार्थीना लॉगीनमधून ऑनलाईन पद्धतीने आक्षेप नोंदवू शकतील.अन्य मार्गाने…
कोल्हापूर दि. 19 (विमाका): शीख धर्माचे नववे धर्मगुरू श्री. गुरु तेग बहादूर साहेब जी यांच्या 350 व्या शहिदी समागम वर्षानिमित्त विभागीय माहिती कार्यालय कोल्हापूर अंतर्गत कार्यरत असणाऱ्या जिल्हा माहिती कार्यालय, कोल्हापूर, सांगली व सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील विद्यार्थी, युवक व सर्व सामान्य नागरिकांचा या कार्यक्रमामध्ये सक्रिय सहभाग असावा, या उद्देशाने इयत्ता 8 ते 12 वी या वर्गातील विद्यार्थी तसेच सर्वसामान्य नागरिकांसाठी (खुला गट) अशा दोन गटात निबंध व घोषवाक्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यापूर्वी या स्पर्धेची अंतिम तारीख 20 जानेवारी होती. तथापि, आता या स्पर्धेला मुदतवाढ मिळाली असून स्पर्धक आपल्या प्रवेशिका 10 फेब्रुवारीपर्यंत पाठवू शकतील. श्री गुरु तेग बहादूर यांनी…