Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: admin
कोल्हापूर, दि. 30 (जिमाका) : प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय लोकशाही दिन राबविण्यात येतो. परंतु, राज्य निवडणूक आयोगाने शिक्षक पदवीधर मतदार संघाची निवडणूक जाहीर केली असल्याने ऑक्टोबर अखेरपर्यंत आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे येत्या 5 ऑक्टोबर रोजी होणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन रद्द करण्यात आला असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा अपर जिल्हादंडाधिकारी गजानन गुरव यांनी दिली. **
कोल्हापूर, दि. 29 (जिमाका) : महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी आज कोल्हापूर दौऱ्यात जिल्ह्यातील विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या मान्यवरांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. शासकीय विश्रामगृह येथे ही भेट झाली. राज्यपालांच्या कोल्हापूर दौऱ्याच्या कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील प्रमुख व्यक्तींचा भेटीमध्ये समावेश होता. यावेळी कृषी, उद्योग, व्यवसाय आणि वास्तुकला क्षेत्रातील डॉ. संजय डी. पाटील, सर्जेराव पाटील, सुरेंद्र जैन, नीरज झंवर, मोहन कुशिरे, राजीव पाटील, भरत जाधव, वर्धन वडगावे आणि अजय कोराने यांनी राज्यपालांची भेट घेतली. तसेच वैद्यकीय, सनदी लेखा, विधी आणि साहसी क्षेत्रातील डॉ. अशोक भूपाळी, डॉ. ए. बी. पाटील, डॉ. सुरज पवार, डॉ. सतीश पत्की, सीए आशिष सेवेकरी, ॲड. श्रीकृष्ण…
कोल्हापूर दि. 29 कोल्हापूर जिल्ह्या अप्रतिम निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे, विपुल निसर्ग संपदा लाभलेली आहे, जिल्ह्याला धार्मिक तीर्थस्थळे, क्रीडा, व्यापार, उद्योग यांची गौरवी परंपरा आहे. कोल्हापूरचे समग्र, एकात्मिक ब्रॅण्डिंग करण्यासाठी कोल्हापूर महोत्सवासारखे उपक्रम राबवावेत असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले. राज्यपाल जिष्णु देव वर्मा हे कोल्हापूर दौऱ्यावर असताना त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील प्रमुख विकास प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, राज्यपालांचे परिवार प्रबंधक डॉ. निशिकांत देशपांडे, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड डॉ.कुलगुरू राजनिश कामत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जासमिन, राज्यपालांचे परिसहायक नवदीप अगरवाल, इचलकरंजी महानगरपालिकेच्या आयुक्त पल्लवी पाटील यांच्यासह…
कोल्हापूर, दि. 29 (जिमाका) : या ठिकाणी उद्योग वृद्धीची क्षमता मोठ्या प्रमाणावर आहे. येथील विविध क्षेत्रातील उद्योजकांनी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपले स्थान भक्कम करण्यासाठी अधिकाधिक प्रयत्न करावेत तसेच ज्या सूक्ष्म लघु व मध्यम उद्योगांकडून अद्याप निर्यात सुरू झालेले नाही अशा उद्योगांनी आंतरराष्ट्रीय बाजारपेठांचा शोध घ्यावा, असे आवाहन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आज केले. हॉटेल सयाजी येथे फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशन (FIEO) व महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ (MSSIDC) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 7 व्या रिव्हर्स बायर-सेलर मिटच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अजय सहाय, महाराष्ट्र…
कोल्हापूर, दि. 29 (जिमाका) : राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी श्री अंबाबाई महालक्ष्मीचे दर्शन घेऊन वेदोक्त संकल्प पूजा केली. यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्यावतीने समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी श्री अंबाबाईची प्रतिमा देऊन त्यांचे स्वागत केले. यानंतर राज्यपाल श्री वर्मा यांनी मातुर्लिंग श्री महादेव व श्री गणेशाचे दर्शन घेऊन प्रार्थना केली. यानंतर पुरातत्व विभागाच्या वतीने अंबाबाई मंदिर परिसरात सुरु असलेल्या जतन आणि संवर्धन कामाची पाहणी त्यांनी केली. याकामाच्या सद्यस्थितीबाबत जिल्हाधिकारी डॉ. राठोड व धर्मशास्त्र मार्गदर्शक गणेश नेर्लेकर यांनी माहिती दिली. यावेळी राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, परिवार प्रबंधक डॉ. निशिकांत देशपांडे , राज्यपालांचे परिसहायक नवदीप अगरवाल,…
कोल्हापूर, दि. 29 (जिमाका) : कोल्हापूर परिमंडळातील कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये स्वाईन फ्ल्यू सदृश्य रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे निदर्शनास येत आहे. आजअखेर कोल्हापूर जिल्ह्यात १७६ तर सांगली जिल्ह्यात ८ स्वाईन फ्ल्यू सदृश्य रुग्ण आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घाबरून न जाता आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन कोल्हापूर मंडळाचे आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. दिलीप माने यांनी केले. स्वाईन फ्ल्यू हा इन्फ्ल्यूएन्झा (H1N1) विषाणूमुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे. खोकताना, शिंकताना किंवा बोलताना हवेतून बाहेर पडणाऱ्या थेंबांद्वारे तसेच संक्रमित व्यक्तीच्या थेट संपर्कातून या आजाराचा प्रसार होऊ शकतो. संक्रमित वस्तू किंवा पृष्ठभागाला स्पर्श केल्यानंतर चेहरा, नाक, डोळे किंवा तोंडाला स्पर्श केल्यानेही…
कोल्हापूर, दि. 29 : कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सव’ डॉ. व्ही. टी. पाटील स्मृतीभवन, राजारामपुरी येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधून ३०० हून अधिक महिला शेतकरी व शेतकरी बचत गट महोत्सवात सहभागी झाले होते. प्रदर्शनात टाकळा, शेवगा, कुर्डू, दिंडा, फोडशी, कर्टुले, भारंगी, आळंबी यांसह ८० हून अधिक प्रकारच्या रानभाज्यांचे नमुने मांडण्यात आले होते. यासोबतच शेतकऱ्यांनी थेट विक्रीसाठी आणलेल्या ताज्या रानभाज्यांना ग्राहकांकडून हातोहात मागणी मिळाली. प्रदर्शनासोबतच आयोजित करण्यात आलेल्या ‘रानभाजी खाद्य महोत्सवा’ला नागरिकांनी विशेष पसंती दिली. महोत्सवात महिला शेतकऱ्यांसाठी रानभाजी पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये उत्कृष्ट व…
कोल्हापूर, दि. 29 (जिमाका) : जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सहायक आयुक्त, समाजकल्याण कार्यालय आणि महात्मा बसवेश्वर बहुउद्देशीय संस्था, लोहा, जि. नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता महालक्ष्मी सभागृह, रूईकर कॉलनी येथे जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष ‘सांस्कृतिक स्नेहसंमेलन’ आयोजित करण्यात आले आहे. ज्येष्ठ नागरिकांचे समाजातील योगदान लक्षात घेऊन त्यांचे हक्क, कल्याण आणि शासनाच्या विविध योजनांबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी ज्येष्ठ नागरिकांच्या कला व कौशल्यांना वाव देणारे विविध सांस्कृतिक उपक्रम तसेच जनजागृतीपर कार्यक्रम होणार आहेत. जिल्ह्यातील जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांनी या सांस्कृतिक स्नेहसंमेलनास उपस्थित राहावे, असे आवाहन ज्येष्ठ नागरिक समन्वय समितीचे सदस्य…
कोल्हापूर, दि. 29 (जिमाका) : महासैनिक दरबार हॉल, लॉन व ट्रेनिंग सेंटर येथे लग्नविधी, स्वागत समारंभ, स्नेहमेळावे, व्यावसायिक प्रदर्शन तसेच अन्य लहान कार्यक्रमांसाठी भाडेतत्त्वावर सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात. या माध्यमातून महासैनिक दरबार हॉल व लॉनच्या खात्यावर भाड्यापोटी जमा होणाऱ्या रकमेचे लेखांकन तसेच वेळोवेळी आयकर विवरणपत्र भरण्यासाठी सनदी लेखापाल व लेखापाल लिपिक यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. यासाठी इच्छुक पात्र व्यक्तींनी आपले आवेदनपत्र व संबंधित आवश्यक कागदपत्रांसह 5 ऑक्टोबरपर्यंत महासैनिक दरबार हॉल व लॉन येथे संपर्क साधावा, असे आवाहन ले. कर्नल (निवृत्त) डॉ. भीमसेन चवदार यांनी केले आहे. 0000
कोल्हापूर, दि.28 (जिमाका) : दानोळी (ता. शिरोळ) येथे छत्रपती प्रतिष्ठानच्यावतीने गणेशोत्सवानिमित्त आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले होते. या शिबिरात सेवा संकल्प अभियानांतर्गत BP, शुगर, ECG, नेत्र तपासणीसह आभा व गोल्डन कार्डची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. शिबिराचे उदद्याटन सरपंच सुनिता वाळकुंजे यांच्या हस्ते करण्यात आले. शिबिरात रक्तदाब, रक्तातील साखर, ECG, नेत्र तपासणी करण्यात आले. तपासणीनंतर आवश्यकतेनुसार औषध उपचार, आरोग्य विषयक सल्ला व मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी उदय राऊत, मंडळाचे अध्यक्ष भरत मुळीक, उपाध्यक्ष सुनिल चौगुले, अभय राऊत, सुजय राऊत, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पांडुरंग खटावकर, प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. ए.एन. मोघे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अर्चना यादव आदी उपस्थित होते. 00000