
कोल्हापूर दि. 03 (जिमाका): पोस्टमास्तर जनरल गोवा रिजन पणजीद्वारे 25 जून रोजी सकाळी 11 वाजता पोस्टमास्तर जनरल, गोवा रिजन (पणजी) यांच्या कार्यालयामध्ये 66 वी डाक अदालत आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती कोल्हापूर डाक विभागाच्या प्रवर अधीक्षकांनी दिली आहे.
गोवा विभागाशी संबंधित पोस्टाच्या सेवेविषयी किंवा कामकाजाबद्दल ज्या तक्रारींचे निवारण सहा आठवड्याच्या आत झाले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारींची या डाक अदालतध्ये दखल घेतली जाईल. विशेषत: टपाल वस्तू, मनीऑर्डर, बचत खाते, प्रमाणपत्र याबाबतच्या तक्रारी विचारात घेतल्या जातील. तक्रारींचा उल्लेख सर्व तपशिलासह केलेला असावा.
संबंधितांनी डाक सेवेबाबतची आपली तक्रार सहायक निदेशक डाक सेवा-1, पोस्टमास्तर जनरल यांचे कार्यालय, गोवा रिजन पणजी 403001 यांच्या नावे दोन प्रतींसह 8 जूनपर्यंत अथवा तत्पूर्वी पोहचेल अशा रितीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या तक्रारींची डाक अदालतीमध्ये दखल घेतली जाणार नसल्याचे पोस्ट विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले.
0000
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.