Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: admin
मुंबई, दि. ४ : ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, माजी राज्यपाल, डी. वाय. पाटील समूहाचे संस्थापक पद्मश्री डॉ. ज्ञानदेव यशवंतराव तथा डी. वाय. पाटील यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद असून, त्यांच्या जाण्याने शिक्षण, समाजसेवा आणि सार्वजनिक जीवनाला दिशा देणारे एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व हरपल्याची शोकभावना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी व्यक्त केली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात, डॉ. डी. वाय. पाटील यांनी शिक्षण हेच समाजपरिवर्तनाचे प्रभावी माध्यम मानून आयुष्यभर कार्य केले. देशभरात शेकडो शैक्षणिक संस्था, विद्यापीठे, वैद्यकीय, अभियांत्रिकी आणि अन्य उच्च शिक्षण संस्था उभारून त्यांनी लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याला नवी दिशा दिली. शिक्षण, आरोग्य, क्रीडा आणि समाजसेवा या क्षेत्रांतील त्यांचे योगदान अत्यंत…
मुंबई, दि.१२:- शिक्षण, सहकार क्षेत्रातील कार्याने समाजकारण, राजकारणात भरीव योगदान देणारे आणि या क्षेत्रातील अनेक संस्थांचे आधारवड ठरलेले कार्यतपस्वी नेतृत्व पद्मश्री डॉ डी. वाय पाटील यांच्या निधनाने काळाने हिरावून नेले आहे, अशी शोकभावना व्यक्त करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बिहार, पश्चिम बंगाल, त्रिपुराचे माजी राज्यपाल पद्मश्री डॉ डी. वाय. पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. डॉ. पाटील यांच्या निधनामुळे सामाजिक आणि राजकीय क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी नमूद केले आहे. शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात, डॉ. पाटील यांनी ज्ञानदेव या आपल्या नावाप्रमाणेच ज्ञानाची आराधना केली. शिक्षण क्षेत्रालाच आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले. एका छोट्याशा शाळेपासून सुरू…
गारगोटीच्या नागरिकांसाठी आरोग्य सेवेचे नवे पर्व सुरु गारगोटी उपजिल्हा रुग्णालयात अद्ययावत वैद्यकीय उपकरणांचे लोकार्पण संपन्न कोल्हापूर 03 (जिमाका) भुदरगड तालुक्यासह इतर तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्य सेवेला अधिक बळ देण्यासाठी गारगोटीला मेडिकल हब बनवणार असे, प्रतिपादन पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले. गारगोटी येथील उपजिल्हा रुग्णालयात नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या अत्यंत अद्ययावत वैद्यकीय उपकरणांचा लोकार्पण समारंभ पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी जिल्हा परिषद आरोग्य व बांधकाम सभापती सारिका नांदेकर, गारगोटी पंचायत समिती सभापती विक्रमसिंह पाटील, उपसभापती अरुणा देसाई, आरोग्य उपसंचालक डॉ. दिलीप माने, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. सरिता थोरात, गारगोटीच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. पल्लवी तारळकर व गट विकास अधिकारी शेखर…
कोल्हापूर, दि. 31 (जिमाका): जिल्ह्यात मागील 24 तासात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 13.3 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. जिल्ह्यात 24 तासात पडलेला एकूण पाऊस मिमी मध्ये पुढीलप्रमाणे – हातकणंगले- 3.2 मिमी, शिरोळ -2.2 मिमी, पन्हाळा- 7.0 मिमी, शाहुवाडी- 8.1 मिमी, राधानगरी- 13.00 मिमी, गगनबावडा- 13.3 मिमी, करवीर- 5.2 मिमी, कागल- 4.6 मिमी, गडहिंग्लज- 1.7 मिमी, भुदरगड- 5.9 मिमी, आजरा- 4.2 मिमी, चंदगड- 16.5 मिमी असा एकूण 6.4 मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे. 0000
कोल्हापूर, दि. 31 (जिमाका) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 8.35 टीएमसी पाणीसाठा आहे. आज सायंकाळी 4 च्या अहवालानुसार राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे क्रमांक 3 व 6 हे खुले झाले असून या स्वयंचलित द्वारामधून 2856 व पावर हाऊस मधून 1400 असा एकूण 4256 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ,कासारी नदीवरील- यवलूज, ठाणे आळवे, बाजार भोगाव, कांटे, करंजफेण व पेंडाखळे, भोगावती नदीवरील- सरकारी कोगे, खडक कोगे, हळदी व राशिवडे, कुंभी नदीवरील- सांगरुळ दूधगंगा नदीवरील- दत्तवाड व सुळकूड, वारणा नदीवरील – चिंचोली, माणगाव, कोडोली,खोची व चावरे वेदगंगा नदी वरील- निळपण, वाघापूर, कुरणी, बस्तवडे, चिखली, गारगोटी…
कोल्हापूर, दि. 30 (जिमाका): जिल्ह्यात मागील 24 तासात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 61.4 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. जिल्ह्यात 24 तासात पडलेला एकूण पाऊस मिमी मध्ये पुढीलप्रमाणे – हातकणंगले- 3.5 मिमी, शिरोळ -3.8 मिमी, पन्हाळा- 12.9 मिमी, शाहुवाडी- 13.1 मिमी, राधानगरी- 20.7 मिमी, गगनबावडा- 61.4 मिमी, करवीर- 9.4 मिमी, कागल- 10 मिमी, गडहिंग्लज- 10.4 मिमी, भुदरगड- 24.3 मिमी, आजरा- 18.1 मिमी, चंदगड- 36.1 मिमी असा एकूण 18.55 मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे. 0000
कोल्हापूर, दि. 30 (जिमाका) : कोल्हापूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (अ) ते (फ) आणि कलम 37 (3) अन्वये अपर जिल्हादंडाधिकारी गजानन गुरव यांनी 31 जुलै ते 12 ऑगस्ट या कालावधीत बंदी आदेश जारी केला आहे. हा हुकूम ज्या सरकारी अधिकारी, कर्मचारी यांना त्यांची कर्तव्य, अधिकार बजावण्यासंदर्भात कामकाज करताना उपनिर्दिष्ट वस्तू हाताळाव्या लागतात आणि एकत्र जमावे लागते व ज्या व्यक्तींनी पोलीस विभागाची परवानगी घेतलेली आहे, अशा व्यक्तींना तसेच सर्व जाती धर्माचे सण/उत्सव/जयंती/यात्रा इत्यादी शांततामय मार्गाने साजरे करण्याकरिता जमा होणारा जनसमुदाय यांना तसेच लग्न, इतर धार्मिक समारंभ, यात्रा, सण, प्रेतयात्रा आदींना लागू…
कोल्हापूर, दि. 30 (जिमाका) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 8.32 टीएमसी पाणीसाठा आहे. आज सायंकाळी 4 च्या अहवालानुसार राधानगरी धरणातून सिंचन तथा विद्युत विमोचकातून 1400 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, कासारी नदीवरील- यवलूज, ठाणे आळवे, बाजार भोगाव, कांटे, करंजफेण व पेंडाखळे, भोगावती नदीवरील- सरकारी कोगे, खडक कोगे, हळदी व राशिवडे, कुंभी नदीवरील- सांगरुळ व कळे, दूधगंगा नदीवरील- दत्तवाड व सुळकूड, वारणा नदीवरील – चिंचोली, माणगाव, कोडोली व खोची, वेदगंगा नदीवरील- निळपण, वाघापूर, कुरणी, बस्तवडे, चिखली, गारगोटी व म्हसवे, धामणी नदीवरील- सुळे, हिरण्यकेशी नदीवरील- साळगांव, ऐनापूर व निलजी, तुळशी नदीवरील- बीड असे…
कोल्हापूर, दि. 30 (जिमाका): वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे शुक्रवार, 31 जुलै रोजी सकाळी 7.20 वाजता कोल्हापूर शाहू महाराज टर्मिनस येथे आगमन व कागलकडे प्रयाण. सकाळी 8 वाजता कागल निवासस्थानी सर्व नागरिकांसाठी राखीव. सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबीरास कागल येथे उपस्थिती. (स्थळ: आर.के.मंगल कार्यालय, बामणी) दुपारी 1 ते 7 वाजता राखीव. सोयीनुसार कागल निवासस्थानाकडे प्रयाण, आगमन व मुक्काम. शनिवार, 1 ऑगस्ट रोजी सकाळी 7 वाजता कागल निवासस्थानी सर्व नागरिकांसाठी राखीव. सकाळी 10 वाजता छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीरास, गडहिंग्लज येथे उपस्थिती. (स्थळ: गणेश मंगल कार्यालय, गांधीनगर, गडहिंग्लज) दुपारी 12 वाजता गडहिंग्लज नगरपरिषद वर्धापन दिनानिमित्त सफाई…
ड्रग्सच्या माध्यमातून भारताच्या तरुण पिढीला कमकुवत करण्याचे शत्रूंचे षडयंत्र – कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा. प्रतिनिधी, मुंबई, ३० जुलै : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र शासनाच्या ‘ड्रग्स फ्री मुंबई’ अभियानाचे कौतुक करत, हे अभियान युवकांना जागरूक, सक्षम आणि नशामुक्त समाज घडविण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल असल्याचे म्हटले आहे. नशामुक्त भारताच्या संकल्पपूर्तीसाठी जनजागृती, कुटुंब, समाज आणि विविध संस्थांच्या सामूहिक सहभागाचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. युवकांची ऊर्जा आणि सकारात्मक विचार हे विकसित भारताचे बळ असल्याचे नमूद करत त्यांनी या ‘ड्रग्स फ्री मुंबई’ अभियानाच्या यशासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांच्या या आशयाचे पत्र ‘ड्रग्स फ्री मुंबई’ अभियान कार्यक्रमादरम्यान वाचून दाखविण्यात आले. वरळी येथील एनएससीआय डोम येथे…