
कोल्हापूर, दि. 30 (जिमाका) : प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय लोकशाही दिन राबविण्यात येतो. परंतु, राज्य निवडणूक आयोगाने शिक्षक पदवीधर मतदार संघाची निवडणूक जाहीर केली असल्याने ऑक्टोबर अखेरपर्यंत आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे येत्या 5 ऑक्टोबर रोजी होणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन रद्द करण्यात आला असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा अपर जिल्हादंडाधिकारी गजानन गुरव यांनी दिली.
**