
कोल्हापूर, दि. 10 (जिमाका) : सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ 2025 कार्यक्रम जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली 16 डिसेंबर रोजी ताराराणी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय येथे सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास जिल्ह्यातील माजी सैनिक/ माजी सैनिक विधवा व अवलंबित यांनी कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी (निवृत्त) ले. कर्नल डॉ. भिमसेन चवदार यांनी केले आहे.
0000