
कोल्हापूर, दि. 21 (जिमाका): जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय यांच्या अधिपत्याखालील सैनिकी मुलां/ मुलींचे वसतिगृह, कोल्हापूर व पन्हाळा येथे 2026 -2027 या शैक्षणिक वर्षाकरिता प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात येत असून 21 मे पासून प्रवेश पुस्तिकांची विक्री सुरु करण्यात आली आहे. प्रवेश अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 31 जुलै आहे. सर्व युध्द विधवा / इतर माजी सैनिक विधवा/ माजी सैनिक व सेवारत सैनिक व अनाथ पाल्ये यांनी याचा लाभ घ्यावा. तसेच उर्वरित जागा सामान्य (सिव्हीलीयन) विद्यार्थ्यांना देण्यात येतील, असे आवाहन प्रभारी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सुभाष डोंगरे यांनी केले.
वसतिगृह प्रवेशासाठी खालीलप्रमाणे प्राधान्यक्रम देण्यात येईल :- युध्द विधवा/ माजी सैनिकांच्या विधवांची सर्व पाल्ये व माजी सैनिककांची अनाथ पाल्ये. पदव्युत्तर (व्यावसायिक, वैद्यकीय, अभियांत्रिकी, व्यावसायिक पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमात शिक्षण घेणारी पाल्ये),बी.एड.डी.एड., पदवी अभ्यासक्रम (गुणवंत्ता यादीप्रमाणे), 12वी, 11वी व 10वी, या क्रमाने (गुणवंत्ता यादीप्रमाणे), 5 वी ते 9 वी, या क्रमांने (गुणवंत्ता यादीप्रमाणे –सैनिकी मुलांचे वसतिगृह, पन्हाळा करिता), माजी सैनिकांचे दुसरे व तिसरे पाल्य, सेवारत सैनिकांचे पाल्य, जागा उपलब्ध असल्यास संचालकांच्या परवानगीने सिव्हिलीयन पाल्यासाठी प्रवेश देण्यात येतील.
गरजूंनी सैनिकी मुलांचे वसतिगृह – सुहास सराटे, वसतिगृह अधीक्षक – मो.नं. ९३७३५९८८२१ कोल्हापूर,
सैनिकी मुलींचे वसतिगृह – मंगला कांबळे, अशासकीय वसतिगृह अधीक्षिका- मो.नं. ९५१८३७४८६३ कोल्हापूर आणि सैनिकी मुलांचे वसतिगृह, पन्हाळा शंकर पाटील, अशासकीय वसतिगृह अधीक्षक – मो.नं. ८६९८४५३३९२ या ठिकाणी संपर्क साधावा.
प्रवेश फी व्यतिरिक्त अनामत रक्कम रुपये 1,000 आकारण्यात यईल. प्रवेश अर्ज संबंधित वसतिगृहात उपलब्ध करण्यात आलेले आहेत, अशी माहिती कार्यालयातर्फे देण्यात आली.
00000