Author: admin

कोल्हापूर, दि. २३* : महिलांकडे पाहण्याचा पुरूषांचा दृष्टीकोन बदलण्याबरोबरच महिलांचेही महिलांप्रती वर्तन बदलल्यास समाज खऱ्या अर्थाने बदलेल, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी आज येथे केले. महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि शिवाजी विद्यापीठाची अंतर्गत तक्रार समिती, बेटी बचाओ अभियान आणि विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शिवाजी विद्यापीठात आज एकदिवसीय ‘सक्षमा: महिलांविषयक कायदे जाणीव जागृती आणि अंधश्रद्धा निर्मूलनातून महिला सक्षमीकरण’ या कार्यशाळेचे उद्घाटन श्रीमती चाकणकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास शिंदे, पोलीस उपअधीक्षक सुवर्णा पत्की प्रमुख उपस्थित होते. रुपाली चाकणकर म्हणाल्या, कोल्हापूर ही राजर्षी शाहू महाराजांची पुरोगामी नगरी असून महाराणी…

Read More

कोल्हापूर दि. 20 (जिमाका) : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी जिल्हा परिषद व त्याअंतर्गत 12 पंचायत समितीमार्फत 20 जानेवारी रोजी 722 उमेदवारांना 1 हजार 117 नामनिर्देशनपत्रे वितरण करण्यात आली . आज अखेर एकूण 2 हजार 633 उमेदवारांना 4 हजार 968 इतकी नामनिर्देशनपत्रे वितरीत करण्यात आली आहेत. आज 20 जानेवारी रोजी निवडणूक विभागातून 267 व निर्वाचक गणातून 328 नामनिर्देशपत्र दाखल झाली. आजअखेर निवडणूक विभागातून एकूण 309 तर निर्वाचक गणातून 371 नामनिर्देशपत्र दाखल झाली आहेत. ***

Read More

कोल्हापूर, दिनांक २० (जिमाका): जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने नामनिर्देशन पत्र सादर करण्याचा उद्या, बुधवार दिनांक २१ जानेवारी हा अंतिम दिवस आहे. या पार्श्वभूमीवर, कोणत्याही स्तरावर तांत्रिक अडथळा किंवा गोंधळ निर्माण होऊ नये, यासाठी निवडणूक यंत्रणेने आवश्यक ती सर्व खबरदारी घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज येथे दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित दूरदृश्य प्रणाली (Video Conferencing) बैठकीद्वारे त्यांनी जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रियेचा आढावा घेतला. यावेळी पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, महसूल उपजिल्हाधिकारी डॉ. संपत खिलारी यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रशासकीय नियोजनाबाबत महत्त्वाचे निर्देश: * कार्यालयीन वेळ: नामनिर्देशन पत्राचा अंतिम दिवस असल्याने होणारी संभाव्य गर्दी…

Read More

कोल्हापूर, दि. २१ : मागच्या आठवड्यामध्ये राधानगरी तालुक्यातील ओलवण, दाजीपूर येथील जंगलामध्ये माकडताप या आजारीसाठी कारणीभूत असणाऱ्या गोचीडचे सर्वेक्षण करण्यात आले. यासाठी मणीपाल इंस्टीट्युट ऑफ व्हायरॉलॉजी कर्नाटक येथील टीमने सहाय्यक संचालक हिवताप कार्यालय, कोल्हापूर यांच्या मदतीने सर्वेक्षण केले. यावेळी दाजीपूर जंगल परिसरामध्ये 50-60 गोचीड मिळाले आहेत. या गोचीडमधून विषाणू आहेत किंवा नाहीत याची खातरजमा करण्यासाठी नॅशनल इंस्टीट्युट ऑफ व्हायरॉलॉजी पुणे येथे पाठविण्यात आले आहेत. अद्याप अहवाल येणे बाकी आहे. तथापि, या आजाराविषयी थोडे जाणून घेवूया. क्यासनूर फॉरेस्ट डिसीज KFD (माकडताप)- क्यासनूर फॉरेस्ट डिसीज ज्याला स्थानिक भाषेत (माकडताप) असे म्हणतात. या रोगाचा शोध सर्वप्रथम मार्च 1957 मध्ये लागला. कर्नाटकातील शिमोगा जिल्ह्यातील…

Read More

नांदेड, दि. 21: शीख धर्माचे नववे गुरु श्री गुरु तेग बहादुर यांच्या ३५० व्या शहीदी समागम- हिंद-की-चादर शताब्दी कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यातील संपूर्ण आरोग्य यंत्रणा सज्ज झाली असून, लाखो भाविकांच्या आरोग्य सुरक्षेसाठी अत्यंत काटेकोर, बहुस्तरीय व समन्वयित वैद्यकीय व्यवस्थापन उभारण्यात आले आहे. 24 व 25 जानेवारी २०२६ रोजी नांदेड शहरात होणाऱ्या मुख्य सोहळ्यासाठी राज्यभरासह देशाच्या विविध भागांतून १० लाखांपेक्षा अधिक भाविक सहभागी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर २२ ते २६ जानेवारी २०२६ या पाच दिवसांच्या कालावधीत अखंड आरोग्य सेवा उपलब्ध असणार आहे. मुख्यमंत्री कार्यालयाच्या निर्देशानुसार सूक्ष्म नियोजन मुख्यमंत्री कार्यालयाच्या स्पष्ट निर्देशानुसार विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, जिल्हाधिकारी राहुल कर्डीले तसेच मुख्यमंत्री…

Read More

कोल्हापूर, दि. २१ : मागच्या आठवड्यामध्ये राधानगरी तालुक्यातील ओलवण, दाजीपूर येथील जंगलामध्ये माकडताप या आजारीसाठी कारणीभूत असणाऱ्या गोचीडचे सर्वेक्षण करण्यात आले. यासाठी मणीपाल इंस्टीट्युट ऑफ व्हायरॉलॉजी कर्नाटक येथील टीमने सहाय्यक संचालक हिवताप कार्यालय, कोल्हापूर यांच्या मदतीने सर्वेक्षण केले. यावेळी दाजीपूर जंगल परिसरामध्ये 50-60 गोचीड मिळाले आहेत. या गोचीडमधून विषाणू आहेत किंवा नाहीत याची खातरजमा करण्यासाठी नॅशनल इंस्टीट्युट ऑफ व्हायरॉलॉजी पुणे येथे पाठविण्यात आले आहेत. अद्याप अहवाल येणे बाकी आहे. तथापि, या आजाराविषयी थोडे जाणून घेवूया. क्यासनूर फॉरेस्ट डिसीज KFD (माकडताप)- क्यासनूर फॉरेस्ट डिसीज ज्याला स्थानिक भाषेत (माकडताप) असे म्हणतात. या रोगाचा शोध सर्वप्रथम मार्च 1957 मध्ये लागला. कर्नाटकातील शिमोगा जिल्ह्यातील…

Read More

कोल्हापूर दि. 19 (जिमाका): महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे कार्यालयामार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) 2025 चे पेपर क्र. 1 व पेपर क्र. 2 ची अंतिम उत्तरसूची महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या http://mahatet.in या अधिकृत संकेतस्थळावर 12 जानेवारी रोजी प्रसिध्द झाली. पेपर क्र. 1 व पेपर क्र. 2 साठी प्रविष्ठ झालेल्या उमेदवार, परीक्षार्थ्यांचा अंतरिम निकाल 26 जानेवारी रोजी http://mahatet.in या संकेतस्थळावर उमेदवार, परीक्षार्थ्यांच्या लॉगिनमध्ये ऑनलाईन पद्धतीने सायंकाळी 6 वाजल्यापासून पाहता येईल. अंतरिम निकालाच्या अनुषंगाने गुण पडताळणी करावयाची असल्यास अथवा त्रुटी किंवा आक्षेप असल्यास http://mahatet.in या संकेतस्थळावर 21 जानेवारी रोजी सांयकाळी 6 वाजेपर्यंत उमेदवार, परीक्षार्थीना लॉगीनमधून ऑनलाईन पद्धतीने आक्षेप नोंदवू शकतील.अन्य मार्गाने…

Read More

कोल्हापूर दि. 19 (विमाका): शीख धर्माचे नववे धर्मगुरू श्री. गुरु तेग बहादूर साहेब जी यांच्या 350 व्या शहिदी समागम वर्षानिमित्त विभागीय माहिती कार्यालय कोल्हापूर अंतर्गत कार्यरत असणाऱ्या जिल्हा माहिती कार्यालय, कोल्हापूर, सांगली व सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील विद्यार्थी, युवक व सर्व सामान्य नागरिकांचा या कार्यक्रमामध्ये सक्रिय सहभाग असावा, या उद्देशाने इयत्ता 8 ते 12 वी या वर्गातील विद्यार्थी तसेच सर्वसामान्य नागरिकांसाठी (खुला गट) अशा दोन गटात निबंध व घोषवाक्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यापूर्वी या स्पर्धेची अंतिम तारीख 20 जानेवारी होती. तथापि, आता या स्पर्धेला मुदतवाढ मिळाली असून स्पर्धक आपल्या प्रवेशिका 10 फेब्रुवारीपर्यंत पाठवू शकतील. श्री गुरु तेग बहादूर यांनी…

Read More

कोल्हापूर दि. 13 (जिमाका): राज्य निवडणूक आयोगाने निर्गमित केलेल्या आदेशाप्रमाणे 15 जानेवारी रोजी राज्यातील 29 महानगरपालिकांमध्ये सार्वत्रिक निवडणूक घेतली जाणार आहे. त्यानुसार निवडणुकीमध्ये मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी महाराष्ट्र शासन उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाच्या शासन परिपत्रकाव्दारे उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यादींना लागू राहिल (उदा. खासगी कंपन्यांमधील आस्थापना, सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्य गृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स, रिटेलर्स इ.) मध्ये काम करणाऱ्या कामगार मतदारांना व निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार, अधिकारी, कर्मचाऱ्यांना मग ते कामानिमित्त निवडणूक…

Read More

कोल्हापूर दि. 13 (जिमाका): महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत 23 नोव्हेंबर रोजी घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेची अंतरिम उत्तरसूची 19 डिसेंबर रोजी प्रसिध्द करण्यात आली होती. या परीक्षेच्या पेपर क्रमांक 1 व 2 च्या प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्नाबाबत किंवा पर्यायी उत्तराबाबत त्रुटी, आक्षेप असल्यास ते परीक्षा परिषदेकडे 27 डिसेंबर अखेर पाठविण्याबाबत 19 डिसेंबर रोजीच्या प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळवण्यात आले होते. विहित मुदतीत प्राप्त झालेल्या लेखी निवेदनांवर विषयतज्ज्ञांचे अभिप्राय घेवून अंतिम उत्तरसूची प्रसिध्द करण्यात येत आहे. या अंतिम उत्तरसूचीबाबत कोणतेही निवेदन, आक्षेप स्वीकारले जाणार नाहीत. या अंतिम उत्तरसूचीनुसार MAHATET 2025 परीक्षेचा निकाल यथावकाश परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत देण्यात…

Read More