
कोल्हापूर, दि. 22 (जिमाका) : जुलै 2027 च्या सत्रासाठी राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज (RIMC), डेहराडून, प्रवेशपात्रता परीक्षा डिसेंबर 2026 मध्ये घेण्यात येणार आहे. परीक्षेसाठी प्रविष्ठ होणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी परीक्षा नॅशनल टेस्टिंग एजन्सी यांच्यामार्फत घेण्यात येणार आहे.
राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज (RIMC), डेहराडून, प्रवेशपात्रता परीक्षेच्या ऑनलाईन आवेदनपत्रhttps://examinationservices.nic.in/ExamSys26Part2/Root/Home.aspx?enc=Ei4cajBkK1gZSfgr531mFQBut90TMxhETt9bNm6zcP2ghS+a59eor30/A5h2io4z या लिंकवर उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत. अधिक माहितीसाठी राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज (RIMC), डेहराडून यांच्या rimc.deu.in या संकेतस्थळावर भेट द्यावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी केले.
0000