
कोल्हापूर, दि. 03 (जिमाका) : धर्मवीर आनंद दिघे महाराष्ट्र ऑटो-रिक्षा आणि मीटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळ या मंडळाचे नामकरण करून आता धर्मवीर आनंद दिघे महाराष्ट्र प्रवासी वाहतूक चालक कल्याणकारी मंडळ असे करण्यात आले आहे.
यापूर्वी हे मंडळ केवळ ऑटो-रिक्षा आणि मीटर्ड टॅक्सी चालकांपुरते मर्यादित होते. मात्र, नव्या निर्णयानुसार राज्यातील सर्व प्रकारची अधिकृत प्रवासी वाहने चालवणारे आणि बॅज (Badge) असलेले अनुज्ञप्तीधारक (परवानाधारक) चालक मंडळाचे सभासद होण्यास पात्र ठरणार आहेत. प्रवासी वाहन चालकांना विविध कल्याणकारी योजना, सामाजिक सुरक्षा आणि आर्थिक सहाय्याचा लाभ मिळावा, यासाठी मंडळामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येतात. या सुविधांचा लाभ आता अधिक व्यापक स्वरूपात राज्यातील सर्व पात्र चालकांना मिळणार आहे.
उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, इचलकरंजी यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व प्रकारची प्रवासी वाहने चालवणारे व बॅजधारक चालकांनी मंडळाचे सभासदत्व घ्यावे, असे आवाहन इचलकरंजीचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे.
0000