Author: admin

कोल्हापूर दिनांक 24 – कोल्हापूर मधील जुना बुधवार पेठेच्या तालमीलगत असणाऱ्या संजय फरसाण केंद्र चे तरुण उद्योजक प्रतीक पाटील यांचा आज वाढदिवस.वडील संजय पाटील यांच्या 40 वर्षे प्रवासाची भागदौड यशस्वीपणे सांभाळणारा मृदुभाषिक मनमिळावू संयमी व्यक्तिमत्व लाभलेल्या या तरुणाने अल्पावधीतच आपल्या कष्टाची चुणूक दाखवली आहे. सर्व सुख सुविधा पायाशी लोळण घेत असताना श्रीमंतांची कित्येक मुले व्यसनाधीन आणि वाम मार्गाला लागल्याचे चित्र आपल्याला पहायला मिळते.परंतु संजय पाटील यांचे एकुलते एक सुपुत्र प्रतीक पाटील यांनी वडिलांच्या हातावर हात ठेवून व्यवसायासाठी कष्टाची निवड केली.संजय फरसाण संपूर्ण महाराष्ट्रात नावाजलेला ब्रँड असताना त्याची भागदौड प्रतीक ने यशस्वीरित्या सांभाळून दाखवत वडिलांचा विश्वास सार्थ ठरविला आहे.आजही प्रतीक…

Read More

शिव आरोग्य सेना आयोजित डॉ संतोष पाटील यांच्या पूजा क्लिनिक व जानकी हॉस्पिटल यांच्या मार्फत वतीने आज कनेरकर नगर येथे मोफत भव्य आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते शिबिरा अंतर्गत मोफत ई सी जी, रक्तातील शुगर, ब्लड प्रेशर ची तपासणी करण्यात आली तसेच ह्यावेळी ४०० पेक्षा जास्त लोकांनी ह्याचा लाभ घेतला व कोल्हापुरातील आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ठ काम करणाऱ्या व वेळोवेळो गरीब लोकांना सहकार्य करण्याऱ्या डॉ शिरीष मिरगुंडे, डॉ गीता पिल्लाई, डॉ सारंग खोचीकर, डॉ प्रशांत चौधरी, डॉ जयंत भोसले, डॉ विकास कागले, डॉ अजित सर, कोरोना काळातील कर्तव्या साठी हर्षल सुर्वे, आरोग्य मित्र बंटी सावंत, सुधीर बुवा यांच्या ११ जणांचे…

Read More

कोल्हापूर (जिमाका ) दि : 22 या नगरीत राज्य शासनाच्यावतीने २४ ते २६ मार्च या कालावधीत विधीनाटय महोत्सव आयोजित करण्यात येणार असून या विधीनाटय महोत्सवात राज्यातील विविध भागातील लोककलावंत पारंपरिक लोककलांचे सादरीकरण करणार आहेत. सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने राज्यामधील लोककलेचे जतन व संवर्धन व्हावे या दृष्टीने विविध लोककला महोत्सव तसेच कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. महाराष्ट्राला समृदध असा लोककलां व संस्कृतीचा वारसा लाभलेला आहे. या समृदध वारशाचे जतन व संवर्धन करण्याचे कार्य शासन विविध उपक्रमांच्या माध्यमातून करत आहे. राज्यातील दूर्मिळ होत चाललेल्या लोककलांना उर्जितवस्था प्राप्त होणे, त्यांचा वारसा टिकविणे, या लोककलांना प्रोत्साहन देऊन या संस्कृतीविषयी अस्मिता…

Read More

कोल्हापूर (जिमाका ) दि : 22 पौष्टिक तृणधान्यांचे आहारातील महत्व याबाबत जनजागृती करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते कृषि विभाग कोल्हापूर यांच्यावतीने अन्न आणि पोषण अन्नधान्य पिके सन २०२४-२५ योजनेअंतर्गत २२ मार्च रोजी मौजे कुर ता. भुदरगड येथे मिलेट महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले . प्रारंभी पालकमंत्री आबिटकर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या रॅलीला प्रारंभ करण्यात आला . या मिलेट रॅलीचे कुर -कोनवडे- नीळपण- दरवाड- म्हसवे- गारगोटी – कुर या मार्गावर आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे पालकमंत्री आबिटकर यांनी स्वतः बुलेट चालवत या रॅलीमध्ये इतरांना प्रोत्साहित केले . यावेळी पालकमंत्र्यांनी महात्मा फुले…

Read More

कोल्हापूर, दि. 22 (जिमाका) : जिल्ह्यातील 9 वर्षे पूर्ण झालेल्या मुली ते अविवाहित 26 वर्षापर्यंतच्या मुलींना एचपीव्ही लसीकरण गरजेचे आहे. तोंडाचा, स्तन व गर्भाशय पिशवीचा कर्करोग रोगाचा प्रमाण अधिक आहे. एचपीव्ही लसीकरणाने मुलींना सक्षम व आरोग्यदायी कॅन्सर मुक्तीसाठी प्रयत्न करूया, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. गडहिंग्लज नगरपरिषदेच्या छत्रपती शाहू सभागृहात आयोजित एचपीव्ही(HPV) लसीकरणाच्या नियोजन बैठकीत ते बोलत होते. श्री. मुश्रीफ म्हणाले, देशात दर 8 मिनिटांनी एक महिला गर्भाशयांच्या कर्करोगाने मृत्युमुखी पडत असून हे थांबायला हवे. या कर्करोग मुक्तीसाठी ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस (HPV) प्रतिबंधक लस ही मुली व महिलांसाठी आरोग्यदायी आहे. मुलींच्या शरीरावर, प्रजनन क्षमतेवर कोणताही परिणाम…

Read More

कोल्हापूर दि 21 (जिमाका): शासनाकडून दि. 01 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (HSRP) दि.31 मार्च 2025 पर्यंत बसवण्याचे निर्देश देण्यात आले होते. तथापी सर्व जुन्या नोंदणीकृत वाहनांना HSRP बसवण्यासाठी 30 जून पर्यंत नव्याने मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी दिली आहे. सर्व जुन्या नोंदणीकृत वाहनांना HSRP बसविण्याकरीता M/s.Rosemerta Safety Systems Ltd या उत्पादक संस्थेची नेमणूक केलेली आहे. या उत्पादक संस्थेने कोल्हापूर जिल्ह्याकरीता एकूण 29 अधिकृत फिटमेंट सेंटर्सची नियुक्त केली आहे. वाहनधारकांनी https://transport.maharashtra.gov.in यासंकेतस्थळावर नोंदणी करुन त्यांच्या सोईप्रमाणे अपॉईटमेंट घेऊन वाहनांवर HSRP बसवण्याची कार्यवाही करावी. अधिकृत फिटमेंट सेंटर्सची (FC) कडून…

Read More

कोल्हापूर दि 21 (जिमाका): श्री छत्रपती संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकुल, कोल्हापूर येथे इंडोकाऊंट फाउंडेशन एम. आय. डी. सी गोकुळ शिरगाव, कोल्हापूर यांचे सी.एस.आर.फंडातून नवीन व्यायामशाळेचे बांधकाम सुरु करण्यात आले असून या ठिकाणी अद्यावत व्यायाम साहित्य तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, लॉकर्स चेंजिंग रुम इ. सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. या व्यायामशाळेचा लाभ जास्तीत जास्त खेळाडू, महिला व नागरीक यांना होण्याच्या दृष्टीने गुढी पाडव्याच्या मुहुर्तावर वार्षिक फी मध्ये सुट देण्यात येवून पुरुषांसाठी 5 तर महिलांसाठी 4 हजार रुपये फी आकारण्यात येणार आहे. जिल्ह्यातील खेळाडू व नागरीकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन क्रीडा व युवक सेवा विभागाचे विभागीय उपसंचालक माणिक पाटील यांनी…

Read More

कोल्हापूर दिनांक 22 – सिटी क्रिमिनल बारचे अध्यक्ष. ऍड दत्ताजीराव कवाळे साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पांजरपोळ येथील जनावरांना चारा वाटप लहान मुलांना खाऊचे वाटप करुन साजरा करण्यात आला .याप्रसंगी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष बंडा लोंढे, पांजरपोळ संस्थेचे डॉ राजकुमार बागल, गांधीनगर ग्रामपंचायत सदस्य गजेंद्र हेगडे, प्रतिष्ठानचे सचिव विनायक पाटील, दावीद भोरे,अजय कांबळे,प्रशांत अवघडे, रवी कवाळे, प्रतिष्ठानचे प्रदेशाध्यक्ष राहुल गणेशाचार्य, प्रतिष्ठानचे अध्यक्ष अक्षय साळवे, प्रथमेश मोरे,विकी शिंदे,आदि उपस्थित होते

Read More

कोल्हापूर दिनांक 22- १८ प्रकारच्या पारंपरिक कारागिरांना व्यवसायासाठी आर्थिक मदत व प्रोत्साहन देण्यास साठी केंद्र शासनाद्वारे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना सुरु करण्यात आली आहे. *❇️ योजनेचा उद्धेश ?* योजनेअंतर्गत व्यवसाय सुरु करण्यासाठी १८ प्रकारच्या पारंपरिक कारागिरांना १ लाख रु. कर्ज उपलब्ध करून दिल जाणार आहे तेही फक्त ५ टक्के व्याजदरासह *❇️ या योजनेची वैशिष्ट्ये व फायदे :* *१.* पोर्टल वरती नोंदणी करणाऱ्या १८ प्रकारच्या पारंपरिक कारागिरांना पाच दिवसीय प्रशिक्षण दिले जाणार आहे *२.* पाच दिवसीय प्रशिक्षण कालावधीत रु. ५०० (रोज) विद्यावेतन दिले जाणार आहे *३.* प्रशिक्षणानंतर पीएम विश्वकर्मा प्रमाणपत्र प्रधान केले जाणार आहे *४.* प्रशिक्षण घेणाऱ्या कारागिरांना टूल किट खरेदीसाठी १५…

Read More

कोल्हापूर दि 21 (जिमाका ) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले आहे की, शिका ! संघटित व्हा ! संघर्ष करा !! बाबासाहेबांचा हा मूलमंत्र प्रत्यक्षात आणण्यासाठी समाज कल्याण विभाग कार्यरत राहणार असून भविष्यात शिक्षणासाठी मुला – मुलींचे वसतीगृह उभारण्याला हा विभाग प्राधान्य देईल, असे प्रतिपादन सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केले . माणगाव परिषदेच्या 105 व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आ. अशोक माने होते. ते पुढे म्हणाले, माणगाव परिषदेपासून बाबासाहेबांच्या रुपाने संपूर्ण जगाला एका महान व्यक्तिमत्त्वाचा परिचय झाला. तत्कालीन कालखंडात आपल्या कार्यरुपाने बाबासाहेबांनी क्रांती केली. माणगाव येथील लंडन हाऊसच्या दुरुस्तीचे कामकाज सुरु करावे, त्यासाठी आपण निधी देऊ…

Read More