
कोल्हापूर, दि. 03 (जिमाका) : कृषी विभागामार्फत राज्यात राष्ट्रीय खाद्य तेल अभियान-तेलबिया (NMEO-OS) ची अंमलबजावणी सन 2026-27 या वर्षात प्रभावीपणे सुरू करण्यात आली आहे. या अभियानांतर्गत काढणीपश्चात तंत्रज्ञान व पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी ‘गोदाम बांधकाम’ आणि ‘मिनी ऑईल मिल / एक्सपेलर (तेलघाणा)’ या घटकांसाठी विशेष आर्थिक सहाय्य मंजूर करण्यात आले आहे. जिल्ह्यातील पात्र शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्या (FPOs/ FPCs), सहकारी संस्था आणि मूल्य साखळी भागीदार (VCPs) यांनी या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे.
गोदाम बांधकाम योजनेसाठी पात्रता व लाभार्थी: शेतकरी उत्पादक संस्था / कंपन्या (FPOs/FPCs), सहकारी संस्था, सरकारी/ खाजगी उद्योग तसेच वैयक्तिक लाभार्थी.
क्षमता व आर्थिक मापदंड: 250 मे. टन क्षमतेच्या गोदाम बांधकामासाठी आर्थिक निकषांनुसार प्रति मे. टन 11 हजार 521 रु. खर्च गृहीत धरून एकूण प्रकल्प खर्चाच्या 50 टक्के किंवा जास्तीत जास्त 14.40 लाख रु. (यापैकी जे कमी असेल ते) अनुदान अनुज्ञेय राहील.
अट: ही योजना बँक कर्जाशी निगडीत असून, बँकेने कर्ज मंजूर केल्यानंतरच अर्जदार या लाभास पात्र ठरतील.
मिनी ऑईल मिल / एक्सपेलर (तेलघाणा उभारणी) या योजनेसाठी पात्रता व लाभार्थी: शेतकरी उत्पादक कंपन्या (FPOs/FPCs) आणि वैयक्तिक शेतकरी (FPO/ FPC यांना प्राधान्य).
तेल काढणी युनिट (10 टन क्षमता) : प्रकल्प खर्चाच्या 33 % कमाल रु.9.90 लाख.
फिल्टर प्रेस सह मिनी ऑईल मिल: युनिटच्या किमतीच्या 40% ते 50% (प्रवर्गानुसार) किंवा कमाल रु. 4 लाख.
फिल्टर प्रेस शिवाय मिनी ऑईल मिल: युनिटच्या किमतीच्या 40% ते 50% (प्रवर्गानुसार) किंवा कमाल रु. 3 लाख.
अटी व नियम: गोदाम बांधकाम व ऑईल मिल उभारणीनंतर केंद्र शासनाच्या धोरणानुसार कृषी मॅपर (Krishi Mapper) पोर्टलवर जिओ-टॅगिंग (Geo-tagging) आणि मॅपिंग करणे बंधनकारक राहील. शासनाच्या अन्य कोणत्याही योजनेतून यापूर्वी या बाबींचा लाभ घेतलेला नसावा. सर्व यंत्रसामग्री भारतीय मानक ब्युरो (BIS) किंवा समकक्ष गुणवत्ता मानकांचे पालन करणारी असावी. सर्व लाभार्थ्यांना स्थापनेच्या तारखेपासून किमान 5 वर्षांपर्यंत मालमत्तेची देखभाल व वापर करणे बंधनकारक आहे. अर्जासोबत जीएसटी-नोंदणीकृत उत्पादक किंवा पुरवठादाराकडून मिळालेल्या कोटेशन्स सादर करणे आवश्यक आहे.
इच्छुक पात्र संस्था व शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयामध्ये ऑफलाईन पद्धतीने तात्काळ अर्ज करावेत. अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी किंवा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.
00000