Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: admin
पुणे, दि.१: “माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” हे केवळ अभियान नसून ती एक व्यापक लोकचळवळ बनावी आणि लोकसहभागातून राज्यभर आरोग्याचा जागर व्हावा हेच या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट आहे. या अभियानात उपचारांपेक्षा प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर देणे, ग्रामीण भागातील नागरिकांच्या सामुहिक वर्तणुकीत बदल घडविणे आणि आरोग्यदायी जीवनशैली रुजविण्यावर या मोहिमेत भर देण्यात आल्यामुळे लोकसहभागाच्या माध्यमातून आरोग्य संपन्न गाव करण्यावर भर द्यावा, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबीटकर यांनी केले. या अभियानामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा व तालुका यंत्रणा, प्राथमिक आरोग्य केंद्रे, आरोग्य उपकेंद्रे व या ठिकाणी कार्यरत समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्यसेवक, सेविका व आशा तसेच ग्रामस्थांचा सक्रीय सहभाग महत्वपूर्ण…
कोल्हापूर, दि. 30 (जिमाका) : केंद्र शासन पुरस्कृत ‘उल्लास – नव भारत साक्षरता कार्यक्रम’ (ULLAS Nav Bharat Saksharata Karyakram) अंतर्गत असाक्षरांना साक्षर करण्यासाठी राज्यभर राबविण्यात येणारी पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी (FLNAT) रविवार, दि. 29 मार्च 2026 रोजी यशस्वीरीत्या पार पडली. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सन 2022-23 ते 2026-27 या कालावधीत हा कार्यक्रम राबविण्यात येत असून, सन 2025-26 मध्ये उल्लास अॅपवर नोंदणी झालेल्या असाक्षरांसाठी ही परीक्षा राज्यातील सर्व जिल्ह्यांतील युडायस प्राप्त शाळांमध्ये घेण्यात आली. ही परीक्षा मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, गुजराती, कन्नड, तेलगू, तामिळ आणि बंगाली अशा नऊ माध्यमांतून आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेत निकषानुसार उत्तीर्ण झालेल्या परीक्षार्थींना…
कोल्हापूर, दि. 30 (जिमाका) : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) तर्फे राज्यातील खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील, अमृतच्या लक्षित गटातील, (ब्राह्मण, कायस्थ, कोमटी, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, वैश्य, नायर, नायडू, कम्मा, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगूनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, हिंदू नेपाली, भूमिहार, लोहाणा, कानबी, इत्यादी) उमेदवारांना ‘महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) गट-ब (अराजपत्रित) सेवा मुख्य परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी व मुलाखतीच्या पूर्वतयारीसाठी उत्तीर्ण उमेदवारांना प्रोत्साहनात्मक अर्थसहाय्य’ (सन 2025-26) योजना राबविण्यात येत आहे. सन 2025-26 मध्ये महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2025 उत्तीर्ण झालेल्या आणि आर्थिक सहाय्याचा लाभ घेण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. यासाठी संबधितांनी…
कोल्हापूर दि : 30 (जिमाका) संपूर्ण जगासाठीच सूर्य हा मोफत ऊर्जेचा कधीही न संपणारा अखंड नैसार्गिक स्त्रोत आहे.याचा पुरेपूर वापर करित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेली “पी. एम. सूर्यघर योजना” संपूर्ण जिल्ह्याभर घरोघरी राबविण्याचा निर्धार वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात आज श्री. मुश्रीफ यांच्या उपस्थितीत विविध प्रश्नांचा आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे प्रामुख्याने उपस्थित होते . ते म्हणाले, या योजनेमुळे सूर्यप्रकाशाच्या माध्यमातून निर्माण झालेली वीज संबंधिताला मोफत मिळेल.अनुदान वजा जाता सुरुवातीची तीन वर्षे साधारणता दरमहा वीज बिला एवढाच हप्ता बसेल. त्यानंतर दरमहा येणारे वीज बिल शून्य होईल.पर्यायाने,पर्यावरणाच्या संरक्षणालाही हातभार लागेल.पी.एम.सूर्यघर योजनेच्या…
कोल्हापूर (प्रतिनिधी): येथील ऐतिहासिक मिरजकर तिकटी येथे हिंदू एकता आंदोलन, कोल्हापूर यांच्या वतीने श्रीराम नवमी उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. उत्सवाच्या तिसऱ्या दिवशी, शनिवारी (२८ मार्च) आयोजित करण्यात आलेल्या भव्य महाप्रसादाचा लाभ ३००० हून अधिक रामभक्तांनी घेतला, अशी माहिती हिंदू एकता आंदोलनाचे जिल्हाप्रमुख दिपक देसाई यांनी दिली. भक्तीमय वातावरणात महाआरती शनिवारी दुपारी ठीक १२ वाजता मिरजकर तिकटी येथे उभारण्यात आलेल्या भव्य मंडपात प्रभू श्रीरामाची विधिवत पूजा करण्यात आली. संघटनेच्या वरिष्ठ कार्यकर्त्यांच्या हस्ते पारंपरिक पद्धतीने आणि भावपूर्ण वातावरणात महाआरती संपन्न झाली. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी व भाविकांनी दिलेल्या ‘जय श्री राम’ च्या जयघोषाने संपूर्ण मिरजकर तिकटी परिसर दुमदुमून…
कोल्हापूर दि :27 (जिमाका) इराण,अमेरिका – इस्राईल यांच्या युद्धामुळे सध्या सर्वत्र इंधन टंचाई जाणवत आहे .तथापि देश आणि राज्याकडे सुमारे दोन महिने पुरेल इतका इंधनसाठा (पेट्रोल – डिझेल,गॅस) आहे.त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता जिल्हा प्रशासनास आवश्यक ते सहकार्य करावे आणि अनावश्यक गर्दी टाळावी असे आवाहन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष तथा आ.राजेश क्षीरसागर यांनी केले . जिल्ह्यात गॅस व पेट्रोल टंचाई संदर्भात विविध अफवा पसरलेल्या आहेत.त्या अनुषंगाने आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात आज आढावा बैठक घेण्यात आली . सध्या गॅस व पेट्रोल तसेच डिझेल टंचाईच्या अनुषंगाने नागरिक पॅनिक झाले आहेत. वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर नागरिक गॅस सिलेंडरसाठी तळपत्या उन्हात तासंन…
कोल्हापूर, दि. 27 (जिमाका): वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे आहे. रविवार, 29 मार्च रोजी सकाळी 7.20 वाजता कोल्हापूर शाहू महाराज टर्मिनस येथे महालक्ष्मी एक्सप्रेसने आगमन व राखीव. सकाळी 8 वाजता सर्व नागरिकांसाठी राखीव. (स्थळ : निवासस्थान कागल) सकाळी 10.30 वाजता हॉटेल स्वागत, परिते ता. करवीर आयोजित रौप्य महोत्सव व उद्घाटन समारंभास उपस्थिती. (स्थळ : परिते, ता. कागल) दुपारी 12 ते 7 राखीव. सोयीनुसार कागल निवासस्थानाकडे प्रयाण, आगमन व मुक्काम. (स्थळ : निवासस्थान कागल) सोमवार, 30 मार्च रोजी सकाळी 7 वाजता सर्व नागरिकांसाठी राखीव. (स्थळ : निवासस्थान कागल) सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे…
कोल्हापूर दिनांक 24-सहकार क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनने पुढाकार घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून, फेडरेशनच्यावतीने ३ एप्रिल रोजी महिलांसाठी प्रशिक्षण शिबिर आणि चर्चासत्र आयोजित केले आहे. सहकारी पतसंस्था क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांना, सहकार सम्राज्ञी पुरस्काराने गौरवले जाणार आहे. राज्य फेडरेशनचे महासचिव शशिकांत राजोबा आणि भागीरथी पतसंस्थेच्या अध्यक्षा सौ. अरुंधती महाडिक यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्यावतीने ३ एप्रिल रोजी कोल्हापुरातील सायबर महाविद्यालयाच्या आनंद भवन सभागृहात महिला मेळावा आयोजित केला आहे. यापूर्वी शिर्डी येथील पतसंस्था फेडरेशनच्या प्रशिक्षण केंद्रात तीन वेळा मेळावे झाले आहेत. त्यानंतर नाशिक तसेच जुन्नर तालुक्यातील…
पल्स वैद्यकीय परिषदेच्या माध्यमातून आरोग्य व वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील नवोन्मेष, संशोधन पुढे येईल. या क्षेत्रात नवनवीन संकल्पना, कार्य करणाऱ्या स्टार्टअप्सलाही परिषदेत व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. जगभरातून उद्योग क्षेत्रात कार्यरत असलेले तज्ज्ञ, अभ्यासक, संशोधक परिषदेत येणार आहेत. त्यामुळे आपल्या आरोग्यवस्थेचा पाया अधिक बळकट करणे शक्य होणार आहे. भविष्यातील वैद्यकीय शिक्षण हे केवळ पुस्तकांपुरते मर्यादित राहणार नाही, तर तंत्रज्ञानाधारित, संशोधनकेंद्रित आणि प्रत्यक्ष अनुभवावर आधारित असणे अत्यावश्यक आहे. आज आरोग्य क्षेत्र झपाट्याने बदलत आहे, त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांना केवळ पदवी नव्हे, तर जागतिक स्तरावर स्पर्धा करण्याची क्षमता देणे ही काळाची गरज आहे. यासाठी काही महत्त्वाचे बदल आवश्यक आहेत. डिजिटल आणि सिम्युलेशन-आधारित शिक्षण, व्हर्चुअल…
तरुणांनी मोबाईलचा वापर करिअरसाठी करावा – जिल्हाधिकारी अमोल येडगे नीम करोली बाबा चॅरिटेबल ट्रस्ट आणि छत्रपती प्रमिलाराजे शासकीय सर्वोपचार रुग्णालय, कोल्हापूर रुग्णालय यांच्या सहकार्याने आयोजित शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागाच्या वतीने आज, २४ मार्च रोजी ‘आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबिराचे’ आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा उद्घाटन सोहळा कोल्हापूरचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी अमोल येडगे (IAS) यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुण्यांना मानवंदना देण्यात आली व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून सोहळ्याची सुरुवात झाली. याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी भौतिकशास्त्र विभागाने आयोजित केलेल्या या उपक्रमाचे आणि उत्कृष्ट संयोजनाचे कौतुक केले.…