
कोल्हापूर, दि. 05 (जिमाका): जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व मॉडेल करिअर सेंटर, कोल्हापूर आणि डी. आर. माने महाविद्यालय कागल यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, 8 मे रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत डी. आर. माने महाविद्यालय, कागल येथे नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.
या रोजगार मेळाव्यामध्ये 11 पेक्षा जास्त खासगी उद्योजकांनी सहभाग दर्शविला असून, त्यांच्याकडून उत्पादन क्षेत्रातील 250 पदे व सेवा क्षेत्रातील 150 पदे अशी सुमारे 400 पेक्षा जास्त रिक्तपदे या रोजगार मेळाव्याकरिता कळविण्यात आलेली आहेत. या पदांकरीता किमान 10 वी, 12 वी, आयटीआय, डिप्लोमा, बी.ई. तसेच कोणत्याही शाखेतील पदवीधर पात्रता असणारे उमेदवार पात्र असणार आहेत.
इच्छुक उमेदवारांनी rojgar.mahaswayam.gov.in आणि ncs.gov.in या संकेतस्थळास भेट देऊन आपले पसंतीक्रम ऑनलाईन नोंदवावेत. प्रत्यक्ष मुलाखतीला येताना उमेदवारांनी आपली सर्व शैक्षणिक कागदपत्रे, आवश्यकतेनुसार रिझ्युमच्या 3 प्रती सोबत आणणे आवश्यक आहे. जास्तीत जास्त उमेदवारांनी या रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त जमीर करीम यांनी केले आहे.
0000