Author: admin

                                                                  कोल्हापूर, दि. 11 (जिमाका) : जिल्ह्यातील 10 नगरपरिषद व 3 नगरपंचायतींची निवडणुकीची प्रक्रिया सुरु असुन राज्य निवडणूक आयोगाच्या सुधारित आदेशान्वये रविवार, 21 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील पन्हाळा, मलकापूर, वडगांव, हुपरी, जयसिंगपुर, शिरोळ, कुरुंदवाड, गडहिंग्लज, कागल, मुरगूड या नगरपरिषद व हातकणंगले, आजरा व चंदगड नगरपंचायत मधील मतदार संघासाठी 2 डिसेंबर रोजी विनिर्दिष्ट ठिकाणी मतदान झाले असून रविवार, 21 डिसेंबर रोजी नगरपरिषद व नगरपंचायत मतदारसंघ निहाय…

Read More

कोल्हापूर, दि. 10 (जिमाका) : सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ 2025 कार्यक्रम जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली 16 डिसेंबर रोजी ताराराणी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय येथे सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास जिल्ह्यातील माजी सैनिक/ माजी सैनिक विधवा व अवलंबित यांनी कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी (निवृत्त) ले. कर्नल डॉ. भिमसेन चवदार यांनी केले आहे. 0000

Read More

कोल्हापूर, दि. 10 (जिमाका) : प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत नवीन दुचाकी नोंदणी मालिका MH09-HD दि. 17 डिसेंबर पासून सुरु करण्यात येत असून संबंधित वाहन चालकांच्या पसंती क्रमांकाचे अर्ज 17 व 18 डिसेंबर रोजी सकाळी 9.45 ते दुपारी 3 या वेळेत खिडकी क्र. 9 येथे स्विकारण्यात येतील, अशी माहिती सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी दिली. पसंतीचा नोंदणी क्रमांक घेण्यासाठी अर्जासोबत शासनाने विहित केलेल्या शुल्कानुसार त्या क्रमांकासाठी विहित असलेल्या मुळ रकमेचा Demand Draft (धनाकर्ष) जोडलेला असणे आवश्यक आहे. धनादेश किंवा पे ऑर्डर अर्जासोबत देवू नये. Demand Draft (धनाकर्ष) काढताना SBI TRE. BRANCH KOLHAPUR GRAS या नावानेच काढलेला असावा. इतर कोणत्याही नावे काढलेला…

Read More

कोल्हापूर, दि. 9 : व्यक्ती, समाज आणि देशाच्या सर्वांगीण समृद्धीचा मार्ग भारतीय संविधानातूनच जातो, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज केले. शिवाजी विद्यापीठाचे दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्र, गांधी अभ्यास केंद्र आणि समाज कल्याण विभाग, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने पीएम-उषा योजनेअंतर्गत आयोजित “भारतीय राज्यघटना: मूलभूत संरचना सिद्धांताचा विकास” या विषयावरील एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव अध्यक्षस्थानी होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून कोल्हापूरचे माजी जिल्हाधिकारी तथा ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख, समाजकल्याण सहाय्यक आयुक्त सचिन साळे उपस्थित होते. जिल्हाधिकारी येडगे म्हणाले, भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशात जात, धर्म, वंश, पंथ यांतील भिन्नता असूनही एकात्मता…

Read More

*कोल्हापूर, दि. ०८* : कोल्हापूर शहराच्या हद्दीलगत विस्तारत असलेल्या नागरी वसाहतींच्या आणि गावांच्या सुनियोजित विकासासाठी एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणास (KUADA) महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ च्या कलम ४० अन्वये ‘विशेष नियोजन प्राधिकरण’ (SPA) हा महत्त्वपूर्ण दर्जा मिळावा, यासाठीचा अधिकृत प्रस्ताव आज, ८ डिसेंबर २०२५ रोजी राज्य शासनाकडे सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावामुळे प्राधिकरणाच्या कक्षेतील ४२ गावांमधील विकासाचे प्रश्न मार्गी लागणार असून, कोल्हापूरच्या उपनगरांमध्ये सुनियोजित विकासाचे एक नवीन पर्व सुरू होण्याची चिन्हे आहेत. या महत्त्वपूर्ण प्रक्रियेला गती मिळण्यामागे लोकप्रतिनिधींचा सातत्यपूर्ण पाठपुरावा कारणीभूत ठरला आहे. करवीर विधानसभेचे आमदार चंद्रदीप नरके…

Read More

कोल्हापूर, दि. 3 : जागतिक दिव्यांग दिनानिमित्त जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय, जिल्हा परिषद येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. जिल्हाधिकारी अमोल येडगे व मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी दृष्टीहीन दिव्यांग असलेल्या दिपाली पाटील यांना नियुक्ती आदेश प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर, तसेच प्रमुख उपस्थिती जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी सुवर्णा सावंत या होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक साधना कांबळे यांनी केले. त्यांनी दिव्यांग व्यक्तींचे हक्क, अधिनियम, छळ-हिंसाचार प्रतिबंध, शासन निर्णय, तसेच संस्था नोंदणी व देखरेख याबाबत सर्वसमावेशक माहिती दिली. कर्णबधीर विद्यालय कागलचे विशेष शिक्षक संतोष गायकवाड यांनी दिव्यांग व्यक्ती अधिनियम…

Read More

कोल्हापूर दि. 2 (जि. मा. का)* : जिल्ह्यातील 10 नगरपरिषद व 3 नगरपंचायत मध्ये आज सकाळी 7.30 ते 3.30 वाजेपर्यंत 61.99 टक्के मतदान झाले. एकुण 318 मतदान केंद्रांवर 2,55,737 मतदारांपैकी 1,58,527 मतदारांनी मतदान केले. यामध्ये पुरुष 76,400, महिला 82,121 तर इतर 6 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. नगरपालिकेचे नाव, एकूण मतदार, झालेले मतदान व टक्केवारी खालील प्रमाणे *नगरपरिषद* जयसिंगपूर – 49747 पैकी 22958, 46.15%, मुरगूड – 10128 पैकी 7348, 72.55%, मलकापूर -4934 पैकी 3700, 74.99% वडगाव – 23044 पैकी 16918, 73.42% गडहिंग्लज-30161 पैकी 17917, 59.40% कागल – 28753 पैकी 18857, 65.58% पन्हाळा – 2967 पैकी 2089, 70.41% कुरुंदवाड – 22224…

Read More

कोल्हापूर दिनांक 1- तीर्थक्षेत्र नृसिंहवाडी *येथे 4 डिसेंबर 2025* रोजी *दत्त जयंती महोत्सव सोहळा* पार पडणार असून ग्रामस्थ व दत्त भाविकांच्या सोयीसाठी जिल्हा महसूल व पोलीस प्रशासन यांनी पाहणी करून दिलेल्या सूचनेनुसार श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे भाविकाना दत्त दर्शन सुरळीत घेता यावे यासाठी नृसिंहवाडी ग्रामपंचायत व दत्त देवस्थान यांनी अत्यंत चांगले नियोजन केले असून त्याच बरोबर दर्शन मार्ग, पार्किंग व्यवस्था, पिण्याचे पाणी, स्वच्छता, आरोग्य व्यवस्था व पोलीस बंदोबस्त याचे चांगले नियोजन केले आहे याचबरोबर *विद्युत पुरवठा सुरळीत चालू राहावा* यासाठी *महाराष्ट्र विद्युत महावितरण चे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेऊन* विद्युत पुरवठा खंडित होणार नाही याची दक्षता घेत आहेत. दत्त…

Read More

कोल्हापूर: शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख प्रशांत साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली व कोल्हापूर जिल्हाप्रमुख विनायक जरांडे यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर शहरातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्र, नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र, वॉर्ड दवाखाना यांना भेटी देऊन नागरिकांचे तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रश्न जाणून घेऊन यामध्ये सुधारणा करण्याबाबत महानगरपालिकेचे उपायुक्त किरण धनवडे यांना निवेदन देण्यात आले. या आरोग्य केंद्रांच्या भेटीमध्ये प्रामुख्याने हिरकणी कक्षाचा अभाव, जुन्या व जीर्ण झालेल्या इमारती, अपुरा स्टाफ, स्वच्छतागृहांची दुर्दशा आणि अभाव, पार्किंगचा प्रश्न, कंपाउंड चा अभाव, स्थानिक नागरिकांचा त्रास, बंद पडलेली रक्तपेढी, इलेक्ट्रिसिटी बॅकअप चा अभाव, पावसामुळे भिंतींना ओलावा, पिण्याचा पाण्याचा प्रश्न अशा अनेक समस्या समोर आल्या. नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र…

Read More

कोल्हापूर, दि. २८ : समाजात रुजलेल्या अनिष्ट, अघोरी अमानुष गैरसमजुतीमुळे समाजाचे अतोनात नुकसान होत आहे. लोकांचे होणारे शोषण व छळ थांबवण्यासाठी जादूटोणा विरोधी कायदा प्रभावीपणे राबविण्याबाबत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी बैठकीतून सूचना केल्या. त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरावरील जादूटोणा विरोधी कायदा जनजागृती प्रचार आणि प्रसार कार्यक्रम अंमलबाजवणी समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरज कुमार, सदस्य सचिव सहायक आयुक्त समाज कल्याण सचिन साळे यांच्यासह आरोग्य, शिक्षण, जिल्हा माहिती कार्यालय, महिला व बालविकास, पोलीस, माविम विभागाचे प्रमुख तथा समिती सदस्य उपस्थित होते. कोल्हापूर जिल्ह्यातील वाढत्या जादूटोणा घटना व तक्रारींबाबत या बैठकीत चर्चा झाली. तसेच पोलीस विभागाने दोन…

Read More